राजूभाऊ तुमचं असं अचानक जाणं मनाला चटका लावून गेलंय. पुण्यात असताना तुम्ही मला लहान भावा प्रमाणे सांभाळलो. आज खऱ्या अर्थाने पोरकेपणाची जाणीव होतेयं. भावपूर्ण श्रद्ध��ंजली.
संयुक्त राष्ट्राचा इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेन्ज चा अहवाल 'क्लायमेट चेंज-2021' प्रसिद्ध झालाय. त्यात त्यांनी भविष्यात ��ारताला उष्णतेच्या लाटा आणि पुरपरस्थितीला सामोरे जावं लागेल असं सांगितलंय.
सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वे प्रवास करता यावा यासाठी उद्या ११ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर कोविड लसीकरण ऑफलाईन पडताळणी व मासिक रेल्वे पास प्रक्रिया होणार सुरू.
ह्याच्या निमित्तानं एका खास मित्राची आठवण झाली तो तन्हाई हे गाणं खुप भारी म्हणायचा. कॉलेजला असताना मी त्याच्या रुमवर कधी गेलो की आवर्जून त्या��ा हे गाणं म्हणायला लावायचो. तो आता या जगात नाही.
#20YearsOfDilChahtaHai
पहिल्यांदा जेव्हा तारा तिचं चित्र काढण्यासाठी सिध्दार्थला हो म्हणते तेव्हा सिध्दार्थ ताराच्या घरुन पळत सुटतो तो सिन एकदम जबरदस्त आहे.
#20YearsOfDilChahtaHai
हद्दीत व्यवसायिक आणि त्यांच्यात एकप्रकारे सामंजस्य करार असतोच. रात्री उशीरापर्यंत हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू असतील तरी त्याच्याकडे कानाडोळा करायचा मग त्याची भरपाई कुठल्याही स्वरूपात केली जातेच. फुकट बिर्याणी फक्त निमित्त.
ओंकार नवीन कार घेतो..पण त्याला चालवायला येत नसते..त्याचा मित्र त्याला शिकवायला येतो.. दोघे कार मध्ये बसतात ओंकार मित्राला विचारतो आता काय करू..त्याचा मित्र त्याला म्हणतो
ऑन कार
आत्ताचे ट्विटर म्हणजे गार्डन सारखे झाले आहे,
वडीलधारे वैचारिक ट्विट करतात, काही नुसतेच timeline वर फिरून जातात, प्रेमी जोडप्यांचे DMच्या कोपऱ्यात गुलूगुलू चालू असते.
काही नवतरुण घोळक्याने कमेंट मध्ये गप्प��� मारत बसतात
आणि एवढे कमी म्हणून आजकाल लहान पोरांनी नुसता उच्छाद मांड���ा आहे