Jai Maharashtra,
The Bharatiya Janata Party (BJP) and the toxic social media ecosystem it nurtures are currently making desperate attempts to incite conflict in Mumbai, Maharashtra, by exploiting the issue of 'Chhath Puja'.
To this end, they are circulating reels on social media depicting the rituals and what they frame as a ‘cultural invasion’ stemming from them. As if that weren't enough, they even attempted to play Bhojpuri music at certain railway stations in Mumbai, which was promptly shut down by the Maharashtra Navnirman Sena (MNS) anyway.
Yet, the BJP remains frustrated because the conflict they so desire has failed to materialize. All this frantic maneuvering is being orchestrated with an eye on the upcoming elections in Uttar Pradesh.
It appears that the BJP’s ‘think tank’ has suffered a decline in its intellectual capacity. The ‘divide and rule’ tactic which they have relied upon for years to win elections is no longer effective. Whenever Lok Sabha elections approach, they stoke Hindu-Muslim tensions; they parade women wearing burqas through public grounds and parks, aiming to frighten the public by suggesting that 'the other' has now encroached upon their own spaces. The social media is rife with videos, often staged, featuring individuals, including men, dressed in burqas to manufacture fear. When state-level elections draw near, they sow the seeds of caste-based hatred. Last year, in a bid to win the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) elections, they manufactured ‘Gujarati versus Marathi’ conflict, centered around the issue of feeding pigeons (kabutarkhana). I have often stated in my speeches that the BJP cannot win elections based on their actual performance; instead, they engineer conflicts between groups and secure victories on the back of the blood spilled in those clashes. Of course, this is largely a superficial spectacle, as the real work is done by the Election Commission. But it provides them with a convenient narrative to explain how they achieved their 'victory'.
Spurred by the 'Gen Z' movement, the journey toward the Bharatiya Janata Party’s (BJP) ouster from power, both at the Centre and in the states, has begun. It is bound to happen soon! This has left the BJP and its mentors completely rattled. They fear that once out of power, the ghosts of everything they have done over the last 12 to 14 years will come back to haunt them. Regardless, whatever is destined to happen to them, will happen!
I urge the Marathi people: there is no need for us to fight on the battlefield of their choosing. That is not the ‘Maharashtra way.’ They may have forgotten Chhatrapati Shivaji Maharaj’s guerrilla warfare tactics, but we must remember it. We shall decide how and when to respond using these tactics. We must not fall into the traps they have laid for their own selfish ends.
The BJP has ruined the nation, destroying the social harmony and tolerance that once existed. The same is happening in Maharashtra. Acting on directives from the Centre, they are effectively selling off Maharashtra piece by piece, to a single industrialist and his cronies, stripping the state bare from every direction. They have even begun to hollow out the Sahyadri mountain range. The very land where our Chhatrapati Shivaji Maharaj and his loyal warriors once lived. Forests are being handed over, lands are being signed away; whatever that industrialist sets his eyes upon in Maharashtra is being gifted to him. Yet we remain seemingly indifferent. I have often said that I have never encountered a society as unvigilant as the Marathi community. A people who wake up to an incident, only to fall back into a slumber and forget everything within a day or two. The Marathi people must not forget what is unfolding all around them. We must express our anger at the right moment; only then do we earn the right to invoke the name of Chhatrapati Shivaji Maharaj!
छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT- मध्यरेल्वे अधिकारी कनोजिया व CPRO (जनसंपर्क अधिकारी) मीना यांची समिती शिलादारांनी आज दुपारी भेट घेत #भोजपुरी गाण्यांच्या विषयाबद्द��� तीव्र संताप व निषेध व्यक्त केला. गाणे बंद करण्यास कळविले
शिलेदार ऍड. पिंपळे आणि ऍड कदम यांनी संबंधित प्रशासनाकडून लिखित स्वरूपात माफिची मागणी केली आहे.
सर्व स्थानकावरील भोजपुरी गीत बंद क���ले
कृष्णा हरीबा जाधव,
सुरज दीपक चव्हाण
मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य
सस्नेह जय महाराष्ट्र,
भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय.
त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा.
पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी.
भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्य���ला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं!
जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२,१४ वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर���थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच !
माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्क��.
भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे! आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात ��िसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल���याला प्राप्त होतो !
��ाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे ! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत ! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते ! येथे मरहट्टे राहातात ते !
भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा ! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ !
राज ठाकरे ।
मुंबईच्या रेल्वे स्थानकावर कधी "जय जय महाराष्ट्र माझा... गर्जा महाराष्ट्र माझा.." लावल्याचे मी तरी ऐकलेले नाही मात्र महाराष्ट्���ात मुंबईत लोकल स्थानकावर छट् पूजे निमित्ताने भोजपुरी गाणे मुद्दाम वाजविले जात असावे.. हे सगळ जाणीवपूर्वक येथील स्थानिकांना डिवचन्यासाठी केले जात असावं.. म्हणजे त्यांनी छट पूजेला विरोध करावा आणि मग यांनी या बाहेरच्या लोकांना आम्हीच तुमचे मुंबईतील तारणहार आहोत दर्शवून एक गठ्ठा सगळ्यांना झोळीत गुंडाळून टाकायचे..
रेल्वे बोर्डाने कधी पटना रेल्वे स्थानकावर एखाद मराठी गाण वाचविण्यासाठ��� आदेश वगैरे दिल्याचे दाखवून द्यावं... मग मुंबईत भोजपुरी गाणं कशासाठी...??? समाजात तोडा फोडा भांडण ल��वा आणि मग राज्य मिळवून सत्तेत राहून देश लुटायचा.. हाच यांचा एकमेव धंदा. इंग्रजांच्या गुलाम्या/चाकरी करणाऱ्या या लोकांच्या पासून वेगळी काय अपेक्षा ..??
आज महाराष्ट्रात दिवाळीतील भाऊ-बहीण या पवित्र नात्याचा सन्मान करणारा भाऊबीजेचा सण !
मग महाराष्ट्रातील उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आज भाऊबीजेच्या सणाची मराठी गाणी का ऐकू येऊ नयेत ?महाराष्ट्राच्या सण-उत्सवांना आणि संस्कृतीला प्राधान्य देण्याऐवजी छटपूजेची गाणी लावून परप्रांतीय सणांचा उत्सव साजरा करण्याची गरज काय ?
प्रश्न छटपूजेचा किंवा कोणत्याही समाजाच्या सणाचा विरोध करण्याचा नाही. पण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या सणांना आणि मराठी संस्कृतीला योग्य तो सन्मान मिळणार की नाही ?
१२ वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारला प्रश्न विचारला जात होता — “कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?” आज हाच प्रश्न भाजपाला विचारण्याची वेळ आली आहे.
#आंबिवली_स्टेशन @drmmumbaicr
प्रति @RailMinIndia, महाराष्ट्रात रेल्वे स्थानकांवर #छठपूजा गीते का वाजवली जात आहेत?
महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे आणि छटपूजेचा आणि आमचा काही संबंध नाही त्यामुळे विनाकारण आमच्यावर सांस्कृतिक आक्रमण करू नका.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis आपण याकडे लक्ष द्यावे. #निषेध#म#मराठी
अनेक रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणे लावणाऱ्या रेल्वेचे डोकं ठिकाणावर आहे ? तुम्ही मराठी राज्यात आहात, भानावर या @Central_Railway@drmmumbaicr वाद वाढवू नका
मुख्यमंत्र्यांनी कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र?
मतांच्या भिकेसाठी अजून काय काय करणार?महाराष्ट्र विकायला काढला? @Dev_Fadnavis
छटपूजेला सार���वजनिक ठिकाणी चौपाटी, तलाव, सरोवर ठिकाणी परवानगी देऊ नका मराठी एकीकरण समितीची शासनाकडे लेखी मागणी..
महाराष्ट्राचा सण नसणाऱ्या छटपूजेला शासकीय खर्च आणि तयारी नको, स्थलांतरित नागरिकांचा खाजगी धार्मिक उत्सव ��सल्यामुळे खाजगी ठिकाणी स्वखर्चाने तयारी करण्याच्या सूचना देऊन चौपाटीवर तलावावर बंदी घालावी.
#प्रदूषणटाळा #स्वच्छताबाळगा
#स्वच्छ #सुंदर #समुद्रकिनारे #तलाव
#महाराष्ट्रवाचवा #मराठीएकीकरणसमिती
So people in Maharashtra pay the highest taxes so that people in UP and Bihar get the largest piece of the pie. The same people move to Maharashtra for employment daily in huge numbers. All of this while Maharashtra is going through a drought and we really needed the money. Shame
Festive boost from GoI ! ✨
Heartfelt gratitude to Hon. PM Narendra Modi Ji and Hon. FM Nirmala Sitharaman Ji for releasing an advance instalment of tax devolution to the States ahead of Diwali.
This timely support from the Central Government will give a major impetus to our development works and benefit the people of Maharashtra.
@narendramodi@nsitharaman
#Diwali #Maharashtra #Finance #ViksitBharat
What makes Pune Metro's new Pink Line so special?
23 km connecting Hinjewadi's IT hub with Shivajinagar.
Operated by women.
Almost a third of the electricity needs planned from solar energy.
Tomorrow, this Rs. 8,300 crore infra enhancement will be inaugurated!
A significant boost to 'Ease of Living' for Pune!
https://t.co/sPMa94JF6k
गणपती उत्सवात तलाव आणि समुद्र किनारे (चौपाट्या) जशा बंद होत्या तसे आता पराज्यातील छठपूजेला सुद्धा असतील ना?
@mybmc@TawdeRitu@AshwiniBhide@CPMumbaiPolice@MPLodha@isiddheshRkadam
महाराष्ट्राचा कोणताही संबंध नसणाऱ्या
#छठपूजा २०२६ निमित्त सार्वजनिक ठिकाणी प��वानगी न देणेबाबत गणेश विसर्जनाप्रमाणे चौपाट्या, तलाव, नद्या अशा सार्वजनिक ठिकाणी बंदी असावी व खाजगी ठिकाणी स्वखर्चाने तात्पुरत्या/पोर्टेबल कृत्रिम जलकुंडांची व्यवस्था करून जलप्रदूषण रोखण्याबाबत
तसेच महाराष्ट्र संस्कृती अबाधीत ठेवणेबाबत निवेदन..
सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर छठ पूजा बेकायदेशीर रित्या साजरी केली जाते. या सणाचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा काहीही संबंध ���ाही,
हे मराठी राज्यावर सांस्कृतिक अतिक्रमण आहे त्यामुळे या उत्सवा��ा सार्वजनिक कोणतीही परवानगी देऊ नये, यावर्षी छठ पूजा १३ ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे.
या सणासाठी #परराज्यातील नागरिक नदी, तलाव, समुद्रकिनारे तसेच इतर जलस्रोतांमध्ये उभे राहून धार्मिक विधी करतात जिथे अस्वच्छता पसरते..
जलस्रोतांमध्ये प्रवेश केल्यामुळे पाण्याचे प्रदूषण, निर्माल्य, पूजेचे साहित्य, फळे, प्लास्टिक व इतर कचरा जलस्रोतांमध्ये जात असते त्यामुळे जलस्रोतांची स्व���्छता राखणे हे देखील महत्त्वाचे आहे.
गणेशोत्सवाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ज्या चौपट्या तलावावर बंदी घातली होती
अनेक ठिकाणी कृत्रिम/पोर्टेबल विसर्जन कुंडांची व्यवस्था केली जाते, त्याच धर्तीवर व त्या पद्धतीने या परराज्यातील छट पूजेला सणाला/धार्मिक विधीला सुद्धा विविध खाजगी ठिकाणी त्यांच्या "वैयक्तिक खर्चाने" तात्पुरते पोर्टेबल जलकुंड/पाण्याची टाकी उपलब्ध करून द्या���ीत, अशी विनंती आहे.
आमचा राज्याचा कररू��ी पैसा इतर राज्यातील सणासाठी खर्च करू नये, पालिका आणि पोलिसांवर हा अतिरिक्त ताण आहे तो आम्ही का सहन करायचा?
1. समुद्र, नदी व तलावांमध्ये होणारे जलप्रदूषण होऊ नये यासाठी परवानगी नकारावी
2. खाजगी ठिकाणी कुत्रीम तलाव दिले तर निर्माल्य व पूजेचे साहित्य नियंत्रित पद्धतीने जमा करता येईल व विल्हेवाट लावता येईल.
कोणत्याही राज्याशी संबंध नसणाऱ्या सणांना शासकीय यंत्रणा, व आर्थिक बाब खर्च होता ��ामा नये.
आमच्या चौपट्या, तलाव, नद्यांचे प्रदूषण थांबवावे.
@Pankajamunde
महाराष्ट्राची जंगले तोडायची, मुंबईची तिजोरी बिहारींच्या सणांच्या नियोजनासाठ�� रिकामी करायची आणि वरून मराठी माणसाच्या भाषिक-सांस्कृतिक अस्मितेवर घाला घालायचा?
हा विकास नाही, तर महाराष्ट्रावर होणारे परप्रांतीय भाषिक आणि सांस्कृतिक आक्रमण आहे.
#परप्रांतीय_हाकला_महाराष्ट्र_वाचवा
मुंबईकरांनो, आता तरी जागे व्हा आणि हे राजकारण समजून घ्या. महाराष्ट्राचा यूपी-बिहार करण्याचं काम सुरू आहे.
हे राजकारण समजून घ्या आणि वेळीच प्रश्न विचारा.
मुंबई आणि महाराष्ट्राची ओळख, संस्कृती आणि व��यवस्था बदलण्याचा हा प्रयत्न नेमका कुठे चाललाय, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
Just look at these videos that I shot from Karjat forest. The destruction of forest for a power company from Gujarat is enormous. Sahyadri is getting slaughtered right in front of our eyes!! How much destruction is enough for a handful capitalists' greed?
#Bhimashankar@AUThackeray@RRPSpeaks@INCHarshsapkal@Dev_Fadnavis
६६० किमीच्या सह्याद्री पट्ट्यात प्रत्येक ५ किमीवर एक प्रकल्प,अस तब्बल ६१ प्रकल्प कंपन्यांच्या घशात घालण्याचा घाट सुरू आहे?
हा विकासाचा आराखडा आहे की सह्याद्रीच्या विनाशाचा?
कंपन्यांचे हित जपण्यासाठी सह्याद्रीचा बळी देणार का?
_ शिवाई न्यूज
#सह्याद्री_वाचवा#महाराष्ट्र 🚩