स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करावा,चार श्रमसंहिता रद्द कराव्यात,कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) च्या वतीने सोमवारी सोलापुरात जोरदार ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, युवक आणि आंदोलकांवर झालेल्या पोलिसी कारवाई व मारहाणीचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,त्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद,पूनम गेट येथे आयोजित आंदोलनात सक्रिय सहभाग.
लाल सलाम
"स्वतःच 'पोस्टमन' असल्याची कबुली देणाऱ्या पालकमंत्र्यांनी सांगावं अख्ख्या जिल्ह्यात लावालावी, फोडाफोडी आणि राजकीय जुळवाजुळवी सोडून विकासाचं एक तरी ठोस काम दाखवता येईल का?" ✊
-कॉम्रेड प्रदीप रंगप्पा मरेड्डी
"पालकमंत्री साहेब स्वतःच सांगत आहेत की त्यांचं काम 'पोस्टमन' सारखं आहे.मग प्रश्न असा आहे की सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री हवा की पोस्टमन?"
जिल्ह्यात बेरोजगारी वाढतेय,महागाई वाढतेय,बस परिवहन व्यवस्थापाणी,रस्ते, आरोग्य,ड्रेनेज व्यवस्था,शिक्षणाचे प्रश्न गंभीर होत आहेत.
सोलापूरला 'पोस्टमन' नको,जिल्ह्याच्या विकासासाठी लढणारा आणि जबाबदारी घेणारा पालकमंत्री हवा!
✊ जनतेचा प्रश्न एकच जिल्ह्याचा विकास कुठे आहे? रोजगार कुठे आहे? पाणी,उद्योग आणि शिक्षणाच्या प्रश्नांचं उत्तर कुठे आहे?
हे गोदी मीडिया आहे.सरकारचे गुन्हे दाखवायचे नाहीत,जनतेचा राग दाखवायचा नाहीत.फक्त TRP आणि सत्तेची चाट लागलेली मीडिया.
जेव्हा विद्यार्थ्यांचे भवितव्य बळी जात आहे, तेव्हा तुम्ही सगळे मुकं का?
NEET लीक,परीक्षा घोटाळे,बेरोजगारी... आणि माध्यमे फक्त "विकास" च्या गोष्टी सांगतात.
#धर्मेंद्र_प्रधान_इस्तीफा_दो!
काल जंतर-मंतरवर हजारो विद्यार्थी आणि युवक NEET पेपर लीक,CBSE गोंधळ आणि शिक्षण व्यवस्थेतील लाचारपणाविरुद्ध मोर्चा काढून ओरडले.पण मुख्य प्रवाहातील टीव्ही चॅनेल्स?पूर्ण शांतता.एक मिनिटही बातमी नाही.
माजी मुख्यमंत्री आणि CPI(M) चे वरिष्ठ नेते कॉम्रेड पिनराई विजयन यांच्या घरावर ED ची कारवाई करून भाजपा(RSS) पुन्हा एकदा राजकीय सूडाचं घाणेरडं राजकारण करत आहेत का,हा प्रश्न आता जनतेसमोर उभा राहिला आहे.
#निषेध
अच्छे दिन’च्या नावाखाली
सामान्य जनतेच्या खिशावरच दरोडा टाकला गेला.
म्हणून प्रश्न विचारणं गरजेचं आहे...
महागाई कमी करण्याचं वचन देणारे आता गप्प का आहेत?”
- कॉम्रेड प्रदीप रंगप्पा मरेड्डी.
“बारा वर्षांपूर्वी ‘महागाई कमी करू’ म्हणत सत्तेत आलेलेच आज महागाईचं सर्वात मोठं कारण बनले आहेत.
तेव्हा घोषणा होत्या ‘महंगाई की मार… अबकी बार मोदी सरकार!’
आज वास्तव काय?
⛽ पेट्रोल-डिझेल दरवाढ
🔥 गॅस सिलेंडर महाग
🥛 दूध, भाजीपाला, अन्नधान्य महाग
🎓 शिक्षण महाग
🏥 उपचार महाग
🏠 जगणंच महाग!
जनतेला स्वस्ताईची स्वप्नं दाखवून
कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांनी सामान्य माणसाचं कंबरडंच मोडलं.
महागाई कमी करण्याचं वचन देणारे आज
महागाईचं समर्थन करत आहेत.
पोस्टरवरचे शब्द बदलले नाहीत,
फक्त जनतेची फसवणूक वाढली आहे.