@ECISVEEP@CEO_Maharashtra @ThaneCorp @CPThaneCity
During Thane Municipal Corporation Elections 2025–26, in Ward No. 33, near Ammar Garden, outside Shrini Villa, just ahead of Y Junction, large-scale garden/development work is being carried out
मा. मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामांबाबत ठाणे महानगर पालिकेला जे आदेश दिले आहेत, त्या आदेशांचे कुठल्याही पद्धतीने पालन करताना ठाणे महानगर पालिका दिसत नाही. काही निवडक भागांमध्ये लक्ष केंद्रीत करून कारव��या केल्या जात आहेत. मात्र, अनधिकृत बांधकामे ठाणे शहराच्या सर्वच भागात झालेली आहेत. असा एकही प्रभाग नाही, भाग नाही की जिथे अनधिकृत बांधकाम उभे राहिलेले नाही. असे असताना काही विशिष्ट जागेवर जाऊन कारवाई करायची अन् तेथीलच इमारती पाडत रहायच्या व अहवाल सादर करायचे, असे किळसवाणे राजकारण करताना ठाणे महानगर पालिका दिसत आहे. जर हे वेळीच थांबविले नाही तर मी स्वतः उच्च न्यायालयात जाऊन सर्व भागांमधील अनधिकृत बांधकामांची छायाचित्रे सादर करेन.
एकीकडे गोरगरीबांची घरे पाडली जात असताना येऊरमध्ये राजर���सपणे मोठमोठे बंगले बांधले जात आहेत. गरीबांना बेघर करायचे आणि येऊरमध्ये बंगल्यांना अभय द्यायचे, हे दुटप्पी राजकारण कशासाठी? जर अनधिकृत इमारती पाडायच्याच आहेत तर सबंध ठाणे शहराला एकच नियम लागू करा. काही विशिष्ट भागांनाच लक्ष्य करून कारवाई करायची आणि कारवाई केली असे मा. उच्च न्यायालयाला सांगायचे, ही मा. हायकोर्टाचीही दिशाभूलच आहे.
बदलापूर घटनेनंतर राज्य सरकार विरोधात प्रचंड रोष आहे.या प्रकरणी सरकारने दाखविलेली अनास्था आणि पोलीस प्रशासनाने केलेली दिरंगाई ही केवळ अक्षम्य आहे.या सरकार��्या निषेधार्थ आज गांधी उद्यान ठाणे येथे महाविकास आघाडीतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी माझ्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री.नाना पटोले
काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री.नसीम खान तसेच महाविकास आघाडीचे नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थीत होते.
काल महंत रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना अपमानित करणारे, त्यांचे चारित्र्य हनन करणारे विधान मुद्दामहून केले, असे माझे मत आहे. कारण, कोणत्याही महंताने कोणत्याही प्रेषिताबाबत असे उद्गार काढणे अशक्य आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेत तुम्ही कोणत्याही संतसाहित्य उघडून बघा; संतांच्या अभंगांचे पुस्तक उघडून बघा; संत कबीर, संत रविदास, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पुस्तके उघडून बघा, तुम्हाला कुठेही धर्मद्वेष दिसणार नाही. किंबहुना, या सर्वांची शिकवणच होती की,सर्व धर्मांनी एकत्र राहिले पाहिजे. असे असताना महंत रामगिरी हे ज्या पद्धतीने बोलले आहेत; त्याकडे पाहता , हे शब्द मुद्दामहून त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले, असेच होते. मी जे म्हणतोय त्याला अर्थ आहे. कारण, मागे स्वतः मुख्यमंत्री बसलेले असताना, हे महंत एवढे बोलण्याची हिमंत दाखवत असतील तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू शकते. ते जाऊ द्या ! पण, महाराष्ट्रातील धार्मिक तसेच सामाजिक स्वास्थ्य त्यानिमित्ताने हे सत्ताधारी बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. हा खेळ आता महाराष्ट्राला जाळून टाकेल; महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडवून टाकेल अन् हा खेळ महाराष्ट्राला परवडणार नाही.
सत्ता येते अन् जाते. पण, एकदा मने दुभंगली की ती जोडता - जोडता आयुष्य निघून जाते. या द्वेषाच्या राजकारणापासून आपण सर्वांनीच लांब रहायला हवे.
ठाण्यामध्ये सध्या बार असो, प��� असो, अनधिकृत बांधकाम असो ; यामध्ये ज्यांची राजकीय ओळख असेल तेच वाचतात. ज्यांच्यावर राजकीय वरदहस्त नाही ते मात्र मरतात. या व्हिडिओमध्ये जे बांधकाम पाडलं जात आहे; त्या बांधकामधारकाकडे मुंब्र्यातील एका बड्या राजकीय नेत्याने ५० लाखांची मागणी करून आई-बहिणीवरून शिविगाळ केली होती. हे सर्व त्या इसमाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले. खरंतर अनेकांना हा अनुभव आलेला आहे. पण, कुणी बोलण्याची हिमंत दा���वत नव्हते. या इसमाने बोलण्याची हिमंत दाखवली तर त्याचा परिणाम काय झाला, प्रशासनाने निवडून त्याचीच ��मारत पाडली. अनेक अनधिकृत बांधकामे सुरू असताना तिथे जाण्याची कोणाचीही हिमंत होत नाही. कारण, त्यांना राजकीय वरदहस्त प्राप्त आहे. दिव्यामध्ये तर ३०० हून अधिक अनधिकृत बांधकामे सुरू आहेत; तिथे कुणाचेही लक्ष नाही. तेथील अधिकारी मलिदा ओढण्यात आणि वाटण्यात मग्न आहेत.
मुंब्य्राचे अधिकारी कोणाकडून आदेश घेतात, हे माहित नाही. पण, फक्त पत्रकार परिषद घेऊन 'त्या' राजकीय नेत्याचा बुरखा फाडला म्हणून अ��िकाऱ्यांनी प्राधान्याने आपलं कर्तव्य बजावण्यासाठी या इमारतीवर चाल करून गेले.
ठाण्यात हे किती दिवस चालणार? बार पाडताना राजकीय हस्तक्षेप आला की कारवाई सोडून देतात. कुठलीही गोष्ट करताना; कारवाई करताना महापालिकेचे कर्मचारी पोहचले आणि वरून फोन आला की (आता वरून कोणाचा फोन येतो हे माहित नाही.) पालिकेची माणसे आल्या पावली परत फिरतात. असेच आम्रपाली नावाचे हाॅटेल आहे ते पाडण्यासाठी गेलेल्या प���लिका कर्मचाऱ्यांना दम देऊन परत पाठवण्यात आले अन् नंतर त्या मालकाकडून २५ लाख घेण्यात आले. आयुक्त महोदय, आपण हे सगळं वाचत असाल, असे मला वाटते.
@TMCaTweetAway
तुम्ही संसदेत स्वतःच्या मर्जीतले 'स्पीकर' बसवू शकता, तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांचाही 'माईक' बंद करू शकता. पण जनता संसदेच्या बाहेर आहे. आणि फक्त ईव्हीएम मशीनच्या बटनाने तुमच्या कानठळ्या बसवण्याची ताकद त्यांच्यात आहे, एवढं लक्षात ठेवा..!
खाली कर्ज, वर कर्ज, इकडे कर्ज, तिकडे कर्ज !
महाराष्ट्राच्या डोक्यावर महायुती नावाचं कर्ज ! लवकरच जनता हे कर्ज फेडून महाविकास आघाडी नावाचं परिवर्तन आणेल !
महाराष्ट्रातील राजकाणाचं गुन्हेगारीकरण होऊ नये,असं राज्याच्या गृहमंत्र्यांना वा���त असेल तर त्यांनी पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी,पोलिस स्टेशनला आणि पोलिस कमिशनरला कुणाकुणाचे फोन गेले..? याचा खुलासा करावा.
या प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या ससून रूग्णालयातील अजय तावरेच्या नार्को चाचणीला सरकारने मान्यता द्यावी आणि सत्य लोकांसमोर आणावं.
जीतेन्द्र ��व्हाड का सारा राजनैतिक व सामाजिक जीवन केवल और केवल दलितों, पिछड़ों, वंचितों व अल्पसंख्यकों के हक़ के लिए लड़ते हुए गुज़रा है।
वे हमेशा बाबा साहेब के सिद्धांत पर चलते आयें है और उनके बनाएगा संविधान की रक्षा हेतु आगे रहते है।
वे कभी बाबा साहेब का अपमान नहीं कर सकते।