@pandeyrajesh654@mybmc@CMOMaharashtra@Aaple_Sarkar@MCGM_BMC@mybmcHealthDept We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/Ai7TBcYyNP
Your MARG registration number : 110958
नागरिकांच्या सन १८८१ पासूनच्या जन्म-मृत्यूच्या नोंदींचा दस्तावेज जपताना, बृहन्मुंबई महानगरपाल���केने आता डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी आणि प्रशासनात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी जन्म-मृत्यू नोंदींचे संपूर्ण डिजिटायझेशन महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमार्फत (CFC) वेगाने सुरू आहे.
१५३ वर्षांची अखंड परंपरा, मुंबईकरांच्या सेवेची आणि विकासाची!
बृहन्मुंबई महानगरपालिका स्��ापना दिन ✨
#MyBMCUpdates
#स्थापना_दिन
#BMC
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपाहारगृहाची महापौर श्रीमती रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी केली पाहणी
🔷बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील अभ्यागत आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी थेट निगडित असलेल्या उपाहारगृहात (कॅन्टीन) पुरवल्या ��ाणाऱ्या खाद्यपदार्थांचा दर्जा आणि एकंदर स्वच्छतेची खातरजमा करण्यासाठी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी आज (दिनांक ३ सप्टेंबर २०२६) संयुक्त भेट देऊन संपूर्ण पाहणी केली.
🔷स्वयंपाकघर, परिसर स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची बारकाईने तपासणी केल्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी उपाहारगृहातील सद्यस्थितीबाबत समाधान व्यक्त केले.
🔷या पाहणीदरम्यान महापौर श्रीमती तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती शिरवडकर यांनी उपाहारगृहात उपस्थित असलेले महानगरपालिका कर्मचारी तसेच विविध कामा���िमित्त आलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी जेवणाचा व अल्पोपहाराचा दर्जा, पदार्थांचे दर आणि एकूणच दैनंदिन स्वच्छता याविषयी नागरिकांकडून अभिप्राय जाणून घेण्यात आले.
🔷तसेच, महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्षांनी उपाहारगृह चालकाशी सविस्तर चर्चा करून संपूर्ण व्यवस्थेची आणि अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेची माहिती घेतली. स्वयंपाकघराची स्वच्छता, कर्मचाऱ्यांचा पोशाख (हेडगिअर, ग्��ोव्हज) आणि साठवणुकीची जागा याविषयी विचारणा करण्या�� आली. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करत अन्न सुरक्षा मानके आणि स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे सक्त निर्देश यावेळी उपाहारगृह चालकाला देण्यात आले.
🔷जुलै २०२६ मध्ये या उपाहारगृहाबाबत काही तक्रारी समोर आल्या होत्या. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छापा टाकून स्वच्छतेच्या कारणास्तव हे उपाहारगृह तात्पुरते बंद करण्याचे आदेश दिले होते. आवश्यक त्��ा सुधारणा केल्यानंतर आणि त्यात सातत्य राखण्याची हमी घेतल्यानंतर, ऑगस्ट २०२६ मध्ये हे उपाहारगृह पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले. त्यानंतर हे उपाहारगृह पुन्हा सेवेत आले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्षांनी ही पाहणी केली.
🔷नागरिकांचे आरोग्य आणि अन्न सुरक्षा याला प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून अन्न सुरक्षेचे नियम व मानके ही सर्व शासकीय तसेच ��ासगी उपाहारगृहांना समान रीतीने लागू आहेत. महानगरपालिका मुख्यालयातील उपाहारगृहाने स्वतः नियमांचे काटेकोर पालन करून इतर आ��्थापनांसमोर स्वच्छतेचा आदर्श ठेवावा, असा स्पष्ट संदेश या पाहणीतून महापौर श्रीमती रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी दिला आहे.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. युरिय आर. फेडकिव यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबईच्या मह��पौर श्रीमती रितू तावडे यांची महापौर दालनात तर महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांची आयुक्त दालनात आज सदिच्छा भेट घेतली.
Mr. Yuriy R. Fedkiw, Consul General of the United States in Mumbai, paid a courtesy visit to the Mayor of Mumbai Mrs. Ritu Tawde, and the Municipal Commissioner Mrs. Ashwini Bhide, at the BMC Headquarters, today
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
@USAndMumbai
व्हिएतनामचे महावाणिज्यदूत श्री. ले क्वांग बिएन यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली
🔷व्हिएतनामचे मुंबईतील ��हावाणिज्यदूत श्री. ले क्वांग बिएन तसेच उपमहावाणिज्यदूत श्रीमती व्हू थी तू यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची महापौर दालनात आज (दिनांक ३ सप्टेंबर २०२६) सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मुंबई महानगर व हो ची मिन्ह सिटी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या (MoU) अंमलबजावणी संदर्भात मसुदा आराखड्यावर चर्चा करण्यात आली.
🔷सदर चर्चेत शाश्वत नागरी विकास, पायाभूत सुविधा उभारणी, व��यापार व गुंतवणूक, पर्यटन तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण या विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सह��ार्य वृद्धिंगत करण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला.
🔷दोन्ही शहरांमधील परस्पर अनुभवांचा लाभ घेत नागरी व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यावरही भर देण्यात आला.
🔷मुंबई व हो ची मिन्ह शहर यांच्यातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी या सामंजस्य कराराच्या प्रभावी अंमलबजावणीस गती देण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. या उपक्रमांमुळे दोन्ही शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
@VNinINDIA
@Kamlakar_Shenoy@mybmc@BycullaPS@DcpZone3Mumbai We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/Ai7TBcYyNP
Your MARG registration number : 109844
@AAPKaImranMulla@mybmc@abuasimazmi@yusuf_abrahani We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/Ai7TBcYyNP
Your MARG registration number : 109581
@ansariwaheed13@MumbaiPolice@mybmc We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/Ai7TBcYyNP
Your MARG registration number : 109052
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून बृहन्मुंबई क्षेत्रातील स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम हाती घेण्यात आली आहे. (१/३)
बृहन्मुंबई (मुंबई शहर आणि उपनगरे) क्षेत्रातील दृश्यमान स्वच्छता वाढवणे, उघड्यावर कचरा टाकण्यास प्र��िबंध घालणे आणि कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांचे (GVP’s) कायमस्वरुपी निर्मूलन करण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत आहे. (२/३)
@Rubailshaikh We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/Ai7TBcYyNP
Your MARG registration number : 107768
@RafiyadamudiINC@mybmc@YaseerDamudi We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/Ai7TBcYyNP
Your MARG registration number : 107631
@riyazkhan370 We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/Ai7TBcYyNP
Your MARG registration number : 107690
कर्करोगाच्या असह्य वेदनांवर प्रेमाची आणि विश्वासाची फुंकर
मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी चिमुकल्यांसमवेत रक्षाबंधन साजरे करत दिला कृतिशील सामाजिक संदेश!
राखीच्या नाजूक धाग्यातून उमटली जिद्द आणि जगण्याची नवी आशा
रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊसमध्ये साजरा झाला अनोखा रक्षाबंधन सोहळा
🔷सण-उत्सव केवळ चार भिंतींतील औपचारिकतेत न ठेवता, दुर्धर आजाराशी झुंजणाऱ्या चिमुकल्यांच्या आनंदात मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर श्रीमती रितू तावडे प्रत्यक्ष सहभागी झाल्या. दुर्धर आजारांशी दोन हात करीत असलेल्या बालकांना 'केवळ शब्दांची सहानुभूती नको, तर प्रत्यक्ष सहवेदना आणि मदतीचा हात हवा' हा कृतिशील सामाजिक संदेश महापौरांनी दिला आहे.
🔷कर्करोग असल्याने, वैद्यकीय उपचार म्हणून सुई, स���ाईन आणि किमोथेरपीच्या असह्य वेदनांशी रोज दोन हात करणाऱ्या निष्पाप चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमटले तर हा हळवा प्रसंग अनुभवून उपस्थितांचे डोळे पाणावले. निमित्त होते रक्षाबंधनाचे आणि या अत्यंत भावुक क्षणांच्या दुवा ठरल्या मुंबईच्या प्रथम नागरिक, महापौर श्रीमती रितू तावडे!
🔷मुंबईतील माहीम येथील 'रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडिया' येथे गंभीर आजारांवर उपचार घेत असलेल्या कर्करोगग्रस्त मुलांसमवेत महापौरांनी काल (दिनांक २७ ऑगस्ट) अतिशय आपुलकीने आणि भावनिक वातावरणात रक्षाबंधन साजरे केले. वैद्यकीय उपचारांच्या कठीण प्रवासात मुलांच्या चेहऱ्यावरील निष्पाप हास्य पाहून गहिवरलेल्या महापौरांनी स्वतः मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांना मायेने जवळ घेतले, भेटवस्तू दिल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
🔷"उपचारांच्या तीव्र यातना सहन करणाऱ्या ��ा चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर राखीचा आनंद आणि डोळ्यांतील जगण्याची दुर्दम्य आशा पाहून मी निःशब्द झाले आहे. हा रेशमी धागा केवळ संरक्षणाचे वचन नाही, तर 'तुम्ही या लढाईत अजिबात एकटे नाही, संपूर्ण मुंबई तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे' या दृढ विश्वासाची साक्ष आहे," असे महापौर श्रीमती रितू तावडे यावेळी म्हणाल्या.
चिमुकल्या हातांनी विणलेले प्रेमाचे रेशमी बंध
🔷या कार्यक्रमाचे हृदयस्पर्शी व��शिष्ट्य म्हणजे रुग्णालयातील वेदना विसरून या कर्करोगग्रस्त लहानग्यांनी स्वतःच्या नाजूक हातांनी बनवलेल्या सुंदर राख्या! जेव्हा या मुलांनी महापौरांना आणि एकमेकांना या राख्या बांधल्या, तेव्हा उपस्थित पालकांच्या व डॉक्टरांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. हा सोहळा म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमासोबतच जिद्द, आपुलकी आणि एकजुटीची अभेद्य भावना जपणारा ठरला.
घरच्या मायेची ऊब: रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊसचे स��वाकार्य
🔷दूरवरच्या खेड्यापाड्यांतून आपल्या काळजाच्या तुकड्यावर उपचार करण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत येणाऱ्या कुटुंबांसाठी उपचारांचा, निवासाचा व खाण्यापिण्याचा खर्च पेलवणे अशक्यप्राय असते. अशा अत्यंत बिकट काळात रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडिया ही संस्था या कुटुंबांना केवळ मोफत निवास व भोजनाची व्यवस्था करत नाही, तर त्यांना हक्काची कौटुंबिक सुरक्षितता प्रदान कर���े. माहीम मधील या वास्तूतील १६ सुसज्ज खो��्या व स्वयंपाकघर पाहून महापौरांनी समाधान व्यक्त केले. "येथे आई स्वतःच्या हाताने बाळासाठी आवडीचे जेवण बनवू शकते, ही भावनाच त्या आजारी मुलाला घरात असल्याचा मोठा मानसिक दिलासा देते," असे महापौर श्रीमती रितू तावडे यांनी नमूद केले.
🔷प्रत्यक्ष मदतीची कृती करत महापौरांनी स्पष्ट केले की, मुंबई महानगरपालिका कर्करोगग्रस्त बालकांच्या पाठीशी सदैव कटिबद्ध आहे. या गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या ग���जू कुटुंबांसाठी 'महापौर वैद्यकीय मदत कक्ष' मार्फत तत्काळ आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संस्था संचालकांना दिले.
🔷महापौरांच्या या स्नेहमयी व आत्मीय भेटीमुळे उपचारांच्या खडतर प्रवासात लढणाऱ्या कुटुंबीयांना नवे मानसिक व भावनिक बळ लाभले असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. याप्रसंगी रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडियाचे संचालक श्री. निशेत पांडे, श्रीमती सुलक्षणा मुखर्जी यांच्यासह संस्थेचे सर्व समर्पित कर्मचारी व बालरुग्णांचे कुटुंबीय उपस्थित ��ोते.
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha@TawdeRitu
@misanjayghadi
महापौर बंगल्यातील कर्मचाऱ्यांसोबत महापौरांनी साजरी केली 'कृतज्ञतेची राखी'
महापौर श्रीमती रितू तावडे व ��मदार श्रीमती चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा
🔷"रक्षाबंधन सण हा केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून तो प्रेम, विश्वास, काळजी आणि ��ंरक्षणाचा अतूट धागा आहे. दिवस-रात्र सेवा देणारे महापौर बंगल्यातील सर्व कर्मचारी हे आमचे कुटुंबच आहेत," असे भावोद्गार मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी काढले.
🔷भायखळा स्थित महापौर निवासस्थानी आज (दिनांक २८ ऑगस्ट २०२६), महापौर बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांसमवेत रक्षाबंधन सण कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार श्रीमती चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
🔷महापौर श्रीमती रितू तावडे व आमदार चित्राताई वाघ यांनी कर्मचाऱ्यांना स्वतः राखी बांधून त्यांचे औक्षण केले तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सण-उत्सवाच्या काळातही कर्तव्यावर तत्पर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या छोटेखानी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi