जय भवानी अशोक पाटील मित्र मंडळ, सेक्टर-१५ आयोजित सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२६ !
मंडळाचे अध्यक्ष, स्थायी समिती सभापती व नगरसेवक श्री.अशोक पाटील यांनी सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत, जागृत देवी मातेच्या दर्शनासाठी सर्व भाविकांनी आवर्जून भेट द्यावी, असे सस्नेह निमंत्रण दिले
जय भवानी अशोक पाटील मित्र मंडळ से-१५ व जय भवानी मित्र मंडळ से-१५ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२६' निमित्त स्थायी समिती सभापती व नगरसेवक श्री.अशोक पाटील व मा नगरसेविका सौ. संगीता पाटील यांच्या हस्ते देवी मातेची घटस्थापना करून मनोभावे आरती करण्यात आली.
शारदीय नवरात्र उत्सव व घटस्थापना निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
शक्ति, श्रद्धा आणि भक्तीचा जागर म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव! या नऊ दिवसांच्या आराधनेतून आपल्या जीवनात आनंद, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो हीच दुर्गामातेच्या चरणी प्रार्थना..!
#Navratri2026#ShardiyaNavratri
"ज्यांच्या लेखणीने सामान्�� माणसाच्या साध्या गोष्टींना जगभरात अजरामर केले..."
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित, प्रख्यात इंग्रजी साहित्यिक आर. के. नारायण यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
📍महासभा बैठकीतील मंजूर ठरावांवरील कार्यवाहीचा आढावा बैठक !
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत मंजूर झालेल्या विविध ठरावांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठ��� महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष बैठकीस उपस्थित राहून विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहणारे पराक्रमी योद्धे, शिवरत्न वीर जिवाजी महाले यांच्या पावन जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#JivaMahale#वीर_जिवा_महाले#जयमहाराष्ट्र
वाहेगुरू जी का खालसा, वाहेगुरू जी की फतेह!
स्वाभिमान, एकता आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची शिकवण देणाऱ्या गुरू गोविंदसिंह जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम!
#GuruGobindSinghJi#Waheguru#SikhHeritage#Tribute#Sikhism
सत्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक न्यायाचा भक्कम पायवा रचणारे महान तत्त्वज्ञ आणि शिख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देव जी यांच्या ज्योती ज्योत पर्वाप्रसंगी त्यांच्या स्मृतीस शतशः प्रणाम!
#GuruNanakDevJi#JyotiJyotDiwas
आज जागतिक शिक्षक दिन.
प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत शिक्षक हा महत्त्वाचा दुवा असतो. शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
#WorldTeachersDay2026#जागतिकशिक्षकदिन
"माणुसकीची खरी परीक्षा मुक्या प्राण्यांशी आपण कसे वागतो यात आहे!"
आज जागतिक प्राणी दिन!
चला, प्राण्यांना प्रेम देऊया, त्यांच्याशी दयाळूपणाने वागूया आणि या पृथ्वीला सर्व जीव��ंसाठी सुंदर बनवूया.
#WorldAnimalDay #जागतिकप्राणीदिन #प्राणीप्रेम
संत बाळूमामा जन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
साधेपणा, निसर्गसेवा आणि अथांग भक्तीचा मार्ग दाखवून भक्तांच्या दुःखाचा परिहार करणारे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्व भावीक भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
॥ बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं ॥
#BalumamaJayanti
मायबोली मराठीचा जयजयकार!
हजारो वर्षांची समृद्ध संस्कृती आणि साहित्य परंपर�� लाभलेल्या आपल्या ला��क्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या ऐतिहासिक क्षणाचा पुनरुच्चार करत, सर्वांना 'मराठी अभिजात भाषा गौरव दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी!