अरेरे… देवेंद्र फडणवीसांना पाणी द्या रे कोणी तरी!
घोटाळा… घोटाळा… 😂 फडणवीसांची तोतरी वळलीय.
नॅशनल टीव्हीवर येऊन बोलताच येईना, एवढं नव्हतं आपटायचं तोंडावर!
२५ वर्ष सेनेसोबत सत्ता उपभोगली आणि आता टीका पण त्यांच्यावरच? 😂
असं कसं चालेल भाऊ! 🤷♂️
शेतकऱ्यांना “सारखं फुकट, सारखं माफ लागतं” म्हणणारे अजित पवार —
पण पोराच्या १८०४ कोटींचे डील. त्यावर १२६ कोटींची स्टँप ड्यूटी होते , हे डील ३०० कोटीचे दाखवून, त्यावरचे २१ कोटी देखील माफ !
ही माफी फुकट नव्हती का?
सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने न्याय मागण्यासाठी आलेल्या युवकास ठाण्यातील सिसिटीव्ही कॅमेरे बंद करून अमानुष मारहाण केली. यानंतर त्याला ठाण्यात बसवून ठेवले. यामुळे अवमानीत झालेल्या व आपणास पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने अगतिक अवस्थेत युवकाने व्हिडीओ तयार करून विष प्राशन केले. हा व्हिडीओ समाज माध्यमावर वेगाने व्हायरल होत असून पोलिसांच्या दबंगगिरी वरून समाज माध्यम मध्ये संतापाची लाट उसळली आहे.
https://t.co/lSQ4lvfOy9
#Maharashtra #viralvideo
हिंदी सक्ती मागे घेतली असं वाटणाऱ्या सर्वांसाठी!
कृपया हा जीआर नीट वाचा…
हिंदी ही तृतीय भाषा असेल…
ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल त्यासाठी किमान 20 इच्छुक विद्यार्थी हवेत… (हा काय नियम आहे?)
म्हणजे तिसऱ्या आणि त्यातही हिंदी भाषेची सक्ती असेल हे सरकारने ठामपणे सांगितलेले आहे… पहिल्या इयत्तेतल्या मेंदूला किती ताण देणार? आणि का? मातृभाषा मजबूत करण्यावर जोर का नाही?
एक देश, एक भाषा! असं करायचं ठरवलंच आहे तर…
पडद्यामागून येणाऱ्या या सक्तीचा कडाडून निषेध!
आता तुम्हीच ठरवा, नेमकं काय अभिजात होतंय?
#महाराष्ट्रात_मराठीच
.@PratapSarnaik तुमचे प्रताप थांबवा. मिरा-भायंदर मध्ये पाय ठेवल्यावर तुमच्या तोंडून हिंदी निघायला ते काय युपी-बिहार नाहिये! तर तुमचं तोंड शेण खायला लागतंय, आवर घाला.
तुमची लाडकी बहीण, मावशी जी काही असेल ते तुमच्या घरापर्यंत ठेवा. खोटा प्रचार करू नका.
We Marathi people shall stop entertaining the Hindi language. We must speak in Marathi, no matter who the next person.
मराठी माणसांनी मराठी भाषेवर ठाम राहील पाहिजे. परप्रांतीयांचे लाड बंद करा.
https://t.co/6ztDjon658
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही.
केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे.
प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्याघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते, त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही.
आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.
आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे, सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही. मराठी तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं, पण पुढे ती केलीच नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे. आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे. जेंव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं, तेंव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय, अशी शंका यावी अशीच पाऊलं सरकारकडून उचलली जात आहेत.
बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? आणि करून तर बघा, तिथली सरकारंच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही.
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी.
प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहीजे ! उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिली पासून शिकवाल का ? नाही ना ? मग ही जबरदस्ती इथेच का ? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे.
पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत.
माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना, भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती आहे की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा ! आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील.
आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो !
आपला नम्र
राज ठाकरे ।
स्वायत्त महाराष्ट्र का हवा तर ह्यासाठी हवा👇👇👇
मुंबईतील आयकर विभागातील भरतीमध्ये महाराष्ट्रातील फक्त ३ जण भरती झालेत, बाकीचे सर्व १९९७ जण परप्रांतीय..
#स्वायत्तमहाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजेच रयतेच्या जाणत्या राजाला स्मरून…
ही बातमी खालील सर्वांसाठी!
सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते…
आजवरची सर्व सरकारे…
सर्व जातींचे आणि धर्मांचे पुढारी!
लक्ष देऊन बघा, कान देऊन ऐका…
आजच्या दिवशी तरी लाजा वाटूद्या! जागे व्हा!
*एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची मनसेकडून दखल*
गेट वे आॅफ इंडीया येथे मेहबुब मदुनावर वाजवतात नौबत महाराजांना अनोखा मुजरा करणारे मुस्लिम मावळा
*मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेकडून मेहबुब मदुनावर यांना दर महिन्याला देणार मानधन* @mnsadhikrut
This CV helped many people getting a interview calls from Google, Amazon, Microsoft, Netflix, Apple and others.
I am sharing the exact ATS editable templates with you
Retweet & Reply " CV " to get it for free
[Must be following] - so that I can DM ✉️
[Only for First 5000 People]
#EVM हॅकिंगबाबत चर्चा आणि संशयांना आणखी बळ देण्यासाठी दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी Live प्रात्यक्षिक सादर केले.
त्यांनी ईव्हीएम हॅकिंगची प्रक्रिया स्पष्ट करताना दावा केला की, सीक्रेट कोडच्या मदतीने निवडणूक निकाल प्रभावित करता येऊ शकतो.