आज शिक्षणात केलेली गुंतवणूक उद्याच्या सक्षम पिढीचा पाया घडवते. विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहत शिक्षण सुलभ करणारे निर्णय महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याला नवे बळ देत आहेत.
@mieknathshinde
मदतीचा खरा अर्थ फक्त आधा�� देण्यात नसतो; तर स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद निर्माण करण्यात असतो. महिलांच्या उद्योजकतेला चालना देणारा हा निर्णय सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा मजबूत पाया घालत आहे.
@Dev_Fadnavis
परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे हनुमान मंदिराच्या निर्माण कार्यादरम्यान सभा मंडपाचा काह�� भाग कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो. तर या घटनेत जखमी झालेल्या सर्व भाविकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, ही प्रार्थना.
संघर्षातून शिकवली जिद्द,
कष्टातून दिला संस्कारांचा ठेवा...
वडील म्हणजे आयुष्याला
यशाचा दाखवलेला मार्ग नवा..!!
जागतिक पितृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#Shivsena#DrShrikantEknathShinde#HappyFathersDay
📍 इचलकरंजी, #कोल्हापूर |
कोल्हापूर जिल्ह्यातील #इचलकरंजी येथील जनता सहकारी बँकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आणि जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या "���ल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना" असा नामविस्तार सोहळा आज केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांच्या शुभहस्ते पार पडला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, संजय सावकारे, शिवेंद्रराजे भोसले, रवींद्र चव्हाण, माधुरीताई मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, राजेश क्षीरसागर, माजी ���मदार प्रकाश आवाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, लाड��्या बहिणी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Ichalkaranji #Kolhpur #EknathShinde #Maharashtra #AmitShah
@Dev_Fadnavis @abitkar_prakash @mrhasanmushrif @RaviDadaChavan @madhurimisal @mpdhairyasheel @Rajesh9099
कोल्हापूर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असले तरी देशाच्या राजनैतिक शक्तीपीठांचा विचार केला तर पहिले शक्तीपीठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे शक्तीपीठ म्हणजे पोलादी पुरुष अमित शाह आहेत असे ग���रवोद्गावर याप्रसंगी काढले. मोदीजी यांनी भारताला विकासाच्या नव्या उंचीवर नेले, तर अमित शाह यांनी देशाची सुरक्षा आणि सहकार क्षेत्राला नवी दिशा दिली असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.
कलप्पाअण्णा आवाडे यांचा गौरव करताना, वयाच्या ९५ व्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे असे सांगून त्यांनी उभारलेला हा केवळ साखर कारखान्याचा कार्यक्रम नसून सहकारातून समृद्धीकडे नेणाऱ्या चळवळीचा उत्सव असल्याचे नमूद केले.
सहकार क्षेत्रातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचावा यासाठी अमितभाई शाह यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. सहकारी बँकांना सक्षम करण्यासाठी गृहकर्ज मर्यादा वाढविणे, वन टाइम सेटलमेंट सुविधा, स्वतंत्र अंब्रेला ऑर्गनायझेशन, स्वतंत्र को-ऑपरेटिव्ह क्लिअरिंग हाऊस उभारणी यांसारख��� महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. यामुळे सहकारी बँकांची आर्थिक क्षमता आणि विश्वासार्हता अधिक मजबूत झाली असल्याचे यावेळी अधोरेखित केले.
पश्चिम महाराष्ट्र ही देशातील साखर सहकार चळवळीची भूमी आहे. देशातील साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. लाखो शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा कणा म्हणजे सहकारी साखर कारखाने आहेत. भारत विकसित राष्ट्र व्हायचा असेल तर सहकार चळवळ अधिक मजबूत झाली पाहिजे अशीच अमित शाह यांची भूमिका असून शेतकरी, साखर कारखाने आणि सहकारी संस्थांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील यशवाडीच्या हनुमान मंदिरातील सभामंडपाचे छत कोसळून सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हृदयद्रावक आहे. या दुर्घटनेत सुमारे दहा भाविक जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे भाविकांच्या कुटुंबावर दुःखांचे डोंगर कोसळला आहे. हा अनपेक्षित आघात सहन करण्याचे बळ त्यांच्या सुह्रदांस मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या दुःखात मी आणि शिवसेना पक्ष सहभागी आहोत. जखमी भाविकांवर योग्य उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडावा, ही प्रार्थना.
📍 ठाणे |
आंतरराष्ट्रीय योग दिना’निमित्त आज निवासस्थानी उत्साहात योगासने करून हा विशेष दिवस साजरा केला.
धकाधकीच्या आयुष्यात मनाला शांतता आणि शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ‘योग’ हाच एकमेव उत्तम मार्ग आहे. केवळ आजच्या दिवसापुरतेच मर्यादित न राहता, योग ही आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा एक भाग बनावा, हाच आजच्या दिवसाचा खरा ��ंकल्प!
तुम्हा सर्वांनाही आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा...
#आंतरराष्ट्रीय_योग_दिन #InternationalYogaDay #Yoga #Thane #EknathShinde #Maharashtra
📍 #मुंबई |
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी ���ुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी मंत्री उपस्थित होते.
#Mumbai #MonsoonSession2026 #Maharashtra #EknathShinde
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar
खासदार श्रीम. सुप्रियाताई सुळे व श्री. सदानंद सुळे यांची कन्या चि. सौ. का. रेवती व चि. सारंग लखानी यांच्या शुभविवाह निमित्त आयोजित स्वागत समारंभास खासदार श्री. नारायण���ाव राणे व आई सौ. निलम राणे यांच्यासह उपस्थित राहून नवदाम्पत्यास पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ नेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेत आशीर्वाद घेतले.