सरकारी योजना ह्या सामान्य जनतेसाठी असतात त्यात प�� बऱ्याचवेळा घोटाळे होतात आणि फायदा सरकारच्या मंत्रांना होतोच पण आपसूक सरकारी कर्मचाऱ्यांना.सरकारी नोकरी प्रत्येकाला हवी असते मग लठ्�� खाजगी पगार सोडून, जर गरज पडली तर अनेक वर्ष अभ्यासिकेत घासून, लेखी व मुलाखत प्रदक्षिणा करण्याची
तैयारी आम्ही ठेवतो. कारण तर महिन्याच्या शेवटी ठरलेला पगार, नोकरीची शास्वती, बहुतांशी आरामात काम आणि त्यामुळे आणखी एखादा व्यवसाय किंवा काम हाती घेऊ शकतो हा विश्वास. पण हा मार्ग सगळ्यांसाठी खुला नाही. सरकारी क्षेत्रात लागते ओळख, लागतो वशिला हे दोन्ही नाही जमलं तर ओता चिक्कार पैसा.
सगळीकडे हवा करायची जंगी स्तुतिसुमनं स्वतःवरच आणि वाईट झालाच तर विरोधी पक्षाचं वाईट माझ्यापेक���षा काळं म्हणून ढोल पिटायचे किंवा दुसरी लक्ष विचलित करणारी बातमी सोडायची. मानलं की लोक विसरभोळी असतात पण यात तुमच्याच माणसांचं नुकसान व इतरांचा लाभ होतोय हे विसरू नका. #महाराष्ट्रवादी
नेते श्रेयवादी नसावे. कारण त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या प्रभागात घडणारी ���्रत्येक चांगली वाईट गोष्टीला वकारणीभूत तेच असतात. खरं तर चांगलं घडलं तर आपले कार्यकर्ते पुढे तर वाईट घडलं तर बोध (गरज पडली तर जबाबदारी) घेऊन पुढची रणनीती आखली पाहिजे. इथे तर भलतचं! चांगलं घडलं तर..
#बाप्पा सगळीकडे सारखाच मातीचा, दगडाचा आणि पुरेपूर श्रद्धेचा. स्तोम माजवण्यापेक्षा सण, उत्सव यातली सामाजिक वीण जाणून घेऊन परिवार व समाजाशी जोडणं जाणं महत्वाचं आहे. बाकी मंडप, मखर, रोषणाई, पाहुणे, सजावट ह्या गोष्टी प्रत्येकाच्या प्रेमावरच्या अतिरिक्त नशिबाच्या लाभांश सारख्या असतात
राजकारण असेल नसेल एक गोष्ट नक्की की शासनाची सुप्त इ��्छा असली की नामानिराळे आहोत असं भासवलं जात. वेगवेगळया छुप्या क्लृप्त्या वापरून दबावतंत्राचा प्रयत्न होतो. मग आपलीच माणसं सामाजिक माध्यमातून बदनाम, मुलभूत गरजांची मुस्कटदाबी असे प्रकार सर्रास होतात #मराठाआरक्षण #मुंबई #आपलीचर्चा
#trump चे गायलेले गोडवे, निवडणूक मधे केलेला प्रचार अंगलट येऊन #Tariff पाहिला वार झाला अन् डोळे लख्ख उघडले. आशा आहे की रडायचं नाय लढायच बाणा जपत स्वाभिमान जपू. संधी समजून सोन करायचा प्रयत्न होईल व भविष्यात विस्कटलेले परराष्ट्र धोरण सुरळीत राबवलं जाईल ही अपेक्षा करुयात #TrumpTariff
#भूतदया असावी पण त्यांना अन्न देण्याची सवय लाऊन माणसाळवण, नंतर अबालवृद्धांना कृत्रिम धोका निर्माण होणे ही कसली मानवता. प्राणी पक्षांना त्याचं जग द्याव, त्यांच्या जगात लुडबुड करू नये व त्यांना आपल्या कृत्रिम जगात न आणण्याची खबरदारी घ्यायची. बाकी माधुरी कबुतर कुत्रे ही फक्त उदाहरणं
पारदर्शकता हा #मतदान प्रक्रियेतील महत्वाची बाजू आहे. जर त्यावरच लोकांचा #विश्वास उडाला आणि त्यावरच्या #आक्षेप ला जर #सरकार कमी आणि #सत्ताधारी जात उत्तर देऊ लागले तर शंकेला वाव उरतो. नागरिका��नी जर त्यांचा मतदारसंघ जरी चपापला तरी #VoteChori आहे की नाही याची उत्तर मिळून जातील
खासदार आमदार जनता निवडते पण कोणाला मंत्रिपद द्यायचं हे ठरत त्यांच्या राजकीय वजनावर , प��शावर , जाती धर्म या गणितावर. नागरिकांचा रोष तात्पुरता असतो त्याची स्मरणशक्ती क्षणिक असते. बातम्या बंद झाल्या की बातमी संपते. मंत्रालयातल��या बंद कवडांमागे पैशाला सगळ्या खात्यात शिरकाव आहे.
जशी प्रजा तसा राजा आणि त्याचं शासन. त्यामुळे प्रश्नचि��्ह आपल्या प्रतिनिधींवर नाहीतर आपल्या निवडणूक प्रक्रियेवर आणि आपल्या राजकीय अपरिपक्वतेवर उमटायला हवं. तसं पण हे चक्र आहे चांगलं वाईट घडल्याशिवाय दोन्ही गोष्टींची किंमत कळत नसते. बदल पाहिजे तर उठा कामाला लागा.
हा आठवडा #मराठी ने गाजवला.जरी समर्थकांनी व विरोधकांनी मुद्याचा #राजकीय ��ापर केला असला तरी जनमानसात #अभिमान निर्माण होत आहे हे विशेष.आजच्या #संधी च्या जगात प्रत्येक जण भाषिक गटात सामील होऊन एकजुटीने प्रगती करतोय.या प्रवाहात #जात #धर्म मिसळून #महाराष्ट्रीय बाणा जन्म घेईल ही अपेक्षा
...सातार्याजवळच्या कोंडवे गांवातल्या एका शेतकर्याची ही पोरगी. कल्याणी बाबूराव गायकवाड. ज्या अफलातून पद्धतीनं तिनं हे गाणं गायलंय, ते ऐकून अंगावर काटा आला !
कल्याणी, तू जे गातेस ते भल्याभल्यांना जमणार नाही. लै लै लै नांव कम���वणार आहेस तू बाळा. सातारचा अभिमान आहेस तू. ❤️