बिल्डर लॉबीला भाजपने मोकळीक दिलीय.
ज्या शहरांमध्ये खूप जागा आहे तिथे पण अनेक मजली इमारती बनवणं चालू आहे. नाशिक उदाहरण आहे याचं. सुटसुटीत बंगले नको तर जास्तीत जास्त लोक महाराष्ट्रात कोंबायचे आहेत त्यांना.
मराठी वोट बँक नेस्तनाबूत करणं हा उद्देश आहे.
जस्थानात एका मराठी व्यावसायिकाला मराठी असल्याच्या कारणाने दुकान नाकारण्यात आले. म्हणजे तिकडचे लोक महाराष्ट्रात येऊन भारतीय असल्याचे आणि हिंदू एकतेचे दाखले देणार इथेच स्थायिक होणार, व्यवसाय करणार पण मराठी माणूस बाहेर राज्यात गेला की त्याच्यासाठी पूर्णपणे वेगळा न्याय?
आपण आता एक ठरवायला पाहिजे की हे असंच कुठपर्यंत चालणार आहे. जर आपल्या लोकांसाठी तिथे जागा नसेल तर महाराष्ट्राच्या हिताचाही विचार तितक्याच ठामपणे झाला पाहिजे.
@YogiYogesh43512 आता काय उपयोग नाही... महाराष्ट्राची मराठी जनता स्वतःच अस्तित्व कधीच गमावून बसलीय...जमिनी विकल्या...बाहेरच्यांना jaga दिल्या आणि स्वतःची कबर स्वतःच खोदली...
मनसेची सर्वाधिक मते ही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरी भागात आहेत आणि याच शहरी भागात परप्रांतीय मते सर्वाधिक आहेत.
तरीही या परप्रांतीयांचा विरोध करुन मनसे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेते कारण राजसाहेब हे एकमेव राजकारणी आहेत. जे "मतांसाठी" नाही तर "मराठीसाठी" लढतात.
महाराष्ट्राचे मराठीपण आणि पर्यायाने शिवरायांचा इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर,
मराठी तरुणांना उद्योग आणि व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही..
व्यवसाय केला तर पैसा येईल,
पैसा आला तर जमीन राखता येईल,
जमीन राहिली तर संस्कृती राहील,
संस्कृती राहिली तर इतिहास राहील..
समजून घ्या..
🙏🏻🙏🏻
अधिक महिना आहे. जावयाचे कौतुक करायचे. त्याला न्हाऊ माखु घालायचे,सोन्याचा पाट, चांदीचे ताट द्यायचे याबद्दल खूप खूप बोलून झालंय. मोठे मोठे लेख पाडून झाले आहेत. डोक्याचे धोंडे होईपर्यंत बोलून झालंय.
आता हे सगळं कोड कौतुक गगनाला भिडलं आहे. वगैरे वगैरे. त्यावर आता काही नको. काव आला आहे. सुधरायची लक्षणं नाहीत कुणाची.
पण बायकोच्या आईवडिलांकडून पाय धुवून घेण्याच्या प्रथेचं जे घाणेरडं ग्लोरिफिकेशन सुरू आहे निदान ते तरी थांबवा. लाजा कशा वाटत नाहीत असे पाय धुवून घ्यायला. असे काय झेंडे गाडले आहेत जेणेकरून कुणी तुमचे पाय धुवावे. रीळ प्रकाराने तर अजून घाण करून ठेवली आहे.
यात अजून जास्त लाज पोरींना वाटायला हवीय. आपल्या आईबापाने आपल्या नवऱ्याचे पाय धुवावे या कल्पनेने सुद्धा किळस यायला पाहिजे. कुठे गहाण ठेवला आहे तुम्ही आत्मसन्मान गं पोरींनो.
कहर आहे.
- Kavita Nanaware