फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, 'लिजेंड ऑफ मौला जट' नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात?
आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे.
अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की.
या आधी असे प्रसंग जेंव्हा आले होते तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नका.
हा सिनेमा जेंव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही. आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार. आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे.
त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये.
कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे.
छत्रपतींच्या पुतळ्याचे "Structure Audit" करण्याचे मनसेची मागणी.
मीरा भाईंदर शहरातील घोडबंदर किल्ल्याजवळ नव्याने उभारलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यापूर्वी "Structure Audit" करावे अशी मागणी मनसेच्या नितीन बोंबले पाटील यांनी केली आहे.
@mnsadhikrut
"चौक तिथे झेंडा" मनसेचा नवा उपक्रम.
मनसेचे सरचिणीस श्री गणेश सातपुते,श्री सचिन चिखले ह्यांच्या नेतृत्वाखाली श्री सत्यम पत्रे ह्यांच्या पुढाकाराने श्रीराम चौक,शिवरोड इथे "चौक तिथे झेंडा" चे नियोजन करण्यात आले आहे.
LIC कामगारांना वाऱ्यावर सोडू नका.
भारतीय जीवन बिमा निगम (LIC) येथे गेल्या १५ ते १६ वर्षापासून कार्यरत असलेल्या कामगारांना कायम सेवेत घ्यावे तसेच त्यांना केंद्र शासनाच्या कामगार कायद्याप्रमाणे सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी यासाठी मनसेच्या वतीने निवेदन, मनसे इशारा देण्यात आला.
उद्या सौ.शर्मिला राजसाहेब ठाकरे दिंडोशी विधानसभेत.
मनसेचे श्री भास्कर परब ह्यांच्या पुढाकाराने दिंडोशी विधानसभेत मंगळागौर चे नियोजन,श्रावण महिन्यात महिलांच्या सण - उत्सवांसाठी मनसेने असे उपक्रम हाती घेतलेत,हे खरंच कौतकास्पद आहे.@mnsadhikrut
माळशिरस मधील सर्व शाळांना मनसेच्या वतीने निवेदन.
बदलापूर येथे घडलेल्या प्रकरणांनंतर सर्वीकडे भीतीचे वातारण निर्माण झालेले आहे,असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी मनसेच्या वतीने दक्षता घेण्यासाठी शाळांना निवेदन देण्यात आले. @mnsadhikrut
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अंधेरी येथील कार्यालयात मन प्रसन्न करणारी सत्यनारायणाची महापूजा पार पडली.
या कार्यक्रमाला पक्षातील नेत्यांसह चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
@mnsadhikrut
नुकत्याच झालेल्या पॅरिस येथील ऑलिंपिक मध्ये कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवलेल्या अमन शेरावत यांनी सन्माननीय राजसाहेबांची त्यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळची क्षणचित्रं. @mnsadhikrut
या साखळी उपोषणाला पाठींबा दर्शवण्यासाठी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अभियंता आणि कत्रांटदार संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री गौरव वालावलकर ,कार्याध्यक्ष श्री अवधूत चव्हाण , उपाध्यक्ष श्री गणेश कदम आणी चिटणीस श्री प्रकाश शेलार उपास्थित होते.
मुंबई कॉन्टॅक्टर्स असोसिएशन' च्या साखळी उपोषणाला मनसेचा पाठींबा 👍
मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदारांची प्रलंबित ५०० कोटींची बिले मिळावी म्हणून 'मुंबई कॉन्टॅक्टर्स असोसिएशन' च्या वतीने आजपासून आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू केले आहे.
ग्रामीण भागात तरुणांचा वाढता कल मनसेकडे.🚂🚩
सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन,सिंदेवाही तालुक्यातील तरुणांनी राहुल बालमवर ह्यांच्या उपस्थितीत मनसेत पक्षप्रवेश केला. @mnsadhikrut
शिंदे गट आमदार साहेबांच्या स्वागताला..
मनसे मिसळ महोत्सव मध्ये सन्माननीय राजसाहेब ह्यांनी बोरीवली इथे उपस्थिती लावली असता,स्थानिक आमदार श्री प्रकाश सुर्वे ह्यांनी साहेबांचे स्वागत केले.
@miprakashsurve