भारताच्या जीडीपीने ७.८ टक्क्यांची वाढ नोंदवल्याबद्दल देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी, केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारमनजी आणि एनडीए सरकारचे हार्दिक अभिनंदन!
#Shivsena#EknathShinde
📍 #नवी_दिल्ली |
नवी दिल्ली येथे विविध राज्यांच्या #शिवसेना राज्यप्रमुखांची आढावा बैठक आज शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मोठ्या उत्साहात पार पडली. शिवसेनेचा विस्तार राज्याराज्यांत अधिक जोमाने करण्याचे आवाहन याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी केले.
शिवसेना हा सर्वसामान्य जनतेचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष असून पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि शिवसैनिकाने आपल्या लोककल्याणकारी कामाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शिवसेना पोहोचवावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
* शिक्षण, क्रीडा, रोजगार, महिला, आरोग्य, पाणी, रस्ते आणि कृषी या मुद्द्यांवर प्रभावी पद्धतीने काम करावे.
* गरज पडल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलने करावीत.
* पक्षाची पकड तळागाळात अजून मजबूत करण्यासाठी राज्यांमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे.
* सर्व राज्यांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या त्वरित नियुक्त्या कराव्यात. राज्यस्तरीय पदाधिकारी, महिला आघाडी प्रमुख, युवासेना आणि इतर अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची निवड करावी.
* आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पुढील दोन महिन्यांत ठोस 'कृती आराखडा' पक्ष नेतृत्वाला सादर करावा.
* राज्यांमध्ये व्यापक स्तरावर 'शिवसेना सदस्य नोंदणी अभियान' राबवून पक्ष शेवटच्या घराघरात पोहोचवावा.
* शिवसेनेच्या वतीने देशातील २५ राज्यांत रुग्णवाहिका देण्यात येतील.
* पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस आणि त्यांचा २५ वर्षांचा यशस्वी सार्वजनिक सेवा कालावधी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून भव्य-दिव्य प्रमाणात साजरा करावा, अशा विविध विषयांवरती काम करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राज्य प्रमुखांना दिले.
यावेळी शिवसेना राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्यासह दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, ओडिशा, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश अशा १५ राज्यांतील राज्यप्रमुखांसह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde
📍मंचर, #पुणे |
मंचर येथील शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न...
पुणे जिल्ह्यातील मंचर येथील #शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, वारकरी आणि महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी शिवसेनेची शाखा सदैव कार्यरत राहील. शिवसेनेची शाखा म्हणजे सर्वसामान्यांसाठी न्याय मिळवून देणारे पवित्र मंदिर असून या माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीला आधार देण्याचे काम केले जाईल, अशी ग्वाही याप्रसंगी शिंदे साहेबांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधताना दिली.
कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हीच संघटनेची ताकद असल्याचे यावेळी शिंदे साहेबांनी स्पष्ट केले. तसेच रमेश येवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आमदार शरद सोनवणे, शिवसेना सचिव राम रेपाळे, मावळ लोकसभा सह - संपर्कप्रमुख विकास रेपाळे, रमेश येवले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #Eknathshinde
जागतिक संकटाच्या काळातही भारताचा जीडीपी ७.८ टक्के झाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी, केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारमनजी आणि एनडीए सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन!
#Shivsena#EknathShinde#maharashtra
टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF)च्या राष्ट्रीय समितीतील सदस्य तसेच विविध राज्यांचे अध्यक्ष यांच्यासोबत नुकतीच वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. यावेळी फेडरेशनच्या माध्यमातून आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध टेनिस क्रिकेट स्पर्धांच्या नियोजन व आयोजनाबाबत सविस्तर चर्चा केली. देशभरातील खेळाडूंना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, टेनिस क्रिकेटला संघटित आणि व्यावसायिक स्वरूप देणे तसेच या खेळाचा राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक विस्तार करण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर संवाद साधला. तसेच यावेळी ITCSFच्या बॅचचे देखील अनावरण करण्यात आले.
यावेळी ITCSFचे सर्व मान्यवर पदाधिकारी मंडळी उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #itscf
📍 #नवी_दिल्ली |
नवी दिल्ली येथे विविध राज्यांच्या #शिवसेना राज्यप्रमुखांची आढावा बैठक आज मोठ्या उत्साहात पार पडली. शिवसेनेचा विस्तार राज्याराज्यांत अधिक जोमाने करण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
शिवसेना हा सर्वसामान्य जनतेचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष असून पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि शिवसैनिकाने आपल्या लोककल्याणकारी कामाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शिवसेना पोहोचवावी असे आवाहन यावेळी केले.
* शिक्षण, क्रीडा, रोजगार, महिला, आरोग्य, पाणी, रस्ते आणि कृषी या मुद्द्यांवर प्रभावी पद्धतीने काम करावे.
* गरज पडल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलने करावीत.
* पक्षाची पकड तळागाळात अजून मजबूत करण्यासाठी राज्यांमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे.
* सर्व राज्यांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या त्वरित नियुक्त्या कराव्यात. राज्यस्तरीय पदाधिकारी, महिला आघाडी प्रमुख, युवासेना आणि इतर अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची निवड करावी.
* आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पुढील दोन महिन्यांत ठोस 'कृती आराखडा' पक्ष नेतृत्वाला सादर करावा.
* राज्यांमध्ये व्यापक स्तरावर 'शिवसेना सदस्य नोंदणी अभियान' राबवून पक्ष शेवटच्या घराघरात पोहोचवावा.
* शिवसेनेच्या वतीने देशातील २५ राज्यांत रुग्णवाहिका देण्यात येतील.
* पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस आणि त्यांचा २५ वर्षांचा यशस्वी सार्वजनिक सेवा कालावधी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून भव्य-दिव्य प्रमाणात साजरा करावा.
यावेळी शिवसेना राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्यासह दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, ओडिशा, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश अशा १५ राज्यांतील राज्यप्रमुखांसह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde
@Shivsenaofc
आज छत्रपती संभाजी नगर येथील उबाठा गटाच्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या विविध लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी फुलंब्री नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, नगरसेविका कुरेशी हलीमाबी अब्दुल मजीद, नगरसेवक पठाण जावेद याकुब खान, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व नगरसेविका सय्यद चिस्ती मसरत जफर, नियोजन व दिवाबत्ती समितीचे सभापती व नगरसेवक सुषमेष प्रधान तसेच सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती व नगरसेविका अर्चना दुतोंडे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक जमीर सगिर पठाण, प्रशांत राजेंद्र नागरे, अरशिया रिजवान खान, हिना मुद्द्सर पटेल तसेच उबाठाचे ऋषिकेश घाट, आदित्य पाटील, भगवान पाटील यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रवेश केला. यावेळी त्यांचे शिवसेनेत जाहीर स्वागत करून सर्वांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #shivsenapakshpravesh