Official page of MSKVIB राज्य शासनाच्या उद्योग विभागांतर्गत असलेल्या खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत लघु उद्योगासाठी विविध योजना राबविण्यात येतात. #MSKVIB
आज नॅशनल केमिकल लॅबोरेटरी - सी एस आय आर पुणे, यांच्यावतीने अप्लाइड फूड रिसर्च हा विषय घेऊन महाबळेश्वर मधील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जांभूळ या मधा विषयी अथक प्रयत्न करून जे संशोधन केले आहे या संशोधन प्रेस कॉन्फरन्स द्वारे लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.
मंडळाचे सभापती श्री.रवींद्रजी साठे यांनी राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेतली. भेटी दरम्यान मान्यवरांना मंडळाचा 'मधुबन' मध व ग्रामोद्योग अंक भेट दिला. त्याप्रसंगी मा. नामदार श्री.संजयजी राठोड, मृद व जलसंधारण हे देखील उपस्थित होते.
मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) आदरणीय श्री. रवींद्र साठे साहेब यांनी त्यांच्या कालच्या कोल्हापूर दौऱ्या दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय श्री. पृथ्वीराज चव्हाण साहेब यांची त्यांचे कराड येथील निवासस्थानी भेट घेतली व खादी मंडळाच्या कार्याविषयी माहिती दिली.
मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) सन्माननीय श्री.रवींद्र साठे साहेब यांनी आज, त्यांच्या कोल्हापूर दौऱ्या दरम्यान स्व.यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ, प्रीती संगम, कराड येथे आदरांजली वाहिली.
श्रीमती नीता आणि प्रशांत बडेकर, मौजे-मुंढे, जिल्हा-कराड यांनी सुरू केलेल्या 'मधुबन' मध विक्री केंद्राचे उद्घाटन मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) आदरणीय श्री.रवींद्र साठे साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडले.
मध संचालनालय, महाबळेश्वर येथील मध प्रकिया विभागा करिता नव्याने खरेदी करणेत आलेल्या “फोर हेड एअर जेट क्लिनींग मशीन” चे उदघाटन मंडळाचे आदरणीय सभापती महोदय श्री. रवींद्र साठे साहेब (राज्य मंत्री दर्जा) व मंडळाचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई यांच्या शुभ हस्ते करणेत आले.
जागतिक मधमाशी दिनानिमित्त मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून विशेष सन्मान करण्यात आला.तसेच मंडळातील कर्मचारी यांनी केलेल्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
मंडळामार्फत जागतिक मधमाशी दिनानिमित्त राज्यस्तरीय मधुमित्र व मधुसखी पुरस्कार २०२६ प्रदान कार्यक्रम बुधवार दि. २० मे २०२६ छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला.
मधमाशी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! निसर्गाचे संतुलन राखणाऱ्या, परागीभवनाद्वारे शेतीला आणि अन्नसाखळीला आधार देणाऱ्या मधमाश्यांचे महत्त्व अमूल्य आहे.त्यांच्या परिश्रमामुळेच मधासह असंख्य पिकांचे उत्पादन मिळते.यानिमित्ताने मधमाश्यांचे संवर्धन, संरक्षण व पर्यावरण जपण्याचा संकल्प करूया
मधमाशी दिनाच्या आयोजनाबाबत मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे व मुख्य कार्यकारी अधिकारी मा .लक्ष्मण राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली .यावेळी दि .२० मे रोजी छ. संभाजीनगर येथे होणार्या मधमाशी दिनाच्या कार्यक्रमाची माहिती पत्रकारांना दिली.
मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) सन्माननीय श्री.रवींद्र साठे साहेब यांनी मुंबई महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त (भा.प्र.से.) श्रीमती अश्विनी भिडे मॅडम यांची सदिच्छा भेट घेतली.