समृद्धी महामार्गाचे ठाणे पालघर येथे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु आहे. या कामादरम्यान गर्डर बसवणारी क्रेन कोसळली. या दुर्घटनेत 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटूंबियांना पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
मद्यपान केलेल्या बेशिस्त पर्यटकांमुळे अपघात आणि पाण्याच्या प्रवाहात बुडणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. पर्यटकांच्या बेशिस्तीमुळे जव्हार, मोखाडा भागातील पर्यटन स्थळांवर बंदी लादण्यात आली आहे.