महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मा. श्री. राजेश अग्रवाल यांचे चिरंजीव अंशुल आणि अविका यांच्या शुभविवाहानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!💐
त्यांच्या सहजीवनाची नवी सुरुवात प्रेम, विश्वास, आनंद आणि समृद्धीने बहरो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अंशुल आणि अविका यांना आनंदमय वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा!
जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर..!
मंत्रालयातील माझ्या दालनात राज्यभरातून भेटीस आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. प्राप्त निवेदनांची गांभीर्याने दखल घेत, संबंधित प्रश्नांच्या निराकरणासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
जनतेचा आवाज, जनतेचे प्रश्न आणि जनहितासाठी ठोस प्रयत्न, हेच माझे प्राधान्य!
#जनसंवाद #जनसेवा #जनहित #मंत्रालय #महाराष्ट्र
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध!
राज्यभरातून मंत्रालयातील माझ्या दालनात भेटीस आलेल्या अभ्यागतांशी संवाद साधला. त्यांनी सादर केलेली निवेदने स्वीकारून त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. जनतेच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत, त्यांच्या सोडवणुकीसाठी सकारात्मक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
जनतेची सेवा, जनतेच्या प्रश्नांना न्याय आणि त्यांच्या विश्वासाला सन्मान, हेच माझे प्राधान्य!
#जनसंवाद #जनसेवा #जनहित #मंत्रालय #महाराष्ट्र
विशेष सहाय्य विभागाच्या आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा!
मंत्रालयात विशेष सहाय्य विभागाच्या आढावा बैठकीत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेची अर्ज प्रक्रिया सुलभ करणे, केवायसी प्रक्रिया अधिक सोयीस्कर करणे तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली.
यासोबतच आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर योजनांसाठी आवश्यक निधीच्या पुरवणी मागण्यांचाही आढावा घेण्यात आला.
पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी शासन कटिबद्ध आहे.
#श्रावणबाळयोजना #विशेषसहाय्यविभाग #महाराष्ट्रशासन
सप्तशृंगी गडावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! भाविकांच्या आरोग्याशी तडजोड नाही!
नाशिकमधील सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. या कारवाईत असुरक्षित वातावरणात साठवून ठेवलेला तब्बल ₹५.६२ लाखांचा मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला.
भाविकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि अन्नपदार्थांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
#सप्तशृंगीगड #अन्नवऔषधप्रशासन #सुरक्षितअन्न #नवरात्रोत्सव #महाराष्ट्रशासन
आज डोणजे येथे स्व. नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर आणि इतर कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधत या दुःखद प्रसंगी त्यांना धीर दिला.
नाना पाटेकर हे केवळ एक उत्तुंग कलावंत नव्हते, तर स्पष्टवक्तेपणाच्या पलीकडे माणुसकी जपणारे, मनाने प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, तर सामाजिक कार्यातून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकीही जपली. विशेषतः शेतकरी बांधवांसाठी त्यांनी केलेले कार्य त्यांच्या संवेदनशील मनाची आणि सामाजिक जाणिवेची साक्ष देणारे आहे.
नानासाहेबांचे जाणे ही केवळ चित्रपटसृष्टीची हानी नसून, कलाक्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण करणारी घटना आहे. त्यांच्या अजरामर कलाकृती, सामाजिक योगदान आणि माणुसकीचा वारसा सदैव स्मरणात राहील.
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि पाटेकर कुटुंबीयांना या अपार दुःखातून सावरण्याचे बळ व धैर्य प्रदान करो, हीच प्रार्थना !
#नानापाटेकर #nanapatekar
📍 युथ फेस्टिव्हल मैदान, नाशिक
नाशिक येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६’ पुरस्कार वितरण सोहळा तसेच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२६-२७’ चा शुभारंभ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्याला उपस्थित राहून ग्रामीण विकासाच्या दिशेने राज्य शासनाने हाती घेतलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा मला विशेष आनंद झाला. अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सन्मान करताना ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधी, सरपंच आणि ग्रामस्थांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
आजच्या काळात पाणी व्यवस्थापन हा ग्रामीण महाराष्ट्रासमोरील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जलसंधारण, भूजल पुनर्भरण, उपलब्ध जलसाठ्याचे प्रभावी नियोजन आणि पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत सरपंच परिसंवादातून महत्त्वपूर्ण विचार मांडण्यात आले. लोकसहभागाच्या बळावर प्रत्येक गाव जलसमृद्ध, स्वच्छ, सक्षम आणि स्वयंपूर्ण व्हावे, हीच या अभियानामागील खरी भूमिका आहे.
या भव्य सोहळ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सर्व ग्रामपंचायती, सरपंच आणि ग्रामस्थांचेही मी विशेष कौतुक करतो.
यावेळी नाशिकचे पालकमंत्री श्री. गिरीष महाजन, महाराष्ट्र विधानपरिषद सभापती श्री. राम शिंदे, शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे, विविध विधानसभा मतदारसंघांचे आमदार, उपमहापौर श्री. विलास शिंदे, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओंकार पवार, जलसंपदा व ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समृद्ध गाव, सक्षम ग्रामपंचायत आणि जलसुरक्षित महाराष्ट्र हेच आपल्या विकासाचे ध्येय!
@Dev_Fadnavis@girishdmahajan@Jaykumar_Gore@dadajibhuse
#SamruddhaPanchayatRaj #RuralDevelopment #GramVikas #WaterConservation #NarhariZirwal
आपल्या काव्यप्रतिभेच्या आणि शब्दसुमनांच्या जोरावर समाजातील अंधश्रद्धा आणि जातीभेदाच्या बेड्यांवर प्रहार करणारे संतशिरोमणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांनी मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये अभंगरचना केली. त्यांच्या माणुसकीच्या शिकवणीने समाजावर थोर असे संस्कार केले.
संतशिरोमणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांस पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
#संत #तुकडोजी #महाराज
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ।।
नवरात्र उत्सव व घटस्थापना निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
#navratri#ghatsthapna
पेठ तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत उत्कृष्ट कार्याचा गौरव!
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत मोहाचा पाडा येथे आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायत, ICDS, आरोग्य, शिक्षण व उमेद आदी विभागांतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला..
जनसेवेसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
जनसेवा हीच ईश्वरसेवा!
#सेवा_संकल्प_अभियान #पेठ #जनसेवा #नरहरी_झिरवाळ
जलसंधारणातून समृद्धीकडे !
कुंभाळे परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल..
हँड्स ऑन फाउंडेशन, बेंगळुरू यांच्या सहकार्याने मोहाचापाडा येथील पाझर तलावाचे खोलीकरण व गाळ काढण्याचे जलसंधारणाचे काम पूर्ण करण्यात आले. या कामाचे जलपूजन तसेच कुंभाळे परिसरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन माझ्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी बोरिचीबारी येथील पाण्याची टाकी, सभागृह, कुंभाळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या चार वर्गखोल्या, पेव्हर ब्लॉक, स्मशानभूमी, अंगणवाडी आणि अंतर्गत रस्ते अशा विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या हँड्स ऑन फाउंडेशन, बेंगळुरू यांचे मनःपूर्वक आभार! तसेच या कार्यासाठी सहकार्य करणारे सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचेही मी मनापासून आभार मानतो.
#कुंभाळे #जलसंधारण #ग्रामविकास #विकासकामे #जनसेवा
भारतातील औद्योगिक क्रांतीचे शिल्पकार, पद्मविभूषण रतन टाटा जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, उद्योजकता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माणातील अतुलनीय योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
जागतिक टपाल दिवस
टपाल सेवा समाजातील संवादाचे महत्त्वाचे साधन आहे. कर्मचाऱ्यांचे परिश्रम व समर्पण समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्यामुळे आपले जग अधिक जवळ येते.
पोस्ट खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांना 'जागतिक टपाल दिन' निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !
#worldpostday
आकाशाच्या अथांग नभांगणात अतुलनीय शौर्य, धैर्य आणि पराक्रमाची गाथा लिहिणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या सर्व वीर जवानांना भारतीय हवाई दल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारताच्या आकाशसीमेचे अविरत रक्षण करत, मातृभूमीच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या वायुवीरांना सलाम! राष्ट्रसेवेप्रती असलेली आपली निष्ठा, समर्पण आणि अदम्य धैर्य हे प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी आहे.
! जय हिंद !
सिनेसृष्टीतील ‘नटसम्राट’ हरपला!
भारतीय रंगभूमीपासून आपल्या अभिनयप्रवासाची सुरुवात करून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अफाट अभिनयाची अमीट छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
क्रांतीवीर, परिंदा, अंकुश, नटसम्राट यांसारख्या अजरामर चित्रपटांमधील त्यांचा दमदार अभिनय आणि प्रभावी संवादफेक रसिकांच्या कायम स्मरणात राहील.
अभिनयासोबतच ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी आणि गरजूंसाठी केलेले त्यांचे कार्य त्यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारे आहे.
मराठी बाणा, परखड स्वभाव आणि अभिनयाची विलक्षण ताकद असलेला हा बुलंद तारा आज निखळला आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय कलाविश्वाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
परमेश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली!
ॐ शांती!
#नानापाटेकर #भावपूर्णश्रद्धांजली #नटसम्राट #मराठीसिनेमा
हिंगोली येथे फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत तीन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. ही घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे.
या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन केले. तसेच जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
या कठीण प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही मनापासून सहभागी आहोत.
ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.
तसेच जखमी असलेल्या सर्व व्यक्तींना लवकरात लवकर पूर्णपणे बरे होण्यासाठी बळ मिळो आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो, ही ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना!
स्व. विजयकुमार बसटवार यांच्या कुटुंबीयांची भेट
दि. ५ ऑक्टोबर रोजी हिंगोलीतील मारवाडी गल्ली परिसरातील फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीत होरपळून आपले प्राण गमावलेले स्व. विजयकुमार रामकृष्ण बसटवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे बसटवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
स्व. विजयकुमार बसटवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि बसटवार कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#हिंगोली #फटाकागोदामदुर्घटना
#हिंगोलीदुर्घटना #भावपूर्णश्रद्धांजली
हिंगोलीतील फटाका गोदाम दुर्घटनास्थळाची पाहणी
हिंगोलीतील मारवाडी गल्ली परिसरातील फटाका गोदामाला लागलेल्या आगीत झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. आज घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आवश्यक निर्देश दिले.
ह्या दुर्घटनेत आपले प्राण गमावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली!
तसेच ह्या दुर्घटनेत जखमी झालेले नागरिक लवकर बरे व्हावेत, हीच प्रार्थना!
#हिंगोली #फटाकागोदामदुर्घटना #भावपूर्णश्रद्धांजली
हिंगोलीच्या मारवाडी गल्ली परिसरातील फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीत दुर्दैवाने आपले प्राण गमावलेले स्व. अविनाश काशिनाथ बांगर, रा. वंजारवाडी, हिंगोली यांच्या कुटुंबीयांची आज भेट घेऊन सांत्वन केले.
या दुर्दैवी दुर्घटनेच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तब्बल सात ते आठ जणांचे प्राण वाचविण्याचे अतुलनीय धाडस स्व. अविनाश बांगर यांनी केले. इतरांचे प्राण वाचवताना स्वतःचे जीवन गमावणारा हा त्याग शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.
अविनाश यांच्या अकाली जाण्याने बांगर कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख अत्यंत वेदनादायी आहे. आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत, त्यांना धीर दिला. या कठीण प्रसंगी संपूर्ण समाज बांगर कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
स्व. अविनाश बांगर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि बांगर कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
ॐ शांती!
#भावपूर्णश्रद्धांजली #स्वअविनाशबांगर #हिंगोली #शौर्य #धैर्य
हिंगोलीतील फटाका गोदाम दुर्घटनास्थळाची पाहणी
हिंगोलीत घडलेली घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. दि. ५ ऑक्टोबर रोजी हिंगोलीच्या मारवाडी गल्ली परिसरातील फटाका गोदामाला लागलेल्या आगीत तीन जणांना प्राण गमवावे लागले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
आज घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन गोदामाची पाहणी केली. दुर्घटनेतील हानी व परिस्थितीची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. दुर्घटनेची कारणे आणि संबंधित बाबींची योग्य ती चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच या घटनेतील जखमींना आवश्यक उपचार तातडीने मिळावेत, यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#हिंगोली #फटाकागोदामदुर्घटना
#हिंगोलीदुर्घटना #भावपूर्णश्रद्धांजली