आमचे मार्गदर्शक,केंद्रीय मंत्री मा.@nitin_gadkari जी यांच्या हस्ते उद्या बास्केट ब्रिजचे भूमिपूजन होणार आहे. त्यानिमित्त ते कोल्हापुरात दाखल झाले असता त्यांची भेट घेऊन करवीर नगरीत स्वागत के��े.
यावेळी इथेनॉल,राष्ट्रीय महामार्ग व ड्रोनद्वारे औषध फवारणीच्या तंत्रज्ञानावर चर्चा झाली.
देशाचे पंतप्रधान मा.@narendramodi यांच्या संकल्पनेतून #ParikshaPeCharcha या अभियानातून देशभरात विविध उपक्रम घेण्यात आले. आज कागल मधील श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसोबत मा.नरेंद्र मोदीजी यांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या ऑनलाईन संवाद कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
भाजपा कोल्हापूरच्यावतीने 'परीक्षा पे चर्चा' या संकल्पनेअंतर्गत श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर, कागल येथे चित्रकला स्पर्धेचे आयोज�� करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांच्या हस्ते पार पडला.
राजे बँकेचे कर्मचारी श्री. नामदेव साळुंखे यांचे काही काळापूर्वी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी त्यांच्या पत्नी अर्चना साळुंखे यांना नामदेव यांच्या जागी बँकेत रुजू करून घेऊन शाहू समूहामार्फत सहकार्य केले. याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
#कागल मधील एसटी स्टॅन्डजवळ बसवण्यात आलेल्या कागलाधिपती जयसिंगराव घाटगे यांच्या दयनीय अवस्था झालेल्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी कागलमधील नागरिकांच्या शिष्टमंडळाने मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. "मला खात्र��� आहे आमदार साहेब येत्या काही दिवसातच या कामाचे पुन्हा उद्घाटन करतील!"
भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू असतानाच काल देशाचे मा.पंतप्रधान @narendramodi यांनी आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले.ब्रिटिश गुलामगिरीच्या मानसिकतेचे प्रतीक बनलेल्या राजपथाचे नाव बदलून त्यांनी #KartavyaPatha असे ठेवले आ���े.त्यांनी घेतलेल्या कौतुकास्पद निर्णयाबद्दल मनःपूर्वक आभार!
कागलमधील आंबेडकर नगर येथील शाहू कारखान्यात कार्यरत असलेले श्री.शशिकांत कांबळे यांचा नातू व श्री.ऋषिकेश कांबळे यांचा मुलगा रोनक याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आग्रहाचे निमंत्रण दिले होते. यावेळी सौ.नवोदिता घाटगे यांच्यासह उपस्थित राहून रोनकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आज राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या प्रधान कार्यालयात माजी सैनिक आणि बँकेचे सुरक्षा रक्षक लक्ष्मण डावरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्राभिमानाने मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा झाला.
#IndependenceDay
भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापूर ग्रामीण व शहर जिल्हा कार्यकारीणी बैठक आज पार पडली. या बैठकीस उपस्थित राहिलो होतो. मागील काळातील कार्याचा आढावा घेत भविष्यातील अनेक योजना आणि कामकाजावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत विस्तृत चर्चा झाली.
#BJP
भादवणवाडी, हिरलगे, आत्याळ, गडहिंग्लज शहर येथील बूथ प्रमुखांच्या पदनाम फलकांचे अनावरण केले. गेले दोन महिने चालू असलेल्या या सोहळ्यादरम्यान भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांची भेट होत आहे. या प्रत्येकवेळी ते भाजपप्रति समर्पित वृत्तीने कार्यरत आहेत,हे प्रकर्षाने जाणवते. हेच आमचे यश आहे!