खूप खूप आभार सर..आपली साथ आणि आशीर्वाद असेच राहुद्या..माय मराठीच्या सेवेकामी आपण सर्वांनी कटिबद्ध राहून महाराष्ट्राचा, मराठी मातीचा आणि मराठी भाषेचा झेंडा सदैव फडकत ठेवू..🙏🏻🚩🇮🇳
पातंजलींच्या संस्कृत महाभाष्याचा #मराठी भाषेत अनुवाद करणारे #महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा आज जन्मदिवस. भारतीय तत्त्वज्ञान आणि व्याकरणशास्त्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या कार्यामुळे संस्कृत व्याकरण आणि भाषाशास्त्र अभ्यासकांना नवी दिशा मिळाली.
जगभरातील संगीतरसिकांना आपल्या स्वरांनी आणि अभिनयाने वेड लावणारा लाडका झुमरू किशोर कुमार! गायक, अभिनेता, संगीतकार, दिग्दर्शक, गीतकार अशा अनेक भूमिका सहज निभावणाऱ्या या बहुआयामी कलाकाराचा आज जन्मदिवस. संगीतविश्वात अजरामर ठसा उमटवणारा किशोरदा आजही प्रत्येक पिढीच्या हृदयात जिवंत आहे
#मराठी साहित्याला आपली वैशिष्ट्यपूर्ण शैली, रेखीवपणा आणि तंत्र या त्रिगुणांनी समृद्ध करणारे थोर साहित्यिक ना. सी. फडके यांचा आज जन्मदिवस. कादंबरी, कथा, निबंध या सर्व प्रकारांतले त्यांच्या लेखनातील दिमाखदार आशय आणि रचना आजही वाचकांना भुरळ घालतात.
वसईतील बीकेएस हायस्कूलप्रमाणे इतर पाच शाळांचे मराठी नामफलक नसल्याबाबत मा. शिक्षणाधिकारी, पालघर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
संबंधित अधिकाऱ्यांनी या विनंतीची दखल घेत शाळा प्रशासनाला शाळेच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत.
@dadajibhuse@ChDadaPatil
महाराष्ट्राच्या ग्रामिण आणि काही निमशहरी भागात अक्षरशः “पिण्याच्या पाण्याचे खाजगीकरण” झालेय.
पुर्वी “घरोघरी मातीच्या चुली” अशी म्हण होती. आता “घरोघरी विकतच्या पाण्याचे जार” अशी परिस्थिती आहे.
‘हम दो - हमारे दो किंवा आता तर एकच.’ या काळात आपल्या मुलांना निस्वार्थ मैत्री करायला शिकवणे फार गरजेचे आहे.
मैत्री ही हृदयातून असते, गरजेमुळे नाही. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण त्यातून स्वार्थाचाच विचार करतो.
पुर्वीच्या पिढीत बऱ्याच जणांना एकत्र कुटूंब १/४