🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर तसेच रुग्णालये, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये,आणि न्यायालयांपासून १०० मीटर परिसरात फटाके फोडण्यास मनाई आहे.
🔷कृपया, सर्व नागरिकांनी या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
#mybmcupdates
@CPCB_OFFICIAL@mpcb_official@EnvironmentMaha
🔷शीव (सायन) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल, विद्य���विहार रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव - मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, उप महापौर श्री. संजय घाडी यांच्यासह माननीय खासदार, माननीय आमदार व विविध पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आजपासून हे तीनही पूल वाहतुकीसाठी खुले झाले आहेत.
या उड्डाणपुलांची ही चित्रफीत…
#Mybmcupdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे.
🔷त्यामुळे, आता शो-ऑफ नाही...साऊंड ऑफ !
🔷फटाक्यांचा आवाज टाळूया, स��ाचा आनंद द्विगुणित करुया !
#mybmcupdates
@CPCB_OFFICIAL
@mpcb_official
@EnvironmentMaha
@shah_jagdeep We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/QX1qAQ1JHQ
Your MARG registration number : PW_202600151617
@KSM8729 We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/QX1qAQ1JHQ
Your MARG registration number : PW_202600151571
@NAASKHAA We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/QX1qAQ1JHQ
Your MARG registration number : PE_202600151524
@Alroy_Martin_7@mybmc We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/QX1qAQ1JHQ
Your MARG registration number : PW_202600151320
@Alroy_Martin_7 We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/QX1qAQ1JHQ
Your MARG registration number : PW_202600151601
मुक्या प्राण्यांना वेदनेत���न मुक्ती देऊन नवीन जीवन देऊया
घाटकोपर येथे मुक्या प्राण्यांसाठी दोन दिवसीय मोफत महा-शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महापौर श्रीमती रितू तावडे यांचे आवाहन
आतापर्यंत ११० आजारी व गरजू मुक्या प्राण्यांची नोंदणी; शस्त्रक्रियेसह चारा-पाणी व शुश्रूषेची संपूर्ण मोफत सोय
वातानुकूलित (एसी) डोममध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया व अतिदक्षता व्यवस्था; 'ऑक्टोबर हीट' पासून पशू-पक्ष्यांचे रक्षण
शस्त्रक्रिया करून गाई-म्हशींच्या पोटातून तब्बल ४० ते ५० किलो प्लास्टिक काढल्याचे वास्तव; प्लास्टिकमध्ये अन्न टाक�� नये आणि प्लास्टिकमुक्त मुंबईसाठी नागरिकांनी पुढे येण्याचे महापौरांकडून आवाहन
🔷आपल्या अवतीभोवती असणाऱ्या गायी, म्हशी, श्वान, इतर प्राणी, पक्षी आणि भटके मुके जीव अनेकदा दुर्धर आजार व अपघातांमुळे असह्य वेदना सहन करत असतात. ते मानवाप्रमाणे बोलून आपले दुःख सांगू शकत नसले तरी वेदना त्यांनाही तेवढ्याच तीव्रतेने होतात. या मुक्या जिवांच्या सेवेसाठी आणि त्यांना वेदनेतून मुक्ती मिळवून देण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने पुढे यावे, असे आवाहन मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी केले आहे.
🔷राष्ट्रसंत श्री नम्रमुनी महाराज यांच्या प्रेरणेतून, बृहन्मुंबई महानगरपालिका, महारा��्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि 'अरहम युवा सेवा ग्रुप' (अरहम अल्वेस केअर) यांच्या संयुक्त विद्यमाने, घाटकोपर (पूर्व) येथील आराध्य भक्ती पार्क (पोलीस हॉकी मैदान) येथे आयोजित मोफत पशु महा-शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन आज (दिनांक २१ ऑक्टोबर २०२६) सकाळी करण्यात आले. त्यावेळी महापौर श्रीमती रितू तावडे या बोलत होत्या.
🔷याप्रसंगी शिबिराची सं��ल्पना मांडणारे व प्रमुख प्रेरणास्थान असलेले श्री नम्रमुनी महाराज यांच्यासह मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे, स्थानिक आमदार श्री. पराग शाह, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शस्त्रक्रिया व क्ष-किरण विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. गजेंद्र खांडेकर, पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. अनिल वडे, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे तसेच पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. एल. डी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
🔷उद्घाटनानंतर महापौरांसह मान्यवरांनी संपूर्ण शिबिराची प्रत्यक्ष पाहणी करून उपचारांच्या व शस्त्रक्रियांच्या आधुनिक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
🔷या शिबिरासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्वतोपरी सहकार्य पुरवण्यात आले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे व उपा��ुक्त (विशेष) श्री. विनायक विसपुते यांच्या निर्देशाखाली महानगरपालिकेने व्यवस्था आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे.
'ऑक्टोबर हीट' पासून रक्षणासाठी वातानुकूलित डोम
🔷दिनांक २१ आणि २२ ऑक्टोबर २०२६ या दोन दिवसीय कालावधीत आयोजित या शिबिरात सध्याच्या 'ऑक्टोबर हीट' मुळे आजारी, अशक्त आणि शस्त्रक्रिया होणाऱ्या प्राण्यांना कोणताही त्रास होऊ नये, याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी संप��र्ण सुसज्ज वातानुकूलित (एसी) डोममध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष (मॉड्युलर ओटी), तपासणी कक्ष, शस्त्रक्रियेनंतरची अतिदक्षता शुश्रूषा, योग्य निवारा तसेच चारा-पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
जटिल शस्त्रक्रिया व उपचार मोफत; आतापर्यंत ११० प्राण्यांची नोंदणी
🔷या शिबिरात नामांकित व तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शिंगांचा कर्करोग (हॉर्न कॅन्सर), हर्निया, पोट��तून प्लास्टिक व इतर घटक बाहेर काढणे (रुमेनोटॉमी), डोळे व शेपटीचा कर्करोग, विविध प्रकारच्या गाठी (ट्यूमर), मोतिबिंदू तसेच हाडांच्या जटिल (ऑर्थोपेडिक) आणि इतर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत. शिबिराच्या पहिल्याच दिवशी सकाळपर्यंत ११० हून अधिक आजारी व गरजू पशूंची नोंदणी झाली आहे. त्यांच्यावर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
गाई-म्हशींच्या पोटातून काढले ४० ते ५० किलो प्लास्टिक; ते दृश्य मन पिळवटून टाकणारे – महापौर श्रीमती रितू तावडे यांची प्रतिक्रिया
(1/2)
आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांची महापौर श्रीमती रितू तावडे यांनी घेतली भेट; मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन
🔷राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक बाह्यस्रोत (Outsourced) आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विवि��� प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक ५ ऑक्टोबर २०२६) सायंकाळी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याची ग्वाही देत सर्व मागण्यांचा सकारात्मक पाठपुरावा करून त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
🔷याप्रसंगी नगरसेवक श्री. रोहिदास लोखंडे उपस्थित होते.
🔷दरम्यान, या बाह्यस्रोत कर्मचाऱयांच्या मागण्यांसंदर्भात महापौर श्रीमती रितू तावडे यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांना सविस्तर पत्र पाठवून योग्य ते निर्णय लवकरात लवकर घेण्याचे निर्देश दिले आहेत.
🔷या पत्रात नमूद केले आहे की, कोविड-१९ च्या संकटात या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुंबईकरांची सेवा केली आहे. ज्या अनुभवी बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत १० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना सेवेत नियमित / कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी एकवेळ धोरण (One-Time Policy) आखून, त्यांना रिक्त असणाऱ्या पदांवर सामावून घेण्याबाबतचा सर्वंकष प्रस्ताव तयार करावा. त्यास महानगरपालिका व राज्य शासनाच्या मंजुरीसाठी सादर करावे. त्याचप्रमाणे प्���शासकीय पातळीवर तयार असलेल्या प्रस्तावांना गती द्यावी. सुधारित किमान वेतन लागू करून थेट वेतनवाढीचा लाभ देणे, महिला कर्मचाऱ्यांना हक्काची भरपगारी प्रसूती रजा मंजूर करणे, दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून निर्णय घेणे, भविष्य निर्वाह निधी (PF) व ईएसआयसी (ESIC) चे कायदेशीर लाभ विहित वेळेत मिळणे, वेतनात विलंब करणाऱ्या कंत्राटदार संस्थेला (मे. डी. एस. एंटरप्रा��झेस) कडक समज देण्यात यावी आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्यांसाठी 'तक्रार निवारण समिती' कार्यान्वित करण्यात यावी, असे निर्देशही महापौरांकडून देण्यात आले आहेत.
🔷आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, कोविड काळात या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कामकाज केले आहे. त्यांच्या योगदानाची जाणीव महानगरपालिकेला आहे. या कर्मचा़रंयाच्य��� मागण्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष निकाली निघाव्यात, यासाठी मी स्वतः शासन आणि महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे, असे महापौरांनी नमूद केले.
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
✨बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'पी पश्चिम' विभागातील प्रभाग क्रमांक ३२ मधील मार्वे मार्गावर आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सह आयुक्त (परिमंडळ - ४) श्रीमती डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त श्री. कुंदन वळवी यांच्या मार्गदर्शनानुसार, (१/२)
🚶'पादचारी प्रथम (Pedestrian First)’ अभियानाला सुरुवात!
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका पी पश्चिम विभागामार्फत आज प्रभाग क्रमांक ५८ मधील एस.व्ही. मार्गावर '���ादचारी प्रथम (Pedestrian First)' अभियानांतर्गत विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. (१/३)
🔹सह आयुक्त (परिमंडळ–४) भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त श्री. कुंदन वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली, इतर ��िभागीय अधिकारी, कर्मचारी यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. (२/३)