समोर टीव्ही आहे
टीव्हीवर “लग्नाची वेडी” सुरू आहे.
जाहिरात सुरू झाली.
ब्रेकनंतर परत सुरू होताना ते “लग्नाची बेडी” आहे हे कळलं.
ती “वेडी” होती तेव्हाच ठीक होती, कारण “बेडी” पाहणाऱ्याच्या बुद्धीला पडतेय.
#बेडी_जलाईले#वेड्या_बेडीची_वेडी_ही_माया
अमूलचं पिस्ता आईस्क्रीम खाताना, “लगेच पिघळतंय बाई हे! बरोबर नाही बघ!” अशी आईस्क्रीमची इज्जत, आणि ते खाऊन झाल्यावर, “हे डबे रांगोळीला चांगले होतील बघ!” अशी त्याच आईस्क्रीमच्या डब्याची इज्जत फक्त आईच काढू शकते!
#आई_स्क्रीम#दस_मे_दो#रोस्टेड_अल्मंड
आई लोकांचं अवघड असतं राव!
घराचं शुध्दीकरण करायचं म्हणून दिसंल तिथं गोमूत्र शिंपडून मोकळी झाली.
दोन दिवस झाले माझ्या हेल्मेटला गोमुत्राचा वास यायलाय!
त्या वासात गाडी चालवणं हे श्रावण पाळण्यापेक्षा जास्त अवघड आहे!
#वाऱ्यावरती_गंध_पसरला#गोमूत्र_संगतीनं_माझ्या_तू_येशील_का
‘यात लहान साईझ आहे का?’ ह्या दुःखद प्रश्नाला ‘नाही सर हा लास्ट साईझ आहे. तुम्हाला किड्स सेक्शनमधले साईझ बरोबर बसेल’ असलं जीवघेणं उत्तर मिळाल्यावर कितीही राग/रडू आलं तरी अतिशय सप्पक चेहरा घेऊन “ओके” म्हणताना आतडं एवढं तीळ-तीळ तुटतं, क��� जास्त खाऊन वजन वाढवावं म्हणलं तरी पोट बिघडावं
कुठल्याही बँकेत गेल्य���वर एकदम अर्जंट काम असताना काउंटरवर कॉम्प्युटरसमोर कॉम्प्युटरचा 'क' ही न कळणारे, एकदम संथ गतीने काम करणारे आजोबाच का असतात?
#का_रे_दुरावा_का_रे_आजोबा
#स्टेट_बँक_ऑफ_आजोबा
लोकं भेटायला येताना गुड डे काय घेऊन येतात?
दुसरे बिस्किटं नाहीयेत का?
पार्ले जी असताना तुम्ही दुसऱ्या बिस्किटांना हात लावताच कसा?
पुढच्या वेळी येताना पार्ले जीच घेऊन या, नाहीतर काहीच आणू नका! गुड डे आणलं तर तुमच्या चहात बुडवून तुम्हीच खावा!
#सैराट_पार्ले_जी
The duality of दूधवाले काका :
आई : ओ कालचं दूध नासलं बघा!
काका : बाहेर ठेवता का?
आई : हो
काका : मग फ्रिजमध्ये ठेवत जा!
आई : ओ कालचं दूध नासलं बघा!
काका : फ्रिजमध्ये ठेवता का?
आई : हो
काका : मग बाहेर ठेवत जा!
#फ्रिज_का_फ्रिज_और_बाहेर_का_बाहेर#नासले_रेशमी_आहे_धुके_धुके
क्लासिक मोहितो आणि ब्लू ओशनच्या नावाखाली कफ सायरप आणि निळा फांटा मारतायत गळ्यात तुमच्या!
काही गरज नाही ट्राय करायची!
ट्राय करायच्या नादात तोंड कडू पडून चव जाईल सगळी, मग पुढचं खाल्लेलं पण कडूच लागंल!
बघा प्यायचंय का कफ सायरप अजून.
#food_blogger#foodie
हे पहा आपण निसर्गप्रेमी आहे!
मेघांचा गडगडाट, मातीचा सुगंध, रिमझिम रेशिमधारा वगैरे सगळं ठीक आहे!
पण जर लाईट घालवून वायफाय बंद पाडायचं असेल तर नको मला पाऊस, गेला तो ढगात!
एक तर गरम होतंय जाऊ दे बरं झालं आला पाऊस म्हणलं तर ह्याचे असले पोरकट चाळे!
#मोडेन_पण_वायफाय_नाही
@MKBHD चा युट्यूब व्हिडीओ बघताना आई :
- रोड झालाय खूप!
- किती भारी ह्याला हाताळायला भेटतेत असले फोन!
- हस्तरेषा बघ किती लांब आहे, पैसा आहे ह्याच्याकडं खूप!
#टेक्निकल_आई
मॅकडोनाल्ड मध्ये बर्गर खाताना त्यातला अर्धा कांदा बाहेर लटकायला लागल्यावर धा लोकांसमोर तो कांदा नूडलसारखा ओढायची कसरत करण्यापेक्षा शिस्तीत तो बर्गर घरी मागवून खाल्लेला बरा!
मग तो वाटेल तसा खाता येतो.
नुसता बन पाव भाजीसोबत आणि त्यातला कांदा चटणी चीज कोशिंबीर म्हणून तोंडी लावायला!
नुसतं ताक घेतलेलं आई लोकांना बघवतंच नाही!
ताकाचा नुसता थेंब वाटीत पडायचा उशीर तोवर ह्यांचं "पाणी घे!" "पाणी टाक त्यात!" "पाणी टाक!" सुरू होतं!
आणि परत ह्याच दूधवाल्यांना शिव्या घालतात दुधात पाणी का घातलं म्हणून!
#ताकस्पर्श#ऐसे_कैसे_चलेगा_आई