नागपूरच्या तिखट मसाल्याला जपानची गोड ओळख…
एका जपानी तरुणाची गोष्ट आहे — ताकाशी ताकेशिमा.
इंटरनेटवर भारतीय पाककृती शोधताना त्याला नागपूरच्या साओजी खाद्यसंस्कृतीची ओळख झाली. लालसर, तिखट, घाम आणणाऱ्या या रस्याने त्याला इतका मोहून टाकला की तो थेट नागपूरला पोहोचला.
तिथे त्याने शंकर साओजी भोजनालय, ओमशक्ती साओजी, प्रचंड साओजी अशा ठिकाणी काम करत खऱ्या अर्थाने मसाल्याचा गाभा शिकला.
नागपूरच्या स्वयंपाकघरातून शिकलेले हे धडे ताकाशीने फुकुओका, जपानमध्ये नेले. तिथे त्याने "फिनिक्स साओजी भोजनालय" सुरू केले. त्याच्या मेनूमध्ये मटण रस्सा, खुर, सुंदरी, भेजा फ्राय आणि फुलका यांसारखे पदार्थ आहेत.
ताकाशीने केवळ खाद्यसंस्कृतीच नाही तर मराठी भाषा देखील शिकली. "नम���्कार", "धन्यवाद", "आभारी आहे" अशा शब्दांनी तो ग्राहकांशी संवाद साधतो. मराठी गाणी ऐकून, मराठी मित्रांशी बोलून त्याने भाषेचा गोडवा आत्मसात केला.
आज फुकुओकाच्या रस्त्यांवर मराठी शब्द आणि नागपुरी तिखटाचा सुगंध पसरला आहे. एका जपानी माणसाने मराठी संस्कृतीला मनापासून स्वीकारून त�� जगाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचवली. ही गोष्ट आपल्याला सांगते की संस्कृतीची सीमा नसते — ती मनापासून शिकली, जपली आणि वाटली की ती जगभर पोहोचते.
मुलांना त्यांच्या मनातल्या भावना नीट व्यक्त करता येत नाहीत... अशा वेळी मुलांसोबत मोठ्यांनीही वाचावं असं सुंदर चित्रपुस्तक What feelings do when no one is looking. By Tina Oziewicz and Aleksandra Zajac
पुस्तकाची लिंक खाली देतोय
#reelsinstagram#marathi#reccomendation#feelings
माठात थोडी मोगऱ्याची ताजी फुले टाकली आता कुठं वाळा मिळाला तर एक जुडी टाकून देतो .थंडगार वाळा मोगऱ्याच्या सुगंधाचे पाणी पिणार आता .कडक ऊन पडायला हवे झळा हव्यात मग रणरणत्या उन्हात थकून आल्यावर तांब्या भरून असे छान पाणी प्यावे
काय हवे रे अजून
आयुष्यात ❤️.
सोलापुर जिल्ह्यातले बार्शीलोना गावचे आमचे जुने मित्र बॅटमॅन यांच्या शेताजवळून भोगावती नदी जाते. त्या नदीतले स्वतः पकडलेले गुगळी जातीचे मासे आणि मटण असा जेवणाचा बेत त्यांनी आज आमच्यासाठी केला होता. पुढच्या वेळी मरळ खायला मिळेल ही अपेक्षा.
सोलापुरची लोकं ❣️.