स्वतःच्या शरीर, मन व वैचारिक स्वावलंबनासाठी वेळ आणि पैसा गुंतवत राहणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे. कारण आपले व्यक्तीमत्व त्यातून पारदर्शी होतं आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मदत करतं.
#liberal
दैनंदिन जीवन जगत असताना आपण ज्यांच्यासोबत
जगतो ते लोक, ज्याच्या कुशीत जगतो तो निसर्ग
आणि आपली बेसिक नीड असणारा पैसा या तिन्ही
गोष्टी जपल्या पाहिजेत.
#liberal
शिवजयंतीनिमित्त आर्थिक स्वातंत्र्याचा व
निसर्गासाठी लढण्याचा निर्धार करायला हवा.
कारण सध्याच्या घडीला हे दोन प्रश्न प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहेत.
#liberal
मनाची शांतता, शरीराची सदृढता, वैचारिक
स्वावलंबन व जगण्यासाठी एक अंतिम उद्देश यात
दैनंदिन जीवनातील वेळ गुंतवणे आवश्यक आहे व
यामधूनच आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे ही काळाची गरज आहे.
#liberal
सध्या सर्वजण ज्या मार्गाने पैसे कमवतायेत व जग पैसे कमवण्यासाठी ज्या मार्गांचा अवलंब करायला सांगतय. त्या मार्गांचा अवलंब न करता दैनंदिन जीवनात मी ज्या आवडत्या गोष्टी करतोय व भविष्यात मला ज्या आवडत्या गोष्टी करायच्या आहेत. यातून मला आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग निर्माण करायचा आहे.
पैसा हा एक बेसिक नीड आहे. त्यासोबतच तो बचत व गुंतवणूकीचा भाग ही आहे. दैनंदिन गरजा व येणारे अनिश्चित धोके टाळण्यासाठी तो बचत करणे व गुंतवणूक करणे गरजेचे आहे. पण निव्वळ भौतिक दिखाव्यासाठी त्याचा वापर करणे चुकीचे.
#liberal#FinancialFreedom
माणसाला अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, हवा, झाड व माती या सर्व गोष्टी निसर्गापासून मिळतात. पण सतराव्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर ते आतापर्यंत माणसाने या सर्व गोष्टींची खूप नासधूस केली आहे. याचे परिणाम म्हणून क्लायमेट चेंजची भिषण समस्या आपल्यासमोर उभी आहे.
#liberal#climate
आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे म्हणजे वेळ व पैसा यांची सांगड घालणे. वेळेची बचत व गुंतवणूक भविष्याधारीत करिअर फिल्डशी रिलेटेड योग्य सवयी लावण्यात करणे आणि पैश्याची बचत व गुंतवणूक या सवयींसाठी करणे या गोष्टींचा समावेश यात होतो.
#liberal
नैसर्गिक बदलाचे परिणाम हे सर्वांवर होत असतात.
त्यातील एक बदल म्हणजे क्लायमेट चेंज. क्लायमेट
मध्ये ग्रीन हाऊस गॅसचे ( कार्बन डायॉक्साईड,
मिथेन) प्रमाण वाढल्यामुळे हा नैसर्गिक बदल
घडतोय. याचा मोठा परिणाम मध्य आशियाई
देशांवर होतोय.
#liberal#climatechange
दर सोमवारी सकाळी सकाळी कमीतकमी तासभर तरी आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या विषयासंदर्भातील महत्वाची साप्ताहिकं, मासिकं, जर्नल्स चाळायची, वाचायची.
त्यातील महत्त्वाच्या घटना, शोध व तंत्रज्ञान याच्या नोट्स काढून आठवडाभरात वेळ मिळेल तसा त्यावर अभ्यास करायचा!
कामात नवी उर्जा मिळते.
सध्या कोणतेही करिअर निवडताना प्राथमिक उद्देश हा पैसे कमावणे हाच असतो. त्यानंतर बौद्धिक व मानसिक स्वावलंबन हा असतो. त्यामुळे आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करत पैसे कमावण्याचे प्राथमिक उद्देश साध्य करायचे असेल तर त्यादृष्टीने दीर्घकाळासाठी सवयी ही लावता आल्या पाहिजेत.
#liberal
सध्या जाणवत असलेल्या उन्हाळ्यात गावाकडील
ओसाड पण जाणवतोय. शहरात असे वातावरण
असेल, गावाकडे किती भिषण परिस्थिती असेल
याचा अंदाजा लावणे फार कठीण.
#liberal#climatechange
सध्या करिअर फिल्ड निवडीच्या बाबतीत गोंधळ निर्माण होतोय. निवडलेल्या करिअरमधून आर्थिक स्थैर्य मिळेल का हा मुख्य प्रश्न पडतोय आणि त्यात स्पर्धा एवढी की यशस्वी होईल का नाही याची भिती.
#Liberal
सध्या क्लायमेट चेंज हा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वांना क्लायमेट चेंजचा परिणाम जाणवतही आहे पण त्याबाबतीत जागरूक नाहीये. यासाठी प्रत्येक माणसाने लढणे, जागरूक होणे आणि त्यासाठी काम करणे गरजेचे आहे. तेव्हाच माणसाचे अस्तित्व टिकून राहील.
#Liberal
माणूस आपल्या गरजांनुसार आपले इन्कम सोर्स वाढवतो. जेवढ्या गरजा अधिक तेवढ्या अधिक इन्कम सोर्सची गरज आपल्याला भासते. पण या गरजा खरंच आपल्याला आवश्यक आहेत का?, निसर्गाला धरुन आहेत का?, समाजासाठी योग्य आहेत का?, आपल्या अंतिम ध्येयाशी निगडित आहेत का?, त्याला वास्तविकतेचं भान आहे का?
आजकाल वारंवार मार्गावरून भटकणे आणि पुन्हा मार्गावर येऊन जोमाने काम करणे या गोष्टी करिअरच्या बाबतीत घडतायेत. करिअरच्या बाबतीत अजून सजग आणि एकनिष्ठ भूमिका घेण्याची गरज भासत आहे.
#liberal
संयम बाळगून समोर आलेली आव्हाने शांतपणे मार्गी लावणे हे कौशल्य विकसित करायला हवे. दैनंदिन जीवनात अनेक अडचणी/आव्हाने येतात त्यांना सजगपणे सामोरे जाणे गरजेचे आहे.
#Liberal
कितीही बिकट परिस्थिती आली, अडचणी आल्या किंवा अडथळे आले तरी ठरवलेली कामे करत राहणे, त्यासाठी तग धरून राहणे आणि ती कामे सातत्याने मार्गी लावत राहणे हा ध्येय सार्थकी लावण्याचा मार्ग असू शकतो.
#liberal
सध्या आर्थिक स्वातंत्र्य आणि हवामान बदल हे वैयक्तिक व सार्वजनिक दृष्टीने खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. यावर लवकर काहीतरी क्रांतीकारी चळवळ उभी राहणे सर्वासाठी महत्त्वाची बाब आहे.
#liberal