I have a question: if teachers face disciplinary action for hitting students in school, why is no action taken against the police officers in Delhi who beat students, or against those who issued such orders?
During the ongoing student protests in Delhi, the police have been indiscriminately using lathi-charges against the students. While a mild lathi-charge to disperse a crowd might be understandable in some contexts, the force used here appears to be an act of vendetta. The videos surfacing show not only protesting students but also bystanders being ruthlessly trampled upon. Such actions by the police could not possibly occur without specific orders from above.
What triggered the protest in the first place? It stemmed from the chaos surrounding the NEET exam, which adversely affected lakhs of students; out of anger, these students took to the streets, joined by others in solidarity. In short, the students initiated and sustained this movement. So, what was the justification for assaulting them? And who authorized the police to do so? Just as teachers are not permitted to hit students, neither are the police. Yet, why did this happen?
In the past, teachers frequently used to hit students (I, too, have often received such ‘punishment’), a practice that was eventually restricted because, no one has the right to inflict corporal punishment on students aside from the judiciary. Why shouldn't the same standard apply to the police? I have often said, and I say again today, that whether it is the Maharashtra police or any other force, officers often have no choice but to carry out the actions they are ordered to perform; therefore, they cannot be held solely responsible. But who gave the authority to the system that issues orders for such ruthless beatings? Do they consider themselves above the Constitution?
There are certain key United Nations principles, also adhered to by Amnesty International, dictating that whenever the use of force becomes necessary, the action taken must be constitutional, essential, and proportionate, and must entail accountability.
Today, in countries like Norway, Germany, Sweden, Finland, Denmark, and New Zealand, any use of police force is subject to rigorous inquiry. An inquiry that focuses heavily on those who issued the orders. We need to see this happen here as well.
The question remains: who will ensure this happens? On one hand, the Chief Justice of the country dismissively refers to these young people as "cockroaches," while on the other, the Supreme Court itself states it has no time to view videos of the beatings. It is baffling. What do they have time for then? Young men and women are forced to take to the streets because they no longer have any expectations left from the current government. Civil society must reflect on this issue. It needs to be debated. Members of Parliament must insist on a discussion regarding this matter in the House.
The issue is not whether the State possesses the authority to use force against its citizens; almost every State holds that power. The real question is whether a constitutional democracy demonstrates the capacity to exercise restraint in the use of its authority. A democracy’s maturity is not measured by how harshly dissent is suppressed, but rather by how it handles dissenting voices, with restraint and due consideration for the consequences.
Raj Thackeray
मला एक प्रश्न पडला आहे. जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?
दिल्लीत सध्या जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे, त्या आंदोलनाला हाताळताना विद्यार्थ्यांवर सर्रास लाठीचार्ज केला जात आहे. हा लाठीचार्ज अगदी हलक्या स्वरूपात गर्दी पांगवण्यासाठी केला जात असता तरी एकवेळ ठीक, पण हा म्हणजे कुठलातरी सूड उगवल्यासारखा केला जात आहे. जे व्हिडीओज समोर येत आहेत त्यात फक्त आंदोलनकर्ते विद्या��्थीच नाही तर आसपास असणाऱ्या अनेकांना सर्रास तुडवलं जात आहे. आणि ��ोलीस अशी कृत्य करत आहेत याचा अर्थ त्यांना असे आदेश आल्याशिवाय तर हे होऊच शकत नाही .
मुळात आंदोलन का झालं? तर NEET परीक्षेत गोंधळ झाले ज्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसला त्या रागातून ही मुलं रस्त्यावर उतरली. त्यांच्या समर्थनार्थ इतर विद्यार्थी पण उतरले. थोडक्यात हे आंदोलन विद्यार्थ्यांनी उभं केलं, मोठं केलं. मग विद्यार्थ्यांना मारण्याचं कारण काय होतं ? आणि हा अधिकार पोलिसांना दिलाच कोणी ? विद्यार्थ्यांना मारण्याची जशी शिक्षकांना परवानगी नाही तशी ती पोलिसाना पण नाही. पण तरीही हे का केलं गेलं ?
पूर्वी शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना सर्रास मारायचे ( त्यांचे प्रसाद मलाही अनेकदा मिळालेले आहेत ) जिच्यावर पुढे बंधनं आली कारण न्यायव्यवस्था सोडली तर विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्याचा अधिकार कोणालाच नाही. मग हाच न्याय पोलिसांना का नाही ? मी अनेकदा सांगत आलो आहे आणि आजदे���ील हेच म्हणेन, महाराष्ट्रातले पोलीस असोत की इतर कुठलेही त्यांना जी कृती करायला सांगितली जाते ती करणे याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच नसतो. त्यामुळे त्यांना सर्वस्वी दोषी ठरवता येत नाही. पण जी व्यवस्था त्यांना हे निर्दयीपणे मारण्याचे आदेश देते त्यांना कोणी अधिकार दिले ? ते संविधानापेक्षा मोठे आहेत का ?
युनायटेड नेशन्सचे काही महत्वाचे नियम आहेत जे ऍम्नेस्टी इंटरनॅशनल पण पाळते. ते म्हणजे, जेंव्हा केंव्हा बळ वापरा��ची वेळ येईल त्यासाठी केली जाणारी कृती संविधानिक असली पाहिजे- आवश्यक असेल तरच झाली पाहिजे- ती प्रमाणात असली पाहिजे -त्याचं उत्तरदायित्व हवं.
आज नॉर्वे, जर्मनी, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क, न्यूझीलँड या देशांमध्ये अशा पद्धतीने पोलिसी बळाचा वापर झाला तर त्याची कठोर चौकशी होते. आणि त्या चौकशीचा रोख हा आदेश देणाऱ्यांकडे जास्त असतो. हे आपल्याकडे ��ण व्हायला हवं.
हे कोण करेल असा प्रश्न आहे. पहिल्यांदा देशाचे सरन्यायाधीश या मुलांना झुरळ म्हणणार आणि मग हेच देशातील सर्वोच्च न्यायालय आम्हाला सध्या तरी हे मारहाणीचे व्हिडीओज बघायला वेळ नाही सांगणार. हे अजब आहे. त्यांना नक्की कशासाठी वेळ आहे मग हा प्रश्नच आहे. सध्याच्या सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत म्हणून तरुण-तरुणींना रस्त्यावर उतरावं लागत आहे. त्यामुळे याचा विचार सिव्हिल सोसाय��ीने करायला हवा. यावर चर्चा व्हायला हवी. खासदारांनी संसदेत यावर चर्चेचा आग्रह धरला पाहिजे.
प्रश्न राज्याकडे नागरिकांवर बळ वापरण्याचा अधिकार आहे की नाही, हा नाहीच आहे. तो अधिकार जवळपास प्रत्येक राज्याकडे असतो. खरा प्रश्न असा आहे की, घटनात्मक लोकशाही स्वतःच्या अधिकारावर संयम ठेवण्याची क्षमता दाखवते का? लोकशाहीची परिपक्वता विरोध किती कठोरपणे दडपला जातो यावर ठरत नाही; तर विरोधाचा आवाज कसा संयमाने आणि पुढच्या परिणामांच��� विचार करत हाताळते हा आहे !
राज ठाकरे ।
NEET परीक्षेत केंद्रसरकारने जो अभूतपूर्व गोंधळ घातला आणि त्याने विद्यार्थ्यांचं अपरिमित नुकसान झालं त्या विरोधात देशभर आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला चिरडण्याचा सरकारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. त्याविरोधात आज मी आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
पदावर बसलेल्या व्यक्तीने झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायची असते आणि जर भारतीय जनता पक्षाने विरोधात असताना तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते मग आता भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्याय��ा हवा. आम्ही कोणाशी बोलणार नाही, कुठलंही आंदोलन झालं तर आंदोलनकर्त्यांशी बोलणार नाही, हा सत्तेचा उद्दामपणा आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या २६ जुलै २०२६ ला सकाळी १० वाजता आम्ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील महाराजांच्या पुतळ्यापासून ते सिद्धिविनायक असा मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा अराजकीय असेल, या मोर्च्यात कुठल्याच पक्षाचे झेंडे असणार नाहीत. या मोर्च्यात विद्यार्थी सामील होतीलच पण त्यांच्या पालकांनी पण सामील व्हावे ही मनापासून विनंती. हा प्रश्न एका परीक्षेचा नाही तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळलं जातं आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा आहे.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर दवाखाना किंवा पालिकेच्या इतर दवाखान्यांत सुद्धा वारंवार डॅाक्टरांवर व इतर स्टाफवर हल्ले का होत आहेत ? याला खरे कारण पालिका प्रशासन यात कमी पडत आहे हे आहे. कॅान्ट्रेक्ट बेस वर घेतलेले डॅाक्टर व त्यांची सेवा घेतली म्हणजे आपले काम संपले ही पालिका प्रशासनाची मानसिकता झाली आहे.यामुळे या सर्वा��वर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही ही वस्तुस्थिती आहे.इथल्या अपुऱ्या सुविधांमुळे तिथल्या डॅाक्टर्स व स्टाफला सतत कसरत करावी लागते. या सर्वात कहर म्हणजे पालिका प्रशासनचा प्रत्येक बाबतीत वाढत चाललेला भ्रष्टाचार व त्यात सहभागी असलेले लोकप्रतिनिधी. या सर्व फेऱ्यात मरतोय तो सामान्य माणूस ! मग अशावेळी बऱ्याचदा तिथे परिस्थिती तणावपूर्ण असते. अर्थात सर्व डॅाक्टर्स किंवा स्टाफ यात सहभागी न���तात पण तेही यात भरडले जातात. रमेश म्हात्रे १००% चुकलेच,नव्हे त्यांनी गुन्हा�� केला आहे, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.परंतु त्यावर असं काही झाले की लोक फक्त वरवर व्यक्त होतात पण भ्रष्ट व्यवस्थेवर कोणी काही बोलत नाहीत. या शहराचे राजकारण फक्त भावनेवर चालू आहे, त्यामुळे आपल्या नशिबाला आपले कतृत्व समजणारे दादा लोक आपल्याच तोऱ्यात वावरत आहेत. जोपर्यंत लोकांना याबद्दल जाण येत नाही तोपर्यंत खऱ्या विकासाचा ‘रवी’ उगवणारच नाही.खरंतर परवाच्या प्रकरणात पालिका प्रशासन पण तेवढाच दोषी आहे परंतु त्यावर कोणीही बोलायला तयार नाही.आपली लोकशाही व समाजव्यवस्था ही त्या ‘पाच आंधळे व हत्ती’ या गोष्टीप्रमाणे चालली आहे. ज्याला जेवढे जाणवते तसे व्यक्त होतात. सामान्य जनता,मीडिया आणि राजकारणी केवळ हिंसेच्या घटनेवर (हत्तीच्या एका अवयवावर) बोलत राहतात. परंतु, त्यामागे असलेला 'प्रशासकीय आणि राजकीय भ्रष्टाचाराचा महाकाय हत्ती' कोणालाही दिसत नाही किंवा बघायचा नसतो, हे�� खरे दुर्दैव आहे !
सत्तेचा माज बघा वरून खालपर्यंत कसा आला आहे ...
डोंबिवली मध्ये शिंदे सेनेच्या नगरसेवकाकडून महिला डॉक्टर आणि परिचारिका यांना मारहाण ...
तर महाड मध्ये भाजप च्या नगरसेवकाकडून मुख्याधिकारी यांना मारहाण ...
तरी बोलायचे नाही .. कारण महाराष्ट्राचा अपमान होतो ...
आज महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार स��नेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेल्या, माझ्या भाषणात दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ देताना विन्स्टन चर्चिल यांचा मुद्दा मांडताना मी चुकीने व्ही फॉर व्हिक्टरी आणि व्ही फॉर विन्स्टन म्हटलं. खरंतर मला भाषणाच्या मांडणीत व्ही फॉर इनव्हिन्सीबल असं अपेक्षित होतं. वी आणि व्ही मधे बोलताना गडबड झाली. ही च��क नंतर माझ्या लक्षात आली म्हणून त्याचं स्पष्टीकरण दिलं. बाकी मुद्दे आणि भाषणाची चित्रफीत सोबत जोडली आहेच.
१) २००८ ला रेल्वे भरती प्रकरणावरून आंदोलन झालं, त्यातून पक्ष वाढत गेला, पक्ष मोठा होत गेला. पक्षाला चिन्ह देखील रेल्वे इंजिन मिळालं. २००८ ला जे रेल्वेचं आंदोलन आपण केलं होतं ते विसरू नका. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीत मराठी टक्का वाढला पाहिजे यासाठीचं ते आंदोलन होतं. त्यावेळेस माझ���यासकट असंख्य महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या, जेलमध्ये टाकलं गेलं. खरंतर प्रश्न साधा होता. महाराष्ट्रात जर रेल्वे भरती आहे तर त्याच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रांत न येता त्या उत्तरेकडच्या राज्यांच्या वर्तमानपत्रांत कशा येतात यावरून ते आंदोलन सुरु झालं. त्यावेळेस इथल्या स्टेशनांवर ही उत्तर प्रदेश बिहारच्या तरुणांची गर्दी होती. आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी जेंव्हा त्यांना विचारलं की तुम्ही इकडे कशाला आलात त्यावेळेस त्यांच्यातल्या ��ाही लोकांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना शिव्या दिल्या, त्यातून आंदोलन उभं झालं. पुढे या आंदोलनामुळेच हजारो मराठी तरुण-तरुणींना रेल्वेत नोकरी मिळाली. त्यामुळे रेल्वे भरतीवर महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे.
२) मिसिंग लिंकवर दरड कोसळून तिकडे पाणी गळत होतं यावर लोकांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री म्हणतात या घटनेवर राजकारण करू नका. अरे वा ! ��ुम्ही दुसऱ्यांच्या वेळेस काय करत होतात ? तेंव्हा तुम्ही जी आंदोलनं केली, टीका केली, ते राजकारण नाही आणि हे मात्र राजकारण. मुख्यमंत्री म्हणतात एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राला काही बोलू नका. लोकं मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात कुठे महाराष्ट्राचा अपमान आला? हे वरपासून खालपर्यंत सुरु आहे. केंद्राची एखादी गोष्ट चुकली आणि तुम्ही काही बोललात की तुम्ही देशविरोधी. लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत ? इतके दिवस सत्ताधारी जे ट्रोलिंग विरोधकांना करत होते, ते यांच्या अंगलट आलं आहे. आज यांच्यावर जेंव्हा दामदुप्पट टीका सुरु झाली तेंव्हा हे मात्र कांगावा करायला लागलेत.
३) राम मंदिरा��्या दानपेटीतील अपहाराबद्दल बोललो की म्हणे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती याच्यात धर्म कुठे आला ? राममंदिराबद्दल आम्हाला पण आस्था आहे. पण तिथे जेंव्हा १४०० कोटी गायब होतात तेंव्हा आम्ही बोलायचं नाही. बरं आम्ही बोलल्यावर आम्हाला म्हणणार वक्फ बोर्डावर का नाही बोलत. आम्हाला काय करायचं आहे वक्फ बोर्डात काय सुरु आहे त्याच्याशी? या देशातील हिंदू भाविकांनी श्रद्धेने देवाला अर्पण केलेल्या ���ैशाचा अपहार होतो यावर बोललो की तुम्ही आम्हाला धर्मविरोधी ठरवणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे म्हणाले की गैरहिंदू या घटनेचा गैरफायदा घेतील. काय बोलताय ? या ट्रस्टवर भाजप, आरएसएस आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांची लोकं आहेत. कल्पना करा असा अपहार भाजप सत्तेत नसताना झाला असता तर? भाजप असो आरएसएस असो की विश्व हिंदू परिषद असो यांनी मोर्चे काढले असते, आंदोलनं काढली असती. त्या��ा राजकारण म्हणलं असतं तर कोणी ?
४) २००५ ला मुंबईत प्रचंड ढगफ��टी होऊन काही तासांत हजार मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडला होता. त्यावेळेस मुंबई पाण्याखाली गेली होती. यावेळेस ३०० मिलीमीटर पाऊस झाला तरी मुंबईची तशीच अवस्था झाली. त्यावेळेस टीका करणारे आज गप्प का आहेत ? या सगळ्यावर भाजपचे एक मंत्री म्हणतात, ही नैसर्गिक आपत्ती आहे यावर टीका करू नका. तुमच्याकडून झालं की लगेच नैसर्गिक आपत्ती आठवते का ?
५) काल मुख्यमंत्री विधिमंडळात म्हणाले मिसिंग लिंकवर राजकारण करणाऱ्यांना बघून घेईन. ही कुठली भाषा ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ना तुम्ही ? बरं ते झाल्यावर हिंदीत पण तेच बोलले ? कोणासाठी हिंदीत बोललात ? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदीत का बोलतो ? बहुदा वरच्यांना सांगत असतील बघून घेईन म्हणून.
६) आज महाराष्ट्रातील शहरांचा विचका करून ठेवला आहे, आणि याला हे विकास म्हणतात. रस्ते, फ्लायओव्हर्स म्हणजे विकास नाही. हे आमदार खासदार परदेशात जाऊन नक्की काय बघतात हे कळत नाही मला. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आत्ता शहरातील बांधकामं थांबवा.
१ मे ला मिसिंग लिंकचं उदघाट्न झालं आणि पुढे ६०,६५ दिवसांत तिथे पिलर पडून तिथे पाणी गळायला लागलं. फडणवीसांनी भाषणात मिसिंग लिंक ��्रोजेक्टला कुठल्या कुठल्या देशातले सल्लागार आणले हे सांगितलं. आणि पुढे आमचा कॉन्ट्रॅक्टर भारतीय हे सांगितलं. इतके सगळे बाहेरून आणले मग कॉन्ट्रॅक्टर तिकडचाच आणायचात. या सगळ्याची वाट लावायला आमचा कॉन्ट्रॅक्टर आहेच. आज कंत्राटदारांना ५६% द्यावे लागतात म्हणे. जर उरलेल्या ४४% मध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला अशाच दर्जाचे रस्ते आणि कामं मिळणार.
७) ब्रिटिशांनी बांधलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आज देखील उभं आहे, ब्रिटिशांच्या काळात उभे राहिलेले ब्रिज अजून टिकून आहेत. अमेरि��ेत उभी राहिलेली एम्पायर स्टेट बिल्डिंग १४ महिन्यात उभी राहिली पण आज देखील उभी आहे. मग आपल्याकडे काय घडतं नक्की ?
८) नितीन गडकरींच्या खात्याचं काम रस्ते बांधायचं. पण ते सोडून ते बोलत आहेत पेट्रोलमध्ये किती इथेनॉल मिसळायचं यावर. हे तुमचं काम नाही ते पेट्रोलियम मंत्री बघून घेतील.
९) इतकं सगळं घडून पण लोकांना राग येत नाही. लोकांना जो काही राग येतो तो ते मोबाईलवर व्यक्त करतात आणि शांत बसतात. म���ा कोणाची सत्ता आहे किंवा नाहीये याने काही फरक पडत नाही. भाजपचा एक आमदार, विधिमंडळात लोकं कशी गटारात पडून मरत आहेत, झाडं पडत आहेत यावर चर्चा सुरु आहे म्हणून हसतोय. भावनाशून्य झाले आहेत हे सगळे. आणि हे भावनाशून्य झालेत कारण लोकांना राग येत नाहीये.
१०) आपले सत्ताधारी, आमदार फोडता येत आहेत का, खासदार फोडता येत आहेत का, नगरसेवक फोडता येतील का यातच रमले आहेत.
११) लोकशाही कशी जिवंत असते याचं एक उदाहरण सांगतो. याच्या आधी पण सांगितलं आहे पण प��न्हा सांगतो. दुसरं महायुद्ध विन्स्टन चर्चिल यांच्या नेतृत्वाखाली जिंकलं. त्याबद्दल संपूर्ण इंग्लडने त्यांना डोक्यावर घेतलं पण पुढे ८ महिन्यांनी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. कारण लोकांनी सांगितलं तुम्ही युद्ध काळात उत्तम कारभार केलात पण म्हणून शांततेच्या काळासाठी तुम्ही योग्य नाहीत. माणसं किती सुज्ञ असतात बघा. माणसं फक्त सुशिक्षित असून चालत नाहीत ��र ती सुज्ञ असावी लागतात. ज्या देशातील समाज सुज्ञ असतो त्याच देशाची प्रगती होत असते.
१२) मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकची झालेली घटना मान्य करून, खरंतर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं म्हणायला हवं होतं. पण ते सोडून ते म्हणत आहेत की मी बघून घेईन. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही कुठली भाषा आली ? एक खासदार सांगतो बॉम्ब टाकेन, माझ्यावर ५ खुनांचे आरोप आहेत असं सांगतो. तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही.
१३) आज महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही सतर्क ��हा. मराठी मुलांना नोकऱ्या मिळत आहेत का, त्यांना टेंडर मिळत आहेत का, त्यांना कामं मिळत आहेत का पहा.
राज ठाकरे ।
On 8 February 2026, at an event in Mumbai, RSS Chief Mr. Mohan Bhagwat made a statement to the effect that insisting on language and occasionally agitating for it is a kind of disease.
Several dignitaries from different fields were invited to this event, and some of them actually attended. But I would like to tell Mohanrao Bhagwat clearly: They did not attend out of affection for you; they did so out of their fear of Narendra Modi’s government. Otherwise, why nobody ever attended such dull and boring sermons before? So first, please come out of the misconception that they came there for you.
Anyway…
Firstly, we assume Mr. Bhagwat surely knows the history of why reorganization of the states along linguistic lines became a necessity in this country.
If love for one’s language and one’s region seem like a disease to Mr. Bhagwat, then we would like to point out that this ‘disease’ is rampant across majority of the states in this country.
From Karnataka to Tamil Nadu in the South, there are strong linguistic and provincial identities. The same sentiment exists in West Bengal, Punjab, and even Gujarat.
Has Mr. Bhagwat tried to understand what this sentiment really is? When large groups from four or five states migrate en masse to other states, behave arrogantly there, reject the local culture, insult the local language, and create their own vote banks, resentment builds among the local people, leading to eruptions. You call this a disease? And if this is a disease, as you say, then it has spread to Gujarat as well. When thousands of people from Uttar Pradesh and Bihar were chased out of Gujarat, why didn’t you go there to give lessons on harmony? Why didn’t you give the same lessons in Karnataka, Tamil Nadu, Andhra Pradesh, Punjab, or West Bengal?
It is not because the Marathi people are tolerant, but because the rulers here are spineless, that Mr. Bhagwat dares to speak this way. A few months ago, just before elections, Bhaiyyaji Joshi provoked the Marathi people by saying that Mumbai’s language is not only Marathi but also Gujarati, attempting to woo Gujarati speakers. All this was done to see how the BJP could benefit indirectly. Why should the Rashtriya Swayamsevak Sangh—which calls itself a non-political organization—get involved in such matters in the first place?
We have respect for the work of the Sangh, but that does not mean it should indulge in taking indirect political stance. And if you insist on doing so, then first show the courage to reprimand the government for imposing Hindi across the country (which, incidentally, is not even the national language), and only then lecture us on harmony.
And do not try to force-fit ‘Hindutva’ in all this. I have said this many times: If Hindus get attacked, we will retaliate as Hindus. It was the Maharashtra Navnirman Sena that took out a march against the riots instigated by the Raza Academy, that agitated against loudspeakers on mosques, and that took a stand against the nuisance caused to citizens by loud DJs and loudspeakers during Hindu festivals as well. What is wrong is wrong—we say it plainly. When will you, Mohanrao? There’s chaos unfolding across the country in the name of Hindutva—when will you speak about it? The grotesque manner in which women are made to dance during Kanwar Yatras in North India, the fact that India ranked 9th in beef exports in 2014, but is now ranked 2nd, and the spectacle of politics around cow slaughter that is being staged within the country, provoking communal frenzy—when will you speak about all this? When will you take the government to task over those traders?
Anyway, what you choose to do is up to you. For us, the Marathi language and the Marathi people are the ultimate and supreme priority.
Linguistic and regional identities will continue to exist in this country, and they will certainly continue to exist in Maharashtra as well. This is our ‘raison d'etre’, and whenever such situations arise, Maharashtra will rise with fury.
Raj Thackeray
आज २० जून २०२६ रोजी, मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे जिल्हा आणि महापालिका क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
- मतदारयादी पुनर्निरिक्षण (SIR) या गोष्टीकडे दुर��लक्ष करू नका, आपलं मतदार याद्यांकडे ��क्ष नसल्याने काय गोष्टी घडू शकतात हे आपण पाहिलं.
- महाराजांच्या जिरेटोपावर जैनांचा झेंडा, हे इथपर्यंत गेलं? या गोष्टी जाणूनबुजून सुरू आहेत का? निवडणूक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी हे सुरू आहे का याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
- आम्ही हातात बांगड्या नाहीत भरल्या असं म्हणणाऱ्याने मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी? आम्हाला वाद नको आहेत पण वाद उकरू��� काढणार असाल तर आम्ही रस्त्यावर उभे राहू.
- तुम्ही धर्माचं काम करत आहात, ते करत राहा. उगाच नको ते उद्योग कशाला करता? मध्यंतरी कबुतरांचा विषय आला, आता पांढरी पट्टी, हे सगळं राजकारण्यांच्या नादी लागून करतायेत.
- आपल्याकडे खासदार फोडणं सुरू आहे, सत्तेसाठी राजकारण सुरू आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपेक्षा जनतेनं लक्षं ठेवलं पाहिजे. एक जुनं वाक्य आहे "स्���ाभिमान मेला की उरतात फक्त ��िवंत प्रेतं."
- इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार देशात सर्वात जास्त २२,१७४ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. आज शेतकरी आत्महत्या करतायेत, नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थी आत्महत्या करतायेत. राज्यात लहान मुलं, मुली पळवण्याचे प्रकार घडतायेत. एवढं सगळं सुरू असताना आपल्याकडे खासदार, आमदार, नगरसेवक फोडण्याचं काम सुरू आहे.
- या आमदार, खासदार पळवापळवीमध्ये आपण आपल्या मुलभूत गोष्टी विसरून ��ातोय. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा इतिहास, देशाची परंपरा आपण विसरत चाललोय.
- केंद्राच्या रिपोर्टनुसार MSEDCL ला पॉवर डिस्ट्रिब्युशनमध्ये १०० पैकी दीड गुण मिळालेत. MSEDCL चा आता IPO येत आहे अशावेळी दीड टक्का मिळालेल्या कंपनीत गुंतवणूक करायला कोण येणार? कंपनी अदानीच्या हातात देऊन महाराष्ट्राचा वीज पुरवठा ताब्यात घेण्याचं हे कारस्थान आहे.
- कोण सत्तेवर आहे याने मला फरक पडत नाही. सत्तेवर बसून तुम्ही काय करताय याने मला फरक पडतो. सत्तेवर बसून चुकीचे पायंडे पा��ले जातायेत याचं कोणाला भान उरलेलं नाहीये.
- आपलं आंदोलन घरापर्यंत पोहोचतं पण घर मतपेटीपर्यंत पोहोचत नाही याला काय म्हणायचं? आपल्या आजूबाजूला काहीतरी षडयंत्र रचलं जातंय याची आपल्याला कल्पना आहे का?
- लवकरच जनगणना सुरू होत आहे. माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, डोळ्यात तेल घालून या जनगणनेवर लक्ष ठेवा. काही ठिकाणी, घर गणनेच्या वेळेस भाजपचे लोकं तिकडे हजर असतात. ते अंदाज घेत आहेत की या घरात आपले मतदार आहेत का नाही? जर त्यांना वाटलं, नाही तर त्यांची नावं काढून टाकण्याच्या हालचाली सुरु होतात. तुम्ही आंदोलनं करता, ती लोकांना आवडतात, लोकांपर्यंत पोहचतात पण त्यांची मतं आपल्यापर्यंत का पोहचत नाहीत याचा विचार करा. ३ वर्षांनंतर निवडणुका आहेत म्हणून गाफील राहू नका.
- निवडणुकीचा खेळ कसा खेळला जातोय, किती चालाखीने खेळला जातोय याची कल्पना आपल्याला नसेल तर निवडणुका लढवण्याला काहीही अर्थ नाही.
- मी २०१९ला सांगत होतो निवडणुकांवर बहिष्कार टाकायला हवा, ज्या प्रकारचं राजकारण, ज्या प्रकारच्या निवडणुका सध्या सुरू आहेत हे पाहता हाताला काही लागणार नाही. आणि लागलं तरी हे आमदार, खासदार पळवून नेतील.
राज ठाकरे ।
माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, हितचिंतकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र,
१४ जून या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी गेली अनेक वर्ष तुम्ही सगळे जणं मला उत्साहाने भेटायला येता, शुभेच्छा द्यायला येता, येताना पुष्पगुच्छ, मिठाई, केक घेऊन येता, राज्यभर होर्डिंग्स ला��ता . वाढदिवसाच्या दिवशी माझ्या जवळच्या लोकांना भेटणं हे खरंच आनंददायी असतं. पण यावर्षी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबईत नसल्यामुळे तुमची भेट होऊ शकणार नाही.
पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की माझा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा. शुभेच्छांची होर्डिंग्स लावून, शहरंच्या शहरं रंगवण्याच्या ऐवजी हा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने तुम्ही साजरा करावा, असं माझं तुम्हाला आवाहन आहे.
यावर्षी १४ जूनला राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं तुमच्या परिसरात लावा. फळांची आणि फुलांच्या झाडांना उन लागत त्यामुळे त्यांना उन आणि पाणी मिळेल अशाच ठिकाणी लावा ! फळांची आणि फुलांची झाडं याकरता जेणेकरून ती दिसतातही छान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी आकर्षित होतात ! बरं पुन्हा ती रस्ते रुंदीकरणात तुटली जाणार नाहीत याचीही काळजी घ्या ! झाडं लावताना ती मोठी झाडं लावा जेणेकरून ती टिकतील , बऱ्याचदा छोटी रोपं लक्ष नाही दिलं तर टिकत नाहीत! अशी झाडं नर्सरीत मिळतात, ती योग्य जागा बघून तुमच्या भागातील स्थानिकांच्या हस्ते त्यांचं रोपण करा. आणि तिथल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना देखील या नव्याने लावलेल्या रोपांची, झाडांची काळजी घेणं, त्याला पाणी घालणं या उपक्रमात सामील करून घ्या, जेणेकरून ती झाडं दीर्घकाळ टिकतील.
तसंच उन्हाळ्यातच नाही तर हल्ली अगदी जानेवारी फेब्रुवारीपासूनच प्राणी, पक्षी पाण्यासाठी वणवण फिरताना आढळतात. यावर्षी जर पाऊस कमी झाला त��� पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्राणी पाण्यासाठी वणवण फिरणार आहेत. त्यामुळे प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी जंगलांच्या तोंडाशी, अगदी शहरांमध्ये सुद्धा भटक्या प्राण्यांसाठी पाणवठे उभारा आणि फक्त पाणवठे उभारून थांबू नका तर त्यात कायम पाणी असेल असं पहा. साधारणपणे १ ते १.५ महिन्यांपूर्वी चंद्र्पुरमध्ये प्राणी जंगलातून बाहेर येऊन शहरांत पाण्यासाठी वणवण भटकत आहेत अशी दृश्य मी पाहिली, आणि मी तात्काळ माझा चंद्रपूरमधला सहकारी मनदिप रोडेला फोन करून प्राण्यांसाठी पाणवठे करायला सांगितलं. आणि त���याने तात्काळ ते पाणवठे तयार केले. त्यामुळे असेच पाणवठे तयार करा. आणि पाणवठे असोत की वृक्षारोपण असेल, दोन्ही करताना शासकीय यंत्रणेला पण बरोबर घ्या.
यावर्षीचा उन्हाळा हा भीषण होता, आणि हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की यावर्षीचा पावसाळा हा सरासरीत कमी असणार आहे. यावर्षी जर पाऊस कमी पडला तर त्याचा थेट परिणाम पुढच्या वर्षीच्या उन्हाळयात जाणवणार आहे. बरं हे एक वर्ष घडलं आणि पुढे सगळं आलबे�� असेल असं नाही. सध्या राज्यात आणि देशांत वृक्षतोड्यांचं राज्य चालू आहे. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. त्यामुळे कदाचित जसं प्राणिसंग्रहालयात जाऊन लहान मुलांना प्राणी दाखवायला लागतात तशी भविष्यात मुलांना झाडं दाखवायला कुठेतरी न्यावं लागेल. त्यामुळे आत्ताच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी झाडं लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत, कारण सध्या झाडांची जंगलं उध्वस्त करून इमारतींची जंगलं उभी करण्यातच सरकार व्यस्त आहे ! म्हणूनच हा उपक्रम आपण हाती घेत आहोत.
फक्त झाडं लावताना जसं स्थानिकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबवा तसा तो एक दिवसाचा सोहळा होणार नाही किंवा फोटो काढून सोशल मीडियावर टाकून फक्त लाईक्स कमवले असं करू नका. आपल्याला लाईक्स आणि व्ह्यूज नाहीत तर झाडं लावून लोकांचे आणि निसर्गाचे आशीर्वाद कमवायचे आहेत.
बाकी जरी १४ जूनला भेट होऊ शकत नसली तरी लवकरच आपली भेट होईल तेंव्हा सविस्तर बोलूच.
आपला नम्र
राज ठाकरे ।
तुमच्यासाठी “राज ठाकरे” हे नाव असेल फक्त,
आमच्यासाठी भावना आहे.
हे वाक्य तुमच्याविषयी तळमळ असणाऱ्यांपैकी प्रत्येकाचं आहे असं वाटतं. मी अपवाद नाही.
साहेब ,
तुमचं महत्त्व माझ्यासाठी आणि ज्यांच्या मनात तुम्ही वसता त्यांच्यासाठी कधीच कमी होणार नाही. तुम्ही महाराष्ट्रासाठी बघितलेलं स्वप्न लवकरच सत्यात उतरु दे , तुम्हाला निरोगी आयुष्य लाभू दे ,कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करण्याचं बळ तुम्हाला मिळूदे आणि राजकारणासारख्या रुक्ष वातावरणत स्वतः तील संवेदनशीलता जपता येऊदे अशी तुमच्या वाढदिवसानिमित्त ईश्वराकडे प्रार्थना करते.
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
हसत रहा .
खुप प्रेम.
जय महाराष्ट्र
सस्नेह जय महाराष्ट्र,
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत.
बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुल�� उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?
सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही.
२००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच��या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. म���मोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ?
ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका 'रेवड्या' वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ?
पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं.
गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदा�� भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ ���े पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा.
लालबहाद्दूर शास्त्रीजींनी पाकिस्तान युद्धाच्या वेळेस असंच आवाहन केलं होतं पण त्यात त्यांनी स्वतः ते कृतीत उतरवलं होतं. अशी कृती स्वतः पंतप्रधान करतील का आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांकडून करून घेतील का ? हे केलंत तर देश पण करेल. आणि तसाही पर्याय काय आहे ? येत्या काळात सरकारला पेट्रोल डिझेलचे भाव दणदणीत वाढवायचे असणार त्याची पूर्वतयारी सुरु आहे. हे भाव वाढले की लोकं आपोआप न परवडल्यामुळे वापर कमी करणार आहेत.
माझी पंतप्रधानांना विनंती आहे की नैतिक आवाहन आणि त्याचा भार लोकांनी सहन करायचा हे सगळं बास झालं. एकदा मान्य करूया की अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत झाली आहे आणि यांचं नुसतं खापर इराण - इस्रायल युद्धावर टाकू नका ! आपण पंतप्रधान झाल्या पासून रूपयाचं अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झालं ,हे कशामूळे झालं ते सांगा ! तुमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बॅंकेच्या तीन गव्हर्नर्सनी राजीनामे दिले ते का दिले ? मनमोहन सिंह हे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर होते तसेच विद्वान होते तरीही ते अनेक तज्ज्ञांबरोबर बसून चर्चा करायचे , ऐकून घ्यायचे . आपण तर साधा व्यवसाय सुद्धा केलेला नाहीत तर आपल्याला हे कसं समजणार ? तुमची मन की बात खूप झाली आता खऱ्याखु��्या अर्थतज्ज्ञांची मन की बात पण ऐका.
तुम्ही काय पाऊलं उचलणार आहात हे जनतेला सांगा. संसदेला सांगा. तसंही हवं तेंव्हा विशेष अधिवेशन घेण्याची प्रथा पडली आहेच. त्यामुळे संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली आहे यावर सगळ्यांना उत्तर द्या. तुमच्या अनेक भूमिकांना आमचा विरोध होता आणि आहे. तसेच तुमच्या चांगल्या केलेल्या कामांचेही समर्थन केलेलं आहे परंतू आजच्या परिस्थितीत आमच्यासकट कोणीही तुमचे विरोधक नाही अथवा शत्रू नाही. असला आक्रस्ताळेपणा आमच्यात नाही. पण म्हणून प्रश्न विचारायचे नाहीत असं होणार नाही. ते आम्ही विचारणार. तेंव्हा पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरु करावी आणि हे सगळं कसं निस्तरणार हे देशाला सांगावं !
राज ठाकरे ।
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
दरवर्षीप्रमाणे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला जाऊन, या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
हा दिवस या हुतात्म्यांच्या स्मरणाचा जसा आहे, तसा तो मुंबईसारखं शहर जे घडवण्यात मराठी माणसांनी स्वतःचा घाम, रक��त ओतलं आणि हे शहर आपल्याला मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याचं स्मरण करण्याचा दिवस आहे.
पण मला गेली अनेक वर्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे, सरकार जसे औपचारिकता म्हणून अनेक दिवस साजरे करतं तसा हा अजून एक सरकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आहे. या स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता. सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे ?
वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त���यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल असा काही भाव सरकारच्या मनात आहे का ? हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकाने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय.
मला तर असं पण वाटून गेलं की सरकारची इच्छा लवकरात लवकर मराठी माणसाला या स्मारकाचा विसर पडावा अशी आहे की काय ?
बरं, सरकारकडून अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षांची पूर्तता होणार नाही याची जवळपास खात्री पटली आहे.
पण मराठी माणसाला काय झालं आहे? मुंबईतील हुतात्मा स्मारक हे फक्त मुंबईतील नाही तर राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे. खरंतर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी. इथे मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी फक्त मुंबई आणि आसपासच्या परिसरातून नाही तर राज्यभरातून धडकायला हव्यात. मिरवणुका निघायला हव्या. पण सरकार इतकीच अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न का झाली आहे ? मुंबई हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कणा आहे. हे शहर आपण मराठी माणसांनी घडवलं, याला आकार आपण दिला आणि आपण ते लढून मिळवलं. पण हे सगळं आपण विसरलो आहोत.
माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका. या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते ती हे शहर या राज्याचा भाग होतं म्हणून झाली आहे हे विसरू नका आणि याची जाणीव इतरांना देखील जास्तीत जास्त करून द्या. आणि याचा अभिमान बाळगा. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून १ मे ला इथे येऊन हुतात्म्यांना वंदन करा आणि राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनी देखील जरूर भे��� द्या. हे झालं तर सरकारला पण दखल घ्यावी लागेल.
मी गेली अनेक वर्ष जे सातत्याने सांगतोय तेच पुन्हा सांगतो, जर आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, आणि प्रांताचा जाज्वल्य अभिमान बाळगला तर आणि तरच बाहेरचे आपल्या भाषेचा आणि प्रांताचा सन्मान करतील.
राज ठाकरे ।
पुण्यातील वसंत व्याख्यानमालेच्या १५१ व्या ज्ञानसत्रात, 'माझ्या मनातील महाराष्ट्र, मराठी अस्मिता' या विषयावर माझं व्याख्यान झालं. महाराष्ट्र हा असा प्रांत आहे की तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रातली उत्तुंग व्यक्तिमत्व या भूमीत जन्माला आलेले आहेत. या सगळ्यांनी फक्त महाराष्ट्राला आकार दिला असं नाही तर त्यांनी देशाच्या भावविश्वाला आणि विचारवि��्वाला आकार दिला. अशा महान व्यक्तींचा महाराष्ट्राला काहीसा विसर पडला आहे असं हल्ली जाणवतं.
आपण कोण आहोत, कोणाचे पूर्वज आहोत याचं अच��क भान आपल्याला आलं तर आपलं वर्तमान आणि भविष्य उज्वल असेल. त्यासाठी महाराष्ट्राच्या उज्वल परंपरेचा एक पट मी पुन्हा एकदा वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने मांडायचा प्रयत्न केला. आज १५० हुन अधिक उत्तुंग माणसांविषयी अगदी थोडक्यात व्यक्त झालो. अर्थात ज्यांच्याबद्दल बोलता आलं त्याच्या इतकीच किंवा त्याहून मोठी यादी ज्यांची नावं घेता आली नाहीत त्यांची आहे याची मला पूर्ण जाणीव आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हा योग जुळून आला हा विशेष आनंद आहे. राजकीय नेत्यांचं काम हे फक्त राजकारण करणं इतकं नाही तर जमेल तेंव्हा प्रबोधन करणं हे पण आहे हे मानणाऱ्यातला मी आहे. त्यामुळे हे व्याख्यान तुमच्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या मराठी भाषेसाठी आणि आपल्याकडे जी रत्न जन्माला आली त्यांच स्मरण करून त्यातून बोध घेण्यासाठी जरूर ऐका.
https://t.co/0vOjM57rAs