राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. मागे नितीन गडकरींनी मला सांगितलं होतं कंत्राटदार कंटाळून निघून गेले म्हणून हे काम रखडलं आहे. पण ते कंत्राटदार का कंटाळले याचा विचार केला पाहिजे.
#Rajthackeray#MumbaiGoaHighway#MNSAdhikrut#MNVSAdhikrut#Potholes
आज ९ ऑगस्ट २०२६ रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माणगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला.
• राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. मागे नितीन गडकरींनी मला सांगितलं होतं कंत्राटदार कंटाळून निघून गेले म्हणून हे काम रखडलं आहे. पण ते कंत्राटदार का कंटाळले याचा विचार केला पाहिजे.
• आपल्याकडे कामापेक्षा टक्केवारीचा विचार जास्त होतो त्यामुळे आपल्याकडचे कंत्राटदार कंटाळलेत.
• आमच्या जमिनी, आमचं पाणी, आमची वीज यावर बाहेरचे पोसले जाणार असतील या विकासाचा काय उपयोग ?
• काही दिवसांत मुंबई-गोवा महामार्ग सुरू होईल हे आपण गेली १५ वर्ष ऐकतो आहोत. पुन्हा काही दिवसांनी महामार्गावर चाकरमानी अडकल्याच्या बातम्या येणार आहेत.
• कोणत्याही विकासकामांना विरोध करण्याचा आमचा हेतू नाही पण कोकणातील परिस्थिती पाहिली तर असं वाटतं असा विकास नको.
• सरकार नावाची जी गोष्ट असते त्या सरकारने आपल्या लोकांचं हित पहायचं असतं, ती जबाबदारी सरकारची असते. लोकांच्या हितापुढे पालकमंत्रीपदाचा वाद हा क्षुल्लक आहे.
• कोकणात तिसऱ्या मुंबईचा प्रकल्प येतोय त्याबाबत स्थानिकांना कल्पना नाही. इथले तरुण-तरुणी या गोष्टीसाठी तयार आहेत का? बाहेरच्या तरुणांना कळतं महाराष्ट्रात काय होणार आहे त्यासाठी तयारी करून ते इथे येतात आणि आपले तरुण अंधारात राहतात.
• मी अनेकदा सांगितलं आहे तुमचं अस्तित्व म्हणजे तुमच्या पायाखालची जमिन आहे. जेव्हा तुम्ही ती जमिन विकता तेव्हा तुमचं अस्तित्व संपतं.
सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या नाशिक जिल्हा क्षेत्रात खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
#MNSAdhikrut
अनेक वर्षांनंतर आज कॉलेजच्या बेंचवर बसलो आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या... Nostalgic वाटलं! पण आजचा खरा उद्देश होता तो या महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा..
१ तारखेपासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सभासद नोंदणी सुरू झाली आणि ठरवल्याप्रमाणे आम्ही आता प्रत्येक महाविद्यालय व विद्यालयात जाऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत. आज दक्षिण मुंबईपासून सुरुवात केली आहे, संपूर्ण मुंबई कव्हर करून नाशिक, नागपूर, संभाजीनगरसह महाराष्ट्रातील ग्रामीण भाग आणि प्रत्येक तालुक्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. शहरांचे आणि ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत, पण एकंदरीत परिस्थिती सगळीकडेच बिकट आहे.
आज प्रत्यक्ष फिरताना अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले. एल्फिंस्टनसारख्या महाविद्यालयात पिण्याचं पाणी नाही, पाणी प्यायलो तर पोट बिघडतं आणि मुलींसाठी वॉशरूम्सची सोय नसून त्यांना घरी जावं लागतं; रोजगार सोडून द्या, शिक्षणाची आणि मूलभूत सुविधांची ही अशी बिकट परिस्थिती आहे! शिक्षण मंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री काय करत आहेत? तरुण आणि पालकांनी तुम्हाला सत्तेत बसवलंय, तर या बेसिक प्रश्नांकडे लक्ष देणं ही तुमचीच जबाबदारी आहे.
दुसरीकडे राज साहेबांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेत नीट आणि चीनमधील परीक्षा पद्धतीची तुलना करून सत्य मांडले. हा लोकसंख्येचा विषय नसून अंमलबजावणी आणि इच्छाशक्तीचा विषय आहे; चीनमध्ये सिक्युरिटीजपासून ते परीक्षा कालावधीत बांधकामे बंद ठेवण्यापर्यंत काळजी घेतली जाते, पण आपल्याकडे नीटचा पेपर फुटल्यानंतर काय होणार यावर चर्चा होते, 'पेपर फुटणारच नाही' यासाठी काय करणार यावर शासन कधी बोलणार?
तुम्ही सभासद व्हा किंवा नका होऊ, तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुमचे प्रश्न सोडवणं ही आमची जबाबदारी आहे. पाणी असो वा वॉशरूम... हे बेसिक प्रश्न आम्ही महाविद्यालयात जाऊन सोडवणार! सभासद नोंदणी फॉर्मच्या पाठीमागे तुमच्या वैयक्तिक किंवा कॉलेज लेव्हलच्या अडचणी लिहून द्या, टप्प्याटप्प्याने त्या सर्व समस्या आम्ही सोडवून देऊ.
हे सरकार तरुण-तरुणींना आणि त्यांच्या आंदोलनांना घाबरलं आहे. रस्त्यावर उतरलेली ही गर्दी कुठल्या राजकीय पक्षाची नाही, तर जनतेचा स्वतःचा आवाज आहे! नरिमन पॉईंटचे ग्राउंड असो वा लीलावती हॉस्पिटल समोरील मोकळे मैदान... खेळाडू जाणार कुठे? आपले वानखेडे सोडून फायनल्स अहमदाबादला नेल्या जातात आणि मुंबईतील उरलीसुरली मैदाने कन्व्हेन्शन सेंटर्ससाठी बळकावली जात आहेत. आपल्या मुलांनी खेळायचे कुठे? हे ग्राउंड्स तरुण-तरुणींचे आहेत, ते वाचवण्यासाठी आम्ही आणि ज्यांना ज्यांना सोबत यायचे आहे ते सर्व एकत्र येऊन संघर्ष करू आणि ही मैदाने वाचवू! मी प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक जाऊन भेटणार आहे. जर मी पोहोचू शकलो नाही,तर माझा नंबर घ्या... विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी मी नक्की येईन!
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सदस्य नोंदणी सध्या राज्यभरात पूर्ण ताकदीने सुरू आहे. याच निमित्ताने आज दक्षिण मुंबईतील विविध महाविद्यालयांना भेटी देऊन तिथल्या नोंदणी अभियानाचा आढावा घेतला.
महर्षी दयानंद महाविद्यालय, महाराष्ट्र कॉलेज, एल्फिंस्टन कॉलेज, भवन्स कॉलेज आणि लाला लजपतराय महाविद्यालय... या सर्व ठिकाणी सदस्य नोंदणीला आणि युनिट उद्घाटनाला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे!
हा मिळणारा प्रतिसाद म्हणजे सध्याच्या शिक्षणव्यवस्थेवर नाराज असलेल्या तरुणाईचा आवाज आहे. परीक्षांचे रखडलेले निकाल असोत, ॲडमिशनमधला सावळागोंधळ असो की पायाभूत सुविधांची कमतरता... आजचा तरुण या बिघडलेल्या व्यवस्थेला कंटाळला आहे आणि त्याला यात बदल घडवून आणायचा आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा सदस्य होणे म्हणजेच या चुकीच्या सिस्टीमला थेट आव्हान देणे आणि ती बदलेपर्यंत लढत राहणे! हाच विचार मनात ठेवून आज महाराष्ट्रातील तरुण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहे.
या भेटीदरम्यान केवळ विद्यार्थीच नाही, तर तिथे कार्यरत असलेल्या प्राध्यापक आणि शिक्षकांशीही संवाद साधला. शिक्षणव्यवस्थेतील सध्याच्या अडचणी आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील, यावर चर्चा झाली.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कार्यरत होती, आहे आणि यापुढेही खंबीरपणे कार्यरत राहील! विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, आणि त्यांच्यावरील अन्यायाविरोधात आमचा हा लढा असाच सातत्याने सुरू राहील.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सदस्य नोंदणी अभियान १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात सुरू आहे.
खडकमाळआळी घोरपडे पेठ सेंट टेरेसा चौक कसबा मतदारसंघ, पूणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केंद्र उभारले असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, शिक्षणाशी निगडित प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्य व्हा!
https://t.co/d1KyMziqzy
#AmitThackeray
#JoinMNVS #MNVSAdhikrut #mnsadhikrut_
मा. राजसाहेब ठाकरे यांनी ६ आणि ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिकच्या दौऱ्यात पदाधिकारी आणि नाशिकमधील सहकाऱ्यांच्या सोबत बैठका घेतल्या. आणि आज ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला.
#MNSAdhikrut
“दिल्लीत जंतरमंतरला जे आंदोलन झालं, तिथे विद्यार्थी, तरुण-तरुणी जमले ते काही फक्त NEET परीक्षेतील घोटाळ्यांमुळे त्रस्त झालेले विद्यार्थी नव्हते. ते आसपासच्या एकूणच परिस्थितीने त्रस्त झालेले विद्यार्थी होते. जंतरमंतरवरचं आंदोलन ही सुरुवात आहे. हे आंदोलन घराघरात शिरलं. जेंव्हा आंदोलकांना मारलं तेंव्हा प्रत्येकाला वाटलं की माझ्या मुलाला मारलं.”
मा. राजसाहेब ठाकरे
#MNSAdhikrut
“राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडू काल मला नाशिकमध्ये भेटायला आले, माझी आणि त्यांची भेट झाली नाही अशा बातम्या मी पाहिल्या. मुळात श्री. गावित हे मला भेटायला आलेत हेच मला माहित नव्हतं, मला कोणी सांगितलं नाही. त्यामुळे भेट झाली नाही. बाकी ते जर भेटायला आलेत असं कळलं असतं तर भेट नक्की झाली असती. मी का भेटणार नाही ? पण त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. पण या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सध्या ते दिल्लीला गेलेत असं कळलं, ते तिकडून आले की मी निश्चितपणे त्यांची भेट घेईन.”
मा. राजसाहेब ठाकरे
#MNSAdhikrut
६ आणि ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिकच्या दौऱ्यात पदाधिकारी आणि नाशिकमधील माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत बैठका घेतल्या. आणि आज ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला.
१) राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडू काल मला नाशिकमध्ये भेटायला आले, माझी आणि त्यांची भेट झाली नाही अशा बातम्या मी पाहिल्या. मुळात श्री. गावित हे मला भेटायला आलेत हेच मला माहित नव्हतं, मला कोणी सांगितलं नाही. त्यामुळे भेट झाली नाही. बाकी ते जर भेटायला आलेत असं कळलं असतं तर भेट नक्की झाली असती. मी का भेटणार नाही ? पण त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. पण या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सध्या ते दिल्लीला गेलेत असं कळलं, ते तिकडून आले की मी निश्चितपणे त्यांची भेट घेईन.
२) मी २००३ आणि २०१५ असे दोन कुंभमेळे पाहिले. २०१५ च्या कुंभमेळ्याबद्दल बोलूया. २०१५ च्या कुंभमेळ्याची तयारी म्हणून जी कामं झाली, त्याचं जे नियोजन झालं ते इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने झालं, उत्तम कामं झाली, उत्तम रस्ते झाले, सगळं नियोजन झालं. हे का झालं ? तर यातून काही अर्थकारण व्हावं असला उद्देश नव्हता. उत्तम काम व्हावं ही इच्छा होती म्हणून ते शक्य झालं. पण आत्ता जे दिसतंय, जे ऐकायला येतंय त्यातून सध्याच्या या सत्ताधाऱ्यांना यातून फक्त कमिशन कमवायचं आहे. यातले बरेचसे काँट्रॅक्टर्स गुजरातमधले आहेत. थोडक्यात वरून जसे आदेश येईल तसं वागायचं इतकंच ठरलं आहे. बाकी रस्त्यांची चाळण झाली आहे, खड्ड्यात पडून अपघात होत आहेत, माणसं मरत आहेत याचं या सरकारला काही घेणंदेणं नाही.
३) मला वाईट वाटतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात आम्ही नाशिक शहर इतकं सुंदर केलं, इतके चांगले रस्ते बांधले, त्या सगळ्याची पार वाट लागली आहे. बोटॅनिकल गार्डन असेल की माननीय बाळासाहेबांच्या नावाने उभारलेलं स्मारक असेल सगळ्याची पार वाट लावून टाकली आहे. दुसऱ्यांनी केलं मग ते का टिकवायचं, ही कुठली वृत्ती ? नाशिकमध्ये झाडं तोडली गेली, लोकांनी आंदोलनं केली, प्रशासन ढिम्म राहिलं, तरीही नाशिककर जर त्याच लोकांना निवडून देणार असतील तर काय बोलायचं ?
४) दिल्लीत जंतरमंतरला जे आंदोलन झालं, तिथे विद्यार्थी, तरुण-तरुणी जमले ते काही फक्त NEET परीक्षेतील घोटाळ्यांमुळे त्रस्त झालेले विद्यार्थी नव्हते. ते आसपासच्या एकूणच परिस्थितीने त्रस्त झालेले विद्यार्थी होते. जंतरमंतरवरचं आंदोलन ही सुरुवात आहे. हे आंदोलन घराघरात शिरलं. जेंव्हा आंदोलकांना मारलं तेंव्हा प्रत्येकाला वाटलं की माझ्या मुलाला मारलं.
५) सध्या एक विचित्र ट्रेंड सुरु आहे. दहावीची परीक्षा झाली की मुलं आधी क्लास लावणार आणि मग क्लास मुलांना सांगणार कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्या ते. ही मुलं ८,८ तास क्लासला जाऊन बसणार असतील, तर मग कॉलेज काय करत आहे ? कोचिंग क्लासेसकडूनच NEET चा पेपर फुटला. आता नंदन निलेकणीना आणलं आहे, त्यांनी क्लासेसवर पहिलं लक्ष आणावं. कॉलेजची फी २० हजार आणि क्लासेसची फी १ लाख ४० हजार रुपये, हे काय आहे ? क्लासला ८ तास बसल्यावर कॉलेजला अटेंडंन्स कशी लागते ? म्हणजे क्लास आणि कॉलेजमध्ये काही अर्थकारण आहे का ? आणि या सगळ्याने त्रस्त झाल्यावर विद्यार्थी चिडले, त्यांनी आंदोलन केलं तर त्यांचं चुकलं काय ?
६) काल नाशिकमध्ये विद्यार्थी भेटले ते म्हणाले, सर परत पेपर नाही ना फुटणार ? मला ऐकूनच वाईट वाटलं. काल नाशिकमध्ये मला NEET परीक्षेतील गोंधळाने नैराश्य येऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे (यश गोसावी ) आई वडील भेटले. ज्या २१ मुलांनी आत्महत्या केली त्यात त्याचं नाव नाहीये. आपल्या जिल्ह्यातील मुलगा व्यथित होऊन आत्महत्या करतो, याबद्दल पालकमंत्र्यांना सहानुभूती नाही वाटत ?
७) सध्या भाजपमध्ये अंतर्गत सत्तासंघर्ष सुरु आहे. तुम्ही जेंव्हा बाहेरचे शत्रू संपवता तेंव्हा तुमच्या आत शत्रू तयार होतात हा इतिहास आहे आणि हेच भाजपमध्ये सुरु आहे.
८) क्लासेसचा जो काही धंदेवाईक अप्रोच आहे आणि कॉलेजेसची काही भूमिकाच नाहीये या सगळ्यावर सरकारने आता स्पष्ट भूमिका घ्यावी. वर्तमानपत्रांत पानपानभर क्लासेसच्या जाहिराती येतात की हा पहिला आणि तो पहिला आला. कसा आला ? जेंव्हा पहिल्यांदा NEET चा पेपर फुटला तेंव्हा त्याचा रेट २५ लाख होता असं ऐकायला आलं आणि आता तो दीड कोटी होता असं ऐकायला आलं. डॉलरचा रेट का वाढला हे कळलं आता.
९) आज देशातील तरुण-तरुणी त्यांच्या मोबाईलवर बाहेरचे जग बघतात आणि जेंव्हा आसपासची परिस्थिती बघतात तेंव्हा त्यांना नैराश्य नाही का येणार ? त्यांना का रहावसं वाटेल इथे ? या सरकारमधल्या मंत्र्यांची मुलं परदेशात शिकतात, ज्यांचा राजीनामा झाला त्या धर्मेंद्र प्रधानांची मुलगी परदेशात शिकत आहे. जर तिचाच या देशातील शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलो आहोत आपण ?
“मी २००३ आणि २०१५ असे दोन कुंभमेळे पाहिले. २०१५ च्या कुंभमेळ्याबद्दल बोलूया. २०१५ च्या कुंभमेळ्याची तयारी म्हणून जी कामं झाली, त्याचं जे नियोजन झालं ते इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने झालं, उत्तम कामं झाली, उत्तम रस्ते झाले, सगळं नियोजन झालं. हे का झालं ? तर यातून काही अर्थकारण व्हावं असला उद्देश नव्हता. उत्तम काम व्हावं ही इच्छा होती म्हणून ते शक्य झालं. पण आत्ता जे दिसतंय, जे ऐकायला येतंय त्यातून सध्याच्या या सत्ताधाऱ्यांना यातून फक्त कमिशन कमवायचं आहे. यातले बरेचसे काँट्रॅक्टर्स गुजरातमधले आहेत. थोडक्यात वरून जसे आदेश येईल तसं वागायचं इतकंच ठरलं आहे. बाकी रस्त्यांची चाळण झाली आहे, खड्ड्यात पडून अपघात होत आहेत, माणसं मरत आहेत याचं या सरकारला काही घेणंदेणं नाही. मला वाईट वाटतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात आम्ही नाशिक शहर इतकं सुंदर केलं, इतके चांगले रस्ते बांधले, त्या सगळ्याची पार वाट लागली आहे.”
मा. राजसाहेब ठाकरे
#MNSAdhikrut
राजसाहेब ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्याच्या घोषणेला ९ वर्ष झाली, या काळात नाशिकची पूर्ण दुरवस्था झाली आहे. नाशिकवरच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यात पडून नागरिक दगावत आहेत. शहर बकाल झालं आहे. या सगळ्याचा लेखाजोखा घेण्यासाठी, आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी राजसाहेब नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळेस नाशिकमधील जेनझीने त्यांची भेट घेतली.
#Rajthackeray #students #NEETprotest
#MNSAdhikrut
ठाण्यात रस्त्यात खड्डे आहेत पण तरीही त्याला 'स्मार्ट सिटी' म्हणण्याचा सत्ताधाऱ्यांचा आग्रह आहे. अशा स्मार्ट (खड्डेयुक्त ) सिटीतील खड्ड्यात झाडं लावून प्रशासनाचा निषेध नोंदवणारं प्रतीकात्मक आंदोलन महाराष्ट्र सैनिकांनी केलं.
#MNSAdhikrut#Thane
आंध्र प्रदेशाने ‘अल्लुरी सीताराम राजू’ यांच्या नावाचा विमानतळाचा प्रस्ताव दिला आणि अवघ्या दोन वर्षांत उद्घाटनही झाले.
महाराष्ट्र सरकारने दोन्ही सभागृहात ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ नावाचा ठराव सर्वानुमते मंजूर करून केंद्राकडे पाठवूनही सहा वर्षे उलटली, तरी अंतिम मंजुरी नाही !
याचप्रकारे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ ( छत्रपती संभाजीनगर ) व जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ( लोहगाव-पुणे ) या विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव अजूनही मोदी सरकारने मंजूर केले नाहीत.
आंध्रला लगेच न्याय, पण महाराष्ट्राला विलंब… हा निव्वळ योगायोग आहे की महाराष्ट्राच्या अस्मितेचा जाणीवपूर्वक केलेला अपमान समजावा ?
मोदी सरकारने तमाम शिवप्रेमी, वारकरी संप्रदाय व भूमिपुत्रांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये.
#दि_बा_पाटील_आंतरराष्ट्रीय_विमानतळ
सस्नेह जय महाराष्ट्र 🚩
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सदस्य नोंदणी कशी करायची, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणाऱ्या या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने संपूर्ण नोंदणी प्रक्रिया समजावून सांगितली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला सहजपणे सदस्य नोंदणी करता येईल.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या या चळवळीचा भाग होण्याची ही उत्तम संधी आहे. अवघ्या काही मिनिटांत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने सदस्य नोंदणी पूर्ण करू शकता. व्हिडिओमध्ये दिलेल्या सूचनांनुसार संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरून तुमची नोंदणी निश्चित करा.
ज्यांना प्रत्यक्ष नोंदणी करायची आहे, त्यांच्यासाठी महाराष्ट्रभर विविध ठिकाणी सदस्य नोंदणी स्टॉल्सही उभारण्यात येत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नव्या उर्जेसह पुढे जात आहे. फक्त सदस्य न राहता सक्रिय सदस्य होण्याचा निर्धार करा आणि विद्यार्थ्यांसाठी उत्तम शिक्षण व्यवस्था घडवण्याच्या या मोहिमेत सहभागी व्हा.
आजच भेट द्या 👉 https://t.co/pWHePoJuIh
लढणार आपण,घडणार आपण
सहभागी व्हा ! सदस्य व्हा !!