महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष श्री. अजित वर्टी यांचे आज दुःखद निधन झाले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि या संकटातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो ही प्रार्थना.
॥भावपूर्ण श्रद्धांजली॥
जा.क्र.१४३/२०२१ ते २१२/२०२१ करीता दिनांक १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याकरीता वेबलिंक सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:-९ फेब्रुवारी, 2022.
जा. क्र. ०८/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या नागपूर आणि अमरावती केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती अनुक्रमे दिनांक १४ व १५ फेब्रवारी तसेच १६,१७ व १८ फेब्रुवारी, २०२२ रोजी घेण्यात येणार आहेत.
जा. क्र. ०८/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या औरंगाबाद, लातूर व कोल्हापूर केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखतींचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जा.क्र.०९/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९- राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बाहेर पडू (Opt out) इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी बाहेर पडण्याची (Opting out) सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जा. क्र. ०८/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या औरंगाबाद केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती अनुक्रमे दिनांक ८,९ व १० फेब्रुवारी, २०२२ रोजी घेण्यात येणार आहेत. सविस्तर कार्यक्रम स्वतंत्र पणे प्रसिद्ध करण्यात येईल.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, नेत्र रुग्णालय, गट-अ संवर्गाच्या 02 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र. 008/2020) प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://t.co/eVhnd2w4bB
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, ॲकवर्थ रुग्णालय, गट-अ संवर्गाच्या 02 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र. 007/2020) प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://t.co/074poNk72e
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विधि अधिकारी, गट-अ संवर्गाच्या 04 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.006/2022) प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://t.co/wezr6ppZ1i
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील उपसंचालक, नगर रचना, गट-अ संवर्गाच्या 03 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.002/2022) प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://t.co/LXG08jQDkD
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक नगर रचनाकार, गट-ब संवर्गाच्या 138 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.005/2022) प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://t.co/EnW1NLapC5
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील नगर रचनाकार, गट-अ संवर्गाच्या 18 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.004/2022) प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://t.co/K7EsmOdUcS
जा. क्र. 260/2021 ते 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 चे आयोजन मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 1056/2021 चा अंतिम निर्णय येईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.
आयोगामार्फत दिनांक २३ जानेवारी, २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ ची प्रथम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://t.co/t9tLvudJ1R
https://t.co/7qZasiE2pS
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक करीता मा.उच्च न्यायालय,मुंबई यांनी WP 571/2022 प्रकरणी दिलेल्या आदेशानुसार 86 उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्याच्या अनुषंगाने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
जा.क्र.249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021- सहायक कक्ष अधिकारी व राज्यकर निरीक्षक संवर्गाकरीता अर्ज केलेल्या परंतु वयाधिक ठरल्याने पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.