महाराष्ट्रभर वन विभागामार्फत मोबाईल LED व्हॅनच्या माध्यमातून ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानाचा संदेश घराघरांत पोहचविण्याकरिता भव्य जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि जनसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र वन विभागामार्फत राज्यव्यापी या जनजागृती अभियानाची मा.मंत्री, वने श्री. गणेश नाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.
मोबाईल LED व्हॅनच्या माध्यमातून वन विभागाच्या विविध योजना, उपक्रम तसेच आगामी वनमहोत्सव आणि ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानाची प्रचार-प्रसिद्धी या माध्यमातून करण्यात येत आहे.
मोबाईल LED व्हॅनच्या माध्यमातून अमरावती विभागातील
बाजारपेठा, बसस्थानके, शहरी व ग्रामीण भागातील प्रमुख चौक तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असणाऱ्या ठि���ाणी जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आले. महाराष्ट्र वन विभागाच्या ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत मोबाईल LED व्हॅनद्वारे राबविण्यात येत असलेल्या या भव्य जनजागृती अभियानाची खास झलक पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून.
#३००कोटीवृक्षलागवड #वनमहोत्सव२०२६ #महाराष्ट्रवनविभाग #वृक्षसंवर्धन #MahaForest
महाराष्ट्रभर वन विभागामार्फत मोबाईल LED व्हॅनच्या माध्यमातून ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानाचा संदेश घराघरांत पोहचविण्याकरिता भव्य जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि जनसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र वन विभागामार्फत राज्यव्यापी या जनजागृती अभियानाची मा.��ंत्री, वने श्री. गणेश नाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.
मोबाईल LED व्हॅनच्या माध्यमातून वन विभागाच्या विविध योजना, उपक्रम तसेच आगामी वनमहोत्सव आणि ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानाची प्रचार-प्रसिद्धी या माध्यमातून करण्यात येत आहे.
मोबाईल LED व्हॅनच्या माध्यमातून नागपूर विभागातील
बाजारपेठा, बसस्थानके, शहरी व ग्रामीण भागातील प्रमुख चौक तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आले. महाराष्ट्र वन विभागाच्या ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत मोबाईल LED व्हॅनद्वारे राबविण्यात येत असलेल्या या भव्य जनजागृती अभियानाची खास झलक पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून.
#३००कोटीवृक्षलागवड #वनमहोत्सव२०२६ #महाराष्ट्रवनविभाग #वृक्षसंवर्धन #MahaForest
हरित महाराष्ट्र ; समृद्ध महाराष्ट्र
महाराष्ट्र वन विभागामार्फत वन महोत्सव कालावधीत दिनांक १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध केली जातात.
एकंदरीत या वनमहोत्सवाबाबत आणि रोपांच्या विक्रीच्या दराबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी QR कोड स्कॅन करा .
#हरितमहाराष्ट्र #समृद्धमहाराष्ट्र #वनमहोत्सव #MaharashtraForest #VanMahotsav #TreePlantation #GoGreen #PlantTrees #SaveEnvironment #GreenIndia #EcoFriendly #ClimateAction #NatureLovers #SustainableFuture #Environment #GreenMaharashtra #ViralPost #Trending #Explore
वटपौर्णिमा म्हणजे केवळ परंपरा नाही, तर पर्यावरण संवर्धनाची शाश्वत प्रेरणा! 🌿
वडाचे झाड हे प्राणवायूचे समृद��ध स्रोत, असंख्य पक्षी-प्राण्यांचे आश्रयस्थान आणि पर्यावरण संतुलनाचे रक्षक आहे. या वटपौर्णिमेला परंपरेसोबत एक झाड लावण्याचा संकल्प करूया आणि हिरवागार, समृद्ध महाराष्ट्र घडवूया. 🌱💚
🌳 १० कोटी वृक्ष लागवड अभियानात सहभागी व्हा!
🗓️वनमहोत्सव कालावधी: १५ जून ते ३० सप्टेंबर
🌱 सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध
#वटपौर्णिमा #वनमहोत्सव #महाराष्ट्रवनविभाग #VatPurnima #TreePlantation #SaveTrees #GoGreen #Environment #Nature #GreenMaharashtra #PlantATree #HaritMaharashtra #Mission10CroreTrees #GreenIndia #ViralPost #NatureLovers #Maharashtra #PlantMoreTrees #SaveEnvironment 🌿
महाराष्ट्रभर वन विभागामार्फत मोबाईल LED व्हॅन व पथनाट्यांच्या माध्यमातून ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानाचा संदेश घराघरांत पोहच���िण्याकरिता भव्य जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि जनसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र वन विभागामार्फत राज्यव्यापी या जनजागृती अभियानाची दिनांक ५ जुन २०२६ पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मा.मंत्री, वने श्री. गणेश नाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.
मोबाईल LED व्हॅन आणि पथनाट्याच्या माध्यमातून वन विभागाच्या विविध योजना, उप��्रम तसेच आगामी वनमहोत्सव आणि ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानाची प्रचार-प्रसिद्धी या माध्यमातून करण्यात येत आहे.
राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या विशेष जनजागृती मोहिमेत कलापथकांच्या माध्यमातून पथनाट्य प्रयोग बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बसस्थानके, शहरी व ग्रामीण भागातील प्रमुख चौक तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी सादर करण्यात आले आहेत.
#पथनाट्य #Streetplay #महाराष्ट्र
#���००कोटीवृक्षलागवड #वनमहोत्सव२०२६ #महाराष्ट्रवनविभाग #वृक्षसंवर्धन #MahaForest
पर्यावरण संवर्धन ही केवळ जबा���दारी नसून भावी पिढ्यांप्रती असलेली आपली सामूहिक बांधिलकी आहे. वाढते प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामानातील बदल या गंभीर आव्हानांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे.
याच गोष्टीला आज माजी महापौर श्री. सुधाकरजी सोनावणे यांच्या माध्यमातून भव्य वृक्ष लागवड मोहीम 2026 चे आयोजन वारली पाडा बिरसा मुंडा उद्यान येथे करण्यात आले. या मोहिमेदरम्यान 5000 हुन अधिक वृक्षांची लागवड करण्यात ��ली. यावेळी माजी आमदार श्री. संदीपजी न��ईक, महापौर सुजाता पाटील, माजी नगरसेविका रंजना सोनावणे यांच्या समवेत स्थानिक नागरिक व शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.
या हरित अभियानाची सुरुवात MIDC परिसरातून झाली. त्यानंतर माजी आमदार श्री. संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली ग्रीन होप संस्थेने वृक्षारोपणाची व्यापक चळवळ उभी केली. तसेच सुधाकर सोनावणे यांनी डोंगराळ भागात हजारो वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करत पर्���ावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला. झाडे लावण्याबरोबरच ती जगविण्याचा संदेश त्यांनी समाजापर्यंत पोहोचवला.
देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी दिलेल्या "एक पेड माँ के नाम" या प्रेरणादायी आवाहनाला देशभरातील कोट्यवधी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात वनसंवर्धनाला नवी ग���ी मिळत आहे. राज्यभर ३०० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प साकार करण्यासाठी वनविभाग कटिबद्ध आहे.
भविष्यात महाराष्ट्र अधिक हिरवागार, समृद्ध आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. आज लावलेले प्रत्येक झाड हे उद्याच्या पिढीसाठी शुद्ध हवा, समृद्ध निसर्ग आणि सुजलाम सुफलाम भारताची अमूल्य ठेव ठरेल.
#हरित_महाराष्ट्र
#एक_पेड_माँ_के_नाम
#माझी_वसुंधरा
#Green_Maharashtra
#Ek_Ped_Maa_Ke_Naam
सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव व कृषी विज्ञान केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व वनमजूर यांच्यासाठी रोपवाटिकेमध्ये जैविक खते तयार करणे, कलम बांधणी तंत्रज्ञान, बांबू अभिवृद्धी पद्धती व विविध रोप निर्मिती तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम दि. २३ जुन २०२६ रोजी आयोजित करण्यात आला.
या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक सुदर्शन शिसव, सहाय्यक वनसंरक्षक, जळगाव यांनी केले. प्रशिक्षणामध्ये कृषी विज्ञान केंद्रातील श्री. वैभव सूर्यवंशी व डॉ. किरण जाधव, शास्त्रज्ञ (उद्यानविद्या) यांनी रोपवाटिका व्यवस्थापन, जैविक खतांचे महत्त्व , त्यांचा वापर व तयार कशी करावीत याबाबत मार्गदर्शन केले.
कलम पद्धती व जैविक खते तयार करण्याचे तंत्रज्ञान याबाबत रविंद्र महाजन कृषिभूषण मातोश्री रोपवाटिका, जामनेर यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. विविध कलम पद्धती व रोप निर्मितीचे प्रात्यक्षिक याबाबत संदीप माळी, देवेंद्र नर्सरी, पारोळा यांनी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महेश झांजुर्णे, विभागीय वन अधिकारी ���ांनी वड, पिंपळ, उंबर यांसारख्या वृक्ष प्रजातींच्या स्टंपपासून रोपे तयार करण्याची पद्धत, त्यांचे संगोपन व रोपवाटिकेतील उपयोग याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच प्रशिक्षणामध्ये बांबू अभिवृद्धी पद्धती, रोपांची गुणवत्ता वाढविणे, आधुनिक रोपवाटिका तंत्रज्ञान व वनविभागाच्या रोप निर्मिती कार्यक्रमासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रशिक्षणामुळे वन विभागातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना जैविक खते तयार करणे व वापर करणे व आंबा, चिंच, फणस, सिताफळ, मोहा, वड, पिंपळ, उंबर व इतर प्रजाती वर कलम प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले व कर्मचारी व अधिकारी यांना ही कलम करण्याचा सराव करण्याची संधी देण्यात आली.
#सामाजिक_वनीकरण #वनविभाग #कृषीविज्ञानकेंद्र #ForestDepartment #SocialForestry
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत "वाटचाल वन विभागाची : संकल्प २०२९"हा दूरदर्शी आराखडा तयार करण्यात आला आहे.
हा आराखडा वनसंवर्धन, जैवविविधता संरक्षण, कांदळवन पुनरुज्जीवन आणि शाश्वत पर्यावरण व्यवस्थापनाचा मार्गदर्शक दस्ताऐवज आहे.
QR कोड स्कॅन करुन "संकल्प २०२९" बाबत माहिती जाणून घ्या...
#कांदळवन #जैवविविधता #संकल्प #वनविभाग #महाराष्ट्रशासन #संकल्प२०२६ #सामाजिकवनीकरण #Forest #MahaForest
🌳हरित महाराष्ट्���, समृद्ध महाराष्ट्र 🌳
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत वन महोत्सव २०२६ ��पक्रम राबविण्यात येत असून १५ जुन २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत सवलतीच्या दरात रोपे खरेदी करा आणि सन २०२६-२७ वर्षात १ ० कोटी वृक्ष लागवड मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा
#हरितमहाराष्ट्र #समृद्धमहाराष्ट्र #वनमहोत्सव२०२६ #१०कोटीवृक्षलागवड #वृक्षारोपणमोहीम #GreenMaharashtra
#VanMahotsav2026
🌳हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र 🌳
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत वन महोत्सव २०२६ उपक्रम राबविण्यात येत असून १५ जुन २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत वन विभागामार्फत सवलतीच्या दरात रोपे खरेदी करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तरी या सवलतीच्या दराचा लाभ घेण्याचे व वृक्ष लागवड मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे अवाहन करण्यात येत आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक,
सामाजिक वनीकरण, पुणे.
चला तर मग झाडे लावूया, 🌳हरित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करूया. 🙏
#हरितमहाराष्ट्र #समृद्धमहाराष्ट्र #वनमहोत्सव२०२६ #१०कोटीवृक्षलागवड #वृक्षारोपणमोहीम #GreenMaharashtra
#VanMahotsav2026 #SaveEnvironment #GreenFuture #Mahaforest
समृद्धी महामार्ग होणार अधिक हरित! 🌱
समृद्धी महामार्गाच्या हरितीकरणासाठी महत्त्वपूर्ण ��ाऊल
मा. वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत सामाजिक वनीकरण विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लि. यांच्यात समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी व्यापक वृक्षारोपण व हरितीकरणासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत विकासाला बळ मिळणार असून समृद्धी महामार्ग अधिक हिरवागार करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
#HaritMaharashtra #SocialForestry #SamruddhiMahamarg #TreePlantation #GreenMaharashtra #ForestDepartmentMaharashtra
"हरित नंदुरबार" उपक्रमांतर्गत सर्किट हाऊस मुख्य मार्गावर महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल) मा. श्री. विकास खारगे, जि��्हाधिकारी मा. डॉ. मिताली सेठी व अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
#हरितनंदुरबार #Nandurbar #GreenNandurbar #TreePlantation #MaharashtraGovernment #MajhiVasundhara #माझीवसुंधरा #वृक्षारोपण #नंदुरबार
सामाजिक वन���करण विभाग, नागपूर
शेतकऱ्यांना जाहीर आवाहन: ठोंबरा (सामाजिक वनीकरण परिक्षेत्र उमरेड) रोपवाटिकेमधून सवलतीच्या दरात बांबूची रोपे उपलब्ध!
सर्व शेतकरी बांधवांना याद्वारे सूचित करण्यात येते की, 'वन महोत्सव' कालावधी येत्या १५ जूनपासून सुरू होत आहे.
या सुवर्णसंधीचे औचित्य साधून सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत असलेल्या ठोंबरा रोपवाटिकेमध्ये उच्च दर्जाची बालकोवा (Bambusa balcooa) आणि टुलडा (Bambusa tulda) या बांबूच्या प्रजातींची रोपे अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
ही रोपे मिळवण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही खालील संबंधित अधिकारी/कर्मचारी वर्गाशी त्वरित संपर्क साधू शकता.
संपर्क क्रमांक:
1. श्री. दीपक बागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण ��मरेड ९७६४८४८६९५
2. श्री. बालाजी टिपराळे, वनरक्षक ९७६५३४२०२०
बांबूची लागवड ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणारी आहे. माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की, त्यांनी पुढाकार घेऊन ही उत्तम दर्जाची बांबूची रोपे आपल्या शेतात तसेच शेताच्या बांधांवर नक्की लावावीत.
यामुळे जमिनीची धूप थांबेल आणि भविष्यात उत्पन्नाचा एक चांगला स्रोत तयार होईल. त्याकरिता आपण वरील अधिकारी कर्मचारी यां���्याशी संपर्क साधून आपला शेताचा ७/१२ उतारा सादर करावा व ठोंबरा रोपवाटिका येथून सदर बांबू रोपे शासकीय दरात प्राप्त करून घ्यावीत.
सर्व शेतकरी मित्रांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे अवाहन करण्यात येत आहे.
- नंदकिशोर राऊत,
सामाजिक वनीकरण विभाग,नागपूर.
#वनमहोत्सव #सामाजिक_वनीकरण #बांबूशेती #बालकोवा #टुलडा #बांबू_लागवड
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या वतीने जिल्हाभर वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, वनवृक्ष बियाण��� प्रदर्शन, सीड बॉल निर्मिती तसेच “एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
🌳 यानिमित्त मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तथा मा. वनसंरक्षक, नाशिक वनवृत्त श्री. गजेंद्र हिरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी निवास परिसरातील “स��िरी उद्यान” येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती अपर्णा पाटील तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विविध शाळांमधील इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, शिक्षक, महिला बचत गट सदस्य आणि नागरिकांना वृक्षांचे महत्त्व, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
🌿 नंदुरबार, नवापूर, अक्कलक��वा, शहादा आणि तळोदा क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायत परिसर, शाळा, अंगणवाडी केंद्र, न्यायालय परिसर, रोपवाटिका तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.
🌾 यासोबतच सिसम, कांचन, आवळा, अंजन, कुसुम, बेहडा, बेल, खैर, बाभूळ, मोहगणी आणि महारुख यांसारख्या विविध वनवृक्षांच्या बियाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. अक्कलकुवा येथे बेहडा बियाण्यांपासून सीड बॉल निर्मिती उपक्रम राबवून भविष्यातील हरित संवर्धनासाठी प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाच्या या उपक्रमांमुळे पर्यावरण, वनसंपदा आणि जैवविविधता संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती निर्माण झाली.
#WorldEnvironmentDay #EkPedMaaKeNaam #SocialForestry #GreenNandurbar #EnvironmentProtection #TreePlantation #Biodiversity #Nandurbar #DrMittaliSethi #SaveEnvironment #GoGreen #जागतिकपर्यावरणदिन #वृक्षारोपण #पर्यावरणसंवर्धन #सामाजिकवनीकरण #हरितनंदुरबार #एकपेडमाँकेनाम #जैवविविधता #नंदुरबार
As part of SwachhataPakhwada2026, the Maharashtra State Biodiversity Board organized a Drawing Competition at Van Bhavan, Nagpur on the theme "Clean India of My Dream."
Forest Department officers and staff beautifully expressed their vision of a clean, green, healthy and sustainable India through inspiring artwork highlighting cleanliness, biodiversity conservation, waste management and environmental responsibility.
Congratulations to all the winners and participants for their enthusiastic contribution towards spreading the message of environmental stewardship and the spirit of SwachhBharat.
#SwachhataPakhwada #SwachhataPakhwada2026 #SwachhBharat #CleanIndiaOfMyDream #MaharashtraForestDepartment #CleanAndGreenIndia #GreenIndia #DrawingCompetition
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एकीकृत रोपवाटिका कोडोली सातारा व शिरवळ रोपवाटिका खंडाळा येथे वृक्ष लागवड व सीड बॉल बनविण्याबा���त प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना स्थानिक बियांचे ओळख करुन देत प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच विद्यार्थी सहभागातून वृक्षारोपणाद्वारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
#जागतिकपर्यावरणदिन #वृक्षलागवड #SeedBalls #सीडबॉल
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झ��रो माईल, नागपूर येथे ग्रीन राइड सायक्लोथॉनचे आयोजन सामाजिक वनीकरण विभाग, नागपूर यांच्यामार्फत करण्यात आले
या सायकल रॅलीमध्ये २७५ सायकलस्वार सहभागी झाले होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवणे आणि नागरिकांमध्ये सायकलिंगची संस्कृती रुजवणे तसेच पर्यावरण संवर्धन, प्रदूषण मुक्ती आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या सायक्लोथॉनचा मुख्य उद्देश आहे. नागपूरकरांमध्ये सायकल ��ालवण्याची संस्कृती रुजावी आणि आपल्या वसुंधरेचे रक्षण व्हावे, यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने या पर्यावरणपूरक मोहिमेचे पाऊल उचलले आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री एन.आर. राऊत, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, नागपूर यांनी केले.
श्री. विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनिकरण, महाराष्ट्र राज्य यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखविल्यावर गाडीची सुरुवात करण्यात आल���. रॅली झिरो माईल- महाराजबाग- दिक्षाभुमी-अंबाझरी- फुटाळा तलाव- विधान भवन मार्गे “ निसर्ग वाचला तरच जिवन फुलेल”, “स्वच्छ पर्यावरण-निरोगी जीवन” अशा प्रकारचे चित्र सायकलवर लाऊन व पर्यावरणाविषयी घोषणा देत झिरो माईल येथे पोहचले. सदर रॅलीमध्ये नागपूरच्या नागरिकांनी, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विशेषतः तरुणांनी या हरित मोहिमेत मोठ्या संख्येने लहान मुलांपासुन ते ८६ व���्षाचे ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सहभागी सायकलस्वारांना वनीकरण विभागातर्फे प्रमाणपत्र, पारितोषिके प्रदान करण्यात आले.
सदर कार्यक्रमावेळी विभागीय योजनांची प्रचार-प्रसिद्धी करणाऱ्या मोबाईल LED व्हॅनचे उद्घाटन श्री. विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
#WorldEnvironmentDay #GreenRideCyclothon