जवळपास 24 तास होत आले तरी अजून कालच्या मालवण प्रकरणावर पोलिसांनी किंवा निवडणूक आयोगाने कसलीही भूमिका घेतलेली नाही.
एफ आय आर देखील झालेली नाही.
त्यावर संबंधित आरोपी सांगत आहेत की त्या बागेत त्यांच्या व्यवसायाचे पैसे होते,
जर व्यवसायाचे पैसे होते तर तिथेच ते पैसे कुठून आले हे पटकन सांगायला पाहिजे होतं,
त्या व्यक्तीचं नाव आणि झालेला व्यवहार हा जागेवर सांगायला हवा होता, इन्कम टॅक्स एन्ट्री, जीएसटी नंबर या सगळ्या बाबत खुलासे करावे लागणार. नुसतं तो पैसा व्यवसायातला होता सांगून होणार नाही पुरावे सादर करावे लागतील.
🙏🏻
कणकवली नगरपंचायत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री समीर नलावडे आणि त्यांच्या मित्र परिवाराबद्दल दोन मिनिटं खालील प्रत वाचून घ्या.
वैयक्तिक टीका करण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही पण निवडणूक या पद्धतीने झाल्या तर निवडणुकीचा उपयोग काय??
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात झालेल्या भीषण स्फोटातील सर्व निरपराध नागरिकांच्या निधनाने मन अत्यंत व्यथित झाले आहे.
या भीषण प्रसंगी जीव गमावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी नागरिक लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
आपणा सर्वांना 'दीपावली' व आजच्या 'नरक चतुर्थी' च्या हार्दिक शुभेच्छा, ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा व्यक्त करतो.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेना मुख्यनेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांचे हिंदुत्वाचे प्रखर विचार ऐकण्यासाठी आलेल्या लाखो शिवसैनिकांच्या उपस्थितीत मुंबईतील नेस्को सेंटर, गोरेगाव येथे ''शिवसेना दसरा मेळावा'' पार पडला. यावेळी विचारांचे सोने लुटण्यासाठी आलेल्या कडवट शिवसैनिकांना शिंदे साहेबांच्या भाषणातून पुन्हा एकदा ताकदीने लढण्याची ऊर्जा संचारली आणि सर्वांनी वज्रमूठ दाखवून आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवून समृद्ध .. समर्थ.. विकसित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे सर्व नेते, मंत्री, उपनेते, खासदार, आमदार, प्रवक्ते तसेच लाखो शिवसैनिक उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा,खामदेव येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले
यावेळी शिवसेना आमदार @meNeeleshNRane साहेब यांनी संकष्टी चतुर्थीच्या शुभप्रसंगी इन्सुली येथील सुप्रसिद्ध श्री गणेश मंदिरात जाऊन गणरायाच्या चरणी मनोभावे दर्शन घेतले
अंगणवाडी लोकार्पण सोहळा, कुडाळ.
कुडाळ तालुक्यातील तुळसुली कदमवाडी येथे जिल्हा वार्षिक योजनेतून आणि शिवसेना विभाग प्रमुख श्री नागेश आईर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या अंगणवाडी वर्गाचे काम पूर्ण झाले असून, आज या नव्या अंगणवाडीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी शिवसेना उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. संजू परब, जिल्हा संघटिका सौ. दीपलक्ष्मी पडते, अंगणसेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज मुंबई विधानभवन येथे सार्वजनिक उपक्रम समितीची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) व महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ (MSEB) यांच्यातील महत्त्वपूर्ण कामकाज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सार्वजनिक उपक्रम समिती प्रमुख आमदार श्री. राहुल कुल, उद्योग विभागाचे सीइओ डॉ. वेलरासु, एम.एस.सी.बी. विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला, समितीचे अवर सचिव श्री. आशिष जावळे, समितीचे सर्व मान्यवर सदस्य आणि संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते.