बुद्धिमान, अभ्यासू आणि अष्टपैलू नेतृत्व, राजकारणातील चालते-बोलते विद्यापीठ, विकासाची आधुनिक दृष्टी असलेले लोकनेते, कर्तृत्व आणि दातृत्वाचे महामेरू अशी ख्याती असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि परममित्र श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
जीवेत शरदः शतम्!
शेक्सपिअर म्हणतो, 'नावात काय आहे?', पण मी म्हणतो, 'देवेंद्र! बस नाम ही काफी है ! ते महाराष्ट्राच्या राजकारणातले ‘बिग डी’ आहेत. हा ‘डी’ डिव्होशन, डेडिकेशन, डीटर्मिनेशन, डिसिप्लिन आणि डेअरिंगचाही आहे. ते कधी 'एआय'च्या भरवशावर राहत नाहीत, कारण त्यांच्याकडे 'एनआय' म्हणजेच नॅचरल इंटेलिजन्स आहे.
ते जेवढे कायद्याचे पक्के आहेत, तेवढेच वायद्याचेही. देवेंद्रजींच्या भक्कम निर्धाराला मेहनतीची जोड आहे. ते सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड आहे. देवेंद्रजी म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाची धगधगती ज्वाला आहेत. अशा अष्टपैलू, संवेदनशील आणि निष्कलंक नेत्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्यच. त्यांच्यासारखा अहोरात्र काम करणारा, महाराष्ट्राच्या जनतेशी नाळ जोडलेला नेता राज्याला मिळणे हे आपले भाग्य आहे.
'वाढदिवस' या शब्दात केवळ वय वाढणे हा अर्थ अपेक्षित असतो, परंतु देवेंद्रजींच्या बाबतीत मात्र प्रत्येक वर्ष, प्रत्येक दिवस हा त्यांची किर्ती आणि कर्तृत्व वाढवणारा ठरलेला आहे आणि यापुढेही ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या मातीची सेवा करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो, आरोग्याची उत्तम साथ मिळो, त्यांच्या कर्तृत्वाचा सुवास सदैव दरवळत राहो, त्यांच्या राजकीय यशाचा आलेख सतत उंचावत राहो आणि किर्तीचा वेलू गगनावर चढो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
त्यांच्या भावी राजकीय प्रवासासाठी आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी उदंड शुभेच्छा...
#DevendraFadnavis
@Dev_Fadnavis
आजचा २२ जुलैचा दिवस हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि त्याचवेळी महायुतीचे एक शिल्पकार, अजित पवार यांच्या उदास करणाऱ्या स्मृती घेऊन आलेला आहे. एका डोळ्यांत आनंद आणि एका डोळ्यांत अश्रू असा हा दिवस आहे. अजितदादांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. दादांची जागा कोणीही भरून काढणे शक्य नाही. मात्र दादांच्याच कार्यपथावरून वाटचाल करताना, सुखी-संपन्न महाराष्ट्र घडविण्याची दादांची इच्छा पूर्ण करण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना बळ मिळो, अशा सदिच्छा मी देतो.
कार्यकर्ते कसे सांभाळावेत, वक्तशीर कसे असावे, दिवसातला प्रत्येक क्षण कामात कसा घालवावा आणि त्याचवेळी प्रशासनावरही पकड ठेवावी, अशा अनेक
बाबींचा धडा अजित पवार यांनी घालून दिला आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी महायुतीच्या सर्व वचनांची पूर्तता अर्थसंकल्पातून केली होती. शेतीचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, सहकारातील समस्या यांचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. आम्ही एकत्रितरित्या महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक प्रगतीची स्वप्ने पाहिली होती. परंतु काळाने त्यांच्यावर अचानक घाला घातला. दादांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.
दिवस येतील-जातील, कालचक्र फिरत राहील
दादांच्या स्मृतींचा सुगंध सदैव दरवळत राहील..
#AjitPawar
महाराष्ट्राच्या धर्मेतिहासाचा सखोल, सूक्ष्म आणि सर्वांगीण अभ्यास प्रातिभा बुद्धीने करणारे संशोधक रा. चिं. ढेरे यांची आज जयंती. महाराष्ट्र संस्कृतीच्या भाष्यकारांपैकी एक प्रमुख असलेल्या ढेरे यांना विनम्र आदरांजली.
📍 #मुंबई |
ग्रॅमी पुरस्कार विजेते गायक, संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानित युवा गायिका रीवा राठोड यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेल्या ‘पालखी निघाली वारीला’ हे नवीन भक्तिगीत रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकत्याच या गाण्याचे अनावरण करण्यात आले.
ज्येष्ठ गायक-संगीतकार रूप कुमार राठोड आणि गायिका सुनाली राठोड यांची कन्या असलेल्या रीवाने या गीताच्या माध्यमातून प्रथमच मराठीत गायन केलं असून, तिच्या सुरेल आवाजाने या भक्तिगीताला एक वेगळीच उंची मिळाली आहे.
आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात आणि विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि वारकऱ्यांच्या अखंड भक्तीभावात रंगलेलं हे गाणं ऐकणे म्हणजे वारीचा एक वेगळा आध्यात्मिक अनुभव घेण्यासारखे ठरेल अशा शुभेच्छा यावेळी दिल्या.
यावेळी ज्येष्ठ गायक संगीतकार रूप कुमार राठोड, त्यांच्या पत्नी गायिका सुनाली राठोड, गायिका रीवा राठोड, गीतकार डॉ.दीपक वझे, निर्मात्या श्वेता परुळकर उपस्थित होत्या.
#Mumbai #EknathShinde #Maharashtra
राज्याचे माजी मंत्री व भाजपा नेते व खासदार श्री.विनोद तावडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
@TawdeVinod
पंढरपूर |
आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी॥१॥
जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर ॥२॥
आषाढी वारीनिमित्त आज पंढरपुरात जाऊन जिल्हा प्रशासनाने केलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी आगामी वारी ही वारकऱ्यांसाठी स्वच्छ, सुंदर, निर्मळ आणि आरोग्यदायक वारी व्हावी यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन केले.
यानिमित्ताने पंढरपुरातील ६५ एकर, पत्राशेड दर्शन रांग, चंद्रभागा नदीच्या पात्रात केलेल्या सोयीसुविधा, भक्ती सागर येथे वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेले आयसीयू सेंटर यांची पाहणी केली. तसेच चंद्रभागा नदीत बोटीतून फेरफटका मारून ठिकठिकाणी केलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला.
यंदाची वारी ही स्वच्छ, निर्मळ आणि पर्यावरणपूरक वारी व्हावी यासाठी रस्ते स्वच्छ करण्यात आलेत, शहरातील खड्डे पूर्णपणे बुजवण्यात आलेत, शहरात ठिकठिकाणी तात्पुरती स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत, पिण्याचे आणि स्वच्छतेसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
बहुतांश तयारी ही समाधानकारक झाली असली, तरीही अतिरीक्त गरज लागल्यास मुंबई - पुण्यातील मनपा कडून सक्षन मशीनची मागणी करावी, ३०० अतिरिक्त कंत्राटी स्वच्छता कामगार तैनात करावे, चंद्रभागेच्या तीरावर महिला आणि पुरुषांसाठी अतिरिक्त कपडे बदलण्याच्या शेड बांधाव्या, निधीची कमतरता जाणवल्यास त्याची मागणी करावी नगरविकास विभागाकडून त्याची पूर्तता केली जाईल असेही यावेळी स्पष्ट केले. वारकरी हाच खरा व्हीआयपी मानून त्याच्या चेहऱ्यावर इथून परतताना समाधानाचे भाव दिसायला हवे यासाठी प्रशासनाने शक्य ते सारे प्रयत्न करावे असे यावेळी सर्वांना सांगितले.
यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान अवताडे, आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Pandharpur #Vithoba #Rakhumai #Pandurang #EknathShinde
@abitkar_prakash@iYogeshRKadam
📍 पंढरपूर |
बोलावा विठ्ठल ।
पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल ।
जीवभाव !
आषाढी वारिसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरला गेलो असता आज विठ्ठल- रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले.
पंढरपूरच्या वारीतला खरा व्हीआयपी हा सर्वसामान्य वारकरी असून त्याची वारी सुखाची आणि संपूर्ण व्हावी यासाठी शक्य ते सारे प्रयत्न आम्ही करत आहोत. यंदा भाविकांची दर्शन रांगेत मोठी गर्दी असून त्यांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावे यासाठी मी आणि माझ्या सहकारी मंत्र्यांनी विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीच्या वतीने माझा शाल आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार विठ्ठलाचा कृपाशीर्वाद मानून त्याचा विनम्रपणे स्वीकार केला.
यावेळी मंदिर जतन आणि संवर्धनाचे कामाचा तसेच प्रस्तावित नवीन दर्शन मंडपाच्या कामाचा देखील आढावा घेतला. तसेच पंढरपूर कॉरिडॉरबाबत नागरिकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही करण्यात येईल असेही स्पष्ट केले.
यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील आणि सबंधित अधिकारी उपस्थित होते.
#Pandharpur #Vithoba #Rakhumai #Pandurang #EknathShinde #Maharashtra
@abitkar_prakash@iYogeshRKadam