महाविकासआघाडी वाले ज्यांना प्रोमोट होयायच आहे त्यांनी आपली आयडी कॉमेंट बॉक्स मध्ये द्यावें.
आणि या ट्विट ला रिट्विट करावे.
व सगळे एकमेक फॉल करुन घ्यावे.
@ShivSenaUBT_ 🔥🔥
@INCMaharashtra ✋✋
@NCPspeaks 🎷🎷
@aviuv आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात फिरताहेत. पाटील आणि केदार ह्यांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातच फिरायचं आणि लिमिटेड राजकरण करायचं आहे... एक संपुर्ण पक्ष आणि त्याची निवडणूक रणनीती आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर आहे असू द्या की थोडं अनव्हिजिबल, सुळे पण तर आहेतच की !
21st Day OF MY #CLIMATEFAST
350 people slept in - 10 °C. 5000 people in the day here.
But still not a word from the government.
We need statesmen of integrity, farsightedness & wisdom in this country & not just shortsighted characterless politicians. And I very much hope that @narendramodi ji & @AmitShah ji will soon prove that they are statesmen...
#SaveLadakh #SupportSonamWangchuk #SaveHimalayas #SaveGlaciers #6thSchedule @
@ViCustomerCare तुमच्या कस्टमर केअर अधिकाऱ्याशी बोलू शकतो का फोनवर ? तुमच्या कुठल्याही हेल्पलाईनवर हि सुविधा नाहीय. नक्की इन्टरनेशनल कंपनी आहे का तुमची ? लै भिकार कस्टमर केअर सर्विस आहे तुमची...
उद्धवजींच्या लोकप्रियतेचं गमक हे आहे की त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं 'काॅपी पेस्ट' नाही केले ! स्वतंत्र व्यक्तीमत्त्व म्हणून ते जनतेसमोर आले. स्वत:च्या ओरिजीनल शैली महत्त्वाची मानली. स्वत:चा म्हणून एक विचार जपला.
समजा एखादा अभिनेता महान आहे... जागतिक दर्जाचा आहे. म्हणून तो गेल्यानंतर त्याच्यासाठी लिहीलेली भुमिका त्याची उत्तम मिमिक्री करणार्याला, हुबेहुब त्याच्यासारख्या दिसणार्या कलाकाराला कधीही देत नाहीत. त्याच्या गुणवत्तेची बरोबरी असेल अशा स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाच्या अभिनेत्याला ती भुमिका मिळते.
उद्धवजींनी ठरवलं असतं तर बाळासाहेबांचं नांव 'कॅश' करणं अवघड नव्हतं. साक्षात मुलगा आहे तो त्यांचा. "माझ्या उद्धवला सांभाळा" ही बाळासाहेबांची साद आजही मराठी माणसाच्या काळजावर कोरलेली आहे. तरीही उद्धवजींनी काळाची पावलं ओळखून प्रबोधनकारांच्या हिंदूत्वाचं बोट धरलं. तिथंच ते जिंकले. आज बाळासाहेब असते तरी आजच्या अत्यंत नासलेल्या, सडलेल्या, विषारी भवतालात त्यांनी हेच केलं असतं.
आपण नेहमी म्हणतो बघा. 'आज पु.ल., निळूभाऊ, श्रीराम लागू असते तर पुरोगामी विचार मांडल्यावर खुप ट्रोल झाले असते.'
....तसंच आज जे बाळासाहेबांचं नांव 'वापरून' त्यांचा फायदा घेऊ पहाताहेत, त्यांनीही बाळासाहेब हयात असते तर त्यांची तमा ठेवली नसती हे कटू सत्य आहे ! हे लोक ईडीला आणि दडपशाहीला घाबरून बाळासाहेबांना सोडून गेले असते आणि बाळासाहेबांवरही हेच हिंदुत्व सोडल्याचे आरोप केले असते.
बाळासाहेबांनीही आज वर्चस्ववाद्यांना राक्षसी फायदा होईल अशी धार्मिकता टाळली असती. या कपटी कावेबाजांना कधीच दूर केले असते. त्यांनी कायम त्या-त्या भवतालानुसार आवश्यक त्या भुमिका घेतल्या. त्या स्वबळावर पेलल्या. कुणाच्याही नांवाचा आधार न घेता लढले. तेच आज उद्धवजी करताहेत, म्हणून ते जनमानसाच्या हृदयात आहेत.
आज राजकारणात युती-आघाडी करावी लागणं ही काळाची गरज असते. पण ती करताना उद्धवजींनी कधी लाचारी पत्करली नाही. बाळासाहेबांचंही हिंदुत्व लाचार हतबल नव्हतं. पवारसाहेब, राहुल, सोनियाजी यांच्या बरोबरीने उद्धवजींच्या मताला किंमत असते. स्थानिक काॅंग्रेसचा दबाव असून सांगलीची जागा शिवसेनेला मिळणं ही त्यांच्या ताकदीची पावती आहे. तसेच कोल्हापूरला काॅंग्रेसच्या जागेचा यथोचित आदर करणं हे त्यांच्या नितळ मनाचं लक्षण आहे. देशपातळीवरही इंडीया आघाडीच्या मिटींग्जमध्ये उद्धवजींच्या शब्दाला वजन असते.
आत्ता सत्तेसोबत गेलेल्यांची एकेका जागेसाठीची लाचारी, हतबलता पाहून कळतंय की उद्धवजींनी केलं ते योग्यच केलं. 'जिथं आपल्या शब्दाला किंमत नाही तिथं लाथ घालायची', हा स्वाभिमानी बाणा तर बाळासाहेबांचा ! तो उद्धवजींमध्ये आहे म्हणून सर्वसामान्यांचं प्रेम त्यांना लाभतंय.
कुणी कितीही आपटा... तो त्याच्या बापाचं नांव लावतो, उसन्या बापाची गरज नाही त्याला. 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' नाम ही काफी है ! ईषय कट.
- किरण माने.