|| नामप्रभात ||
मर्यादेचे वाटे जावें ।
अनित्य अव्हाट त्यजावें ।।
एक राम आहे खरा ।
तिकडे गुरूपरंपरा ।।
एकीकडे आहे जन ।
एकीकडे ते सज्जन ।।
पुढे विवेकें वर्तावें ।
मागें मूळ सांभाळावें ।।
उदंड झाला समुदाय ।
तरी आदि सांडू नयें ।।
रामीरामदास म्हणें ।
जनीं मान्य हे बोलणें ।