आज ३ सप्टेंबर.. शाहीर साबळे यांचा जन्मदिन... त्यांना मानाचा मुजरा करून जाहीर करतोय.."महाराष्ट्र शाहीर"
शाहीर साबळे यांचा जीवनपट त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात #२०२३ चित्रपट गृहात..#मराठीबाणा#मराठीकणा#मराठीफणा जगभरातील मराठी माणसाला कळू द्या की, आवाज महाराष्ट्राचा दुमदुमणार आहे..
"संदीप पाठक फॅन क्लब, औंढा नागनाथ- उपक्रम-एक हात मदतीचा" कोकणात जी पूरस्थिती निर्माण झाली त्यातून कोकणातील जनता आजही सावरलेली नाहीए, महाराष्ट्रातून मदतीचा ओघ चालूच आहे. औंढा येथे माझा फॅन क्लब आहे त्यातील सर्वांनी ह्यात सहभाग घेतला. आमचा खारीचा वाटा..
नेता नाट्यगृहात आणि अभिनेता घरात. अनेक दिवसांपासून नाट्यगृह बंद आहेत त्याचं कारण "कोरोना" परंतु राजकीय कार्यक्रम, निवडणुका,सभा,बैठका,पक्ष कार्यालयांचे उद्घाटनं, ह्यासाठी NOCORONA. आम्हा सामान्य माणसाप्रमाणेच कोरोनाचा विषाणू सुध्दा राजकारण्यांना घाबरत असावा.
पोर्तुगीज गावच्या विहरीत पाव टाकीत, ते पाणी प्यायलं की माणूस बाटतो म्हणून गोवा सोडून आमचे पूर्वज महाराष्ट्रात आले अशी आख्यायिका गोवा बॅार्डवरील आमच्या गावात सांगतात. आमची कुलदैवतं गोव्यात, नातलगही.
आज गोवा राज्य स्थापना दिवस(Goa Statehood Day)
भारताभिमानी गोमांतकीयांना शुभेच्छा!