थोर शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
'कमवा आणि शिका'चा मंत्र देत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजाला शिक्षणाचा प्रकाश दिला. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा.श्री. सुनीलअण्णा टिंगरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी राजकीय आयुष्य लाभो, हीच सदिच्छा!
#Pune#वडगावशेरी#Vadgaonsheri#वाढदिवस@suniltingre
लोककल्याणकारी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अनेक प्रणाम!
समाजातील वंचित, शोषित घटकांना शिक्षण, सन्मान आणि हक्क मिळावा, यासाठी आयुष्य वेचणारे थोर समाजसुधारक म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज ! जातीभेदाच्या भिंती पाडून त्यांनी समतेचा मार्ग दाखवला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष मा.श्री. दीपकभाऊ मानकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, भरभराट, यश आणि दीर्घायुष्य लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
#Birthday#वाढदिवस#HappyBirthday#NCP#राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी#Pune
महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंनितीनिमित्त अनेक प्रणाम!
वंचित, शोषित आणि पीडितांना जगण्याचा नव्याने आत्मविश्वास देणारे थोर समाजसुधारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर युगप्रवर्तक ठरतात. सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय लिहिला.
अज्ञानाच्या गर्तेत अडकलेल्या माता-भगिनींच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश आणणारे, शेतकऱ्यांच्या व्यथा ठामपणे मांडून अन्यायग्रस्त व्यवस्थेला जळजळीत शब्दांनी चपराक देणारे, थोर समाजसुधारक आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त वंदन!
प्रेम, शांती, करुणा आणि अहिंसेचा अमर संदेश देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा जीवनमार्ग म्हणजे मानवतेचा सर्वोच्च आदर्श आहे. भगवान महावीर स्वामी यांना जन्मकल्याणक दिनानिमित्त त्रिवार वंदन!
आपण सर्वांनी सत्य, अहिंसा या मूल्यांची आठवण ठेवत जीवन समृद्ध करू.
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा!
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून रयतेच्या मनातील सुराज्य प्रत्यक्षात साकारले.
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदान दिनानिमित्त कोटी-कोटी प्रणाम!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यरुपी किल्ल्याचे एक भक्कम तटबंदी म्हणून रक्षण करण्याचे काम छ्त्रपती संभाजी महाराजांनी केले.
जगद़्गुरु संत तुकाराम महाराजांनी मधुर अभंगाद्वारे व प्रबोधनात्मक साहित्याद्वारे लोकांच्या मनात भक्तीची गोडी निर्माण केली. अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यांचा विरोध करून जगण्याचा नवीन मार्ग दाखवणारे संत तुकाराम महाराज यांना बीजनिमित्त कोटी-कोटी नमन !
#जगद्गुरुसंततुकाराममहाराजबीज
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे आणि नेतृत्वामुळे कृषी, उद्योग, सहकार, शिक्षण आणि साहित्य या सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय प्रगती साधली.
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदान दिनानिमित्त कोटी-कोटी प्रणाम!
आपल्या अतुलनीय रणकौशल्याचा जोरावर औरंगजेबासारख्या बादशहालासुद्धा जेरीस आणले. आपल्या बलिदानाने व त्यागाने संपूर्ण अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याची प्रेरणा देणारे आपले छत्रपती संभाजी महाराज.