याच भूमिकेतून प्रकाशित होणाऱ्या 'पुरुष उवाच' या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या २२ लेखकांच्या २२ कथांचा हा वाचनीय संग्रह आहे.
पुस्तक सवलतीत रु. २५०/- मध्ये! (+ रु. ५०/- पॅक अँड पोस्ट)
संपर्क: 9545281383
अनेक शतकांपासून आपल्याकडील पुरुषी वर्चस्ववादाचे ओझे हे स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही ताण-तणावाचे कारण ठरले आहे. त्यामुळे पुरुषत्त्वाकडून माणूसपणाकडे प्रवास होण्याची आता गरज आहे.
*अमोल पालेकर यांनी साध्या माणसाला रुपेरी पडद्यावर 'हीरो' बनवलं.* हे पुस्तक केवळ एका कलाकाराचा प्रवास नाही; ते एका माणसाचं आत्मचिंतन आहे. जीवनातील साधेपणाचं सौंदर्य आणि स्वाभिमानाची ताकद अनुभवून देणारं!
*'आयुष्य समृद्ध करताना'हा मनोरंजन करत करत, आपल्याला समृद्ध करणाऱ्या ५० कथांचा संग्रह आहे.
जगण्यास आवश्यक ऊर्जा देत, प्रेरणादायी जाणीवा देणाऱ्या, अगदी सहजगत्या आयुष्यातील विविध बाबतीत आवश्यक ठरणारे बोध देणाऱ्या या कथा आहेत.
हा कथासंग्रह फक्त ₹ १५०/- मध्ये (+ रु. ४५ टपाल खर्च)
जगप्रसिद्ध विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते चार्ली चॅपलिन यांचा अप्रतिम रेखाचित्रांसहित या पुस्तकात करून दिलेला परिचय प्रत्येकाने वाचायला हवाच असा आहे.
पुस्तक फक्त रु. ८०/- मध्ये (+ रु. ४५/- पॅक आणि पोस्ट)
संपर्क : 9545281383
प्रत्येकाच्या जीवनाचे एक वेगळे पुस्तक असते, प्रत्येक व्यक्तीच्या अंतरात एक कथा रुजलेली असते. 'मिलेनिअर' या ३० कथांच्या संग्रहातील कथा अशाच विविध भावरंगांच्या, विभिन्न स्वभावांच्या आणि निरनिराळ्या अनुभवांच्या आहेत.
पुस्तक सवलतीत रु. १६०/- मध्ये! (+ रु. ४५/- पॅक अँड पोस्ट)
संपर्क
एका खून खटल्याभोवतीचे 'त्रिकोण' या कादंबरीचे कथानक साकार झाले आहे. रसिक वाचकांना जागृत करणारी ही कादंबरी आहे.
पुस्तक सवलतीत रु. १६०/- मध्ये! (+ रु. ४५ पॅक अँड पोस्ट)
संपर्क : 9545281383
अॅडवोकेट विलास नाईक हे प्रसिद्ध लेखक असून फौजदारी खटले चालवणारे एक निष्णात वकील आहेत. साक्षीदारांची उलटतपासणी घेण्याच्या आणि युक्तिवादातील मांडणी करण्याच्या त्यांच्या प्राविण्यातून
एकेकाळी कोल्हापूर घाटावरून कोकणात मालवणपर्यंत नेणारा एकमेव घाट म्हणजे फोंडा घाट. तेथील मूळचे रहिवासी श्री. विष्णू गांधी यांनी अनेक दशकांपूर्वीच्या त्यांच्या बालपणीच्या आठवणी येथे शब्दबद्ध केल्या आहेत.
त्या काळातील, त्या भागातील जीवन, राहणीमान,माणसं, तंबूतील सिनेमा, रात्री उशिरापर्यंत चालणारी नाटकं, गणपती-दसरा-दिवाळी सर्वांबरोबर एकत्रितपणे साजरा करण्याच्या पद्धती, देवळात रंगणारी भजनं, कीर्तनं या साऱ्या आठवणी आपल्याला त्या काळातील 'स्वर्गाहून रम्य' अशा फोंडानगरीत घेऊन जातात.
जागतिक भाषा शिकण्याची आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी हे पुस्तक चांगलीच मदत करणारे आहे.
पुस्तक सवलतीत रु. २३०/- मध्ये! (+ रु. ५०/- पॅक आणि पोस्ट)
संपर्क : 9545281383
बहुभाषी लोक हे नेहमीच पुढे असतात कारण त्यांच्या मेंदूच्या अनेक क्षमता विकसित झालेल्या असतात.आपल्यापैकी अनेकांना विविध भाषा शिकण्याची इच्छा असते, परंतु कोणती भाषा शिकावी आणि ती का शिकावी याचे ज्ञान नसते.कोणतीही भाषा अधिक सविस्तर शिकण्यापूर्वी त्याची तोंडओळख झाल्यास हा निर्णय घेणे
सोपे होते. शिवाय अशी तोंडओळख झाल्यावर ती भाषा अधिक पद्धतशीरित्या तज्ञ व्यक्तींकडून शिकणे सोपे जाते.
'बहुभाषी विद्या: भाग १' या पुस्तकामध्ये इटालियन, डच, जर्मन, स्पॅनिश, रशियन व फ्रेंच या सहा भाषांची आपल्याला तोंडओळख करून देण्यात आली आहे.
डॉ. लिली जोशी यांच्या वर्षभर नियमित प्रसिद्ध झालेल्या लेखमालेतील लेखांचे हे पुस्तक. 'ज्येष्ठांच्या नजरेतून आजची कुटुंबव्यवस्था' अशी या सदराची मध्यवर्ती कल्पना. नवी पिढी आयुष्याला भिडत असताना, त्या धडपडीत ज्येष्ठांची भूमिका काय आणि कितपत, हे पाहणं जितकं मनोरंजक तितकंच उद्बोधकही!