महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अमित राजसाहेब ठाकरे उद्या दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज अमित ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला..!
#MNSAdhikrut
माननीय अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 'लोककलेचा जागर - फोक प्रबोधन' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी नक्की उपस्थित राहा!
आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहर अधक्ष श्री. धनंजय विजय दळवी..
🗓 दिन��ंक: बुधवार, २७ मे २०२६
⏰ वेळ: सायंकाळी ६:३० वाजता
📍 स्थळ: गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट
#MNVSAdhikrut
छत्रपती शिवाजी महराजांच्या शेवटच्या क्षणांच्या काळात त्यांच्या निष्ठावान मावळ्यांना काय वाटलं असेल? यावर इतिहासकार आणि कादंबरीकार यांच्यातला झालेला संवाद, जो राजसाहेबांनी कालांतराने ऐकला. तो त्यांच्या शब्दांत...
महाराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...
#छत्रपति_शिवाजी_महाराज #राज_ठाकरे
#MNSAdhikrut
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी MIT विश्वशांती गुरुकुल, कोथरुड या शाळेच्या बेकायदेशीर फी वाढीविरोधात शाळेचे मुख्याध्यापक श्री. खैरनार, श्री. सानप व व्यवस्थापन यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि जाब विचारण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने शाळा व्यवस्थापनाची भेट घेत तीन दिवसांत फी वाढ रद्द करणेबाबत निर्णय घ्यावा असं ठामपणे सांगितले
यावेळी शहर अध्यक्ष धनंजय दळवी यांसह पुणे शहर उपाध्यक्ष ॲड. सचिन ननावरे, कोथरुड विभाग अध्यक्ष शशांक अमराळे, निलेश जोरी, केतन डोंगरे, हेमंत बोळगे तसेच उपविभाग अध्यक्ष आकाश बोबडे, ओम साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
#MNVSAdhikrut
कोस्टल रोडवरील बहुचर्चित 'मेलडी रोड' अवघ्या काही दिवसांतच बंद पडल्याने करदात्यांच्या पैशांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. नियोजनाचा अभाव आणि तांत्रि�� चुकांमुळे सामान्य जनतेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे यांनी पत्राद्वारे कोस्टल रोडवरील मेलडी रोडबाबत आणि आवाजाच्या त्रासाबाबत आधीच शंका उपस्थित केली होती, शेवटी आज तो प्रकल्प अपयशी ठरलाच..
यापुढे सरकारने अशा फसव्या प्रयोगांऐवजी पायाभूत सुविधांच्या दर्जाकडे अधिक लक्ष द्यावे, जेणेकरून सामान्य ���ागरिकांचे जीवन खऱ्या अर्थाने सुरळीत होईल हीच अपेक्षा.
#MNSAdhikrut #MNVSAdhikrut
कुटुंब सावरण्यापासून ते अंतराळ गाठण्यापर्यंत, प्रत्येक क्��ेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या सर्व माता-भगिनींना 'जागतिक महिला दिनाच्या' मनःपूर्वक शुभेच्छा!
#जागतिक_महिला_दिन #MNS