कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये ज्युडो महिला ५७ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावणाऱ्या भारताच्या यामिनी मौर्य हिचे मनःपूर्वक अभिनंदन!
अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तिने भारताच्या पदकांमध्ये आणखी एक मानाची भर घातली. तिची ही उल्लेखनीय कामगिरी भारतीय क्रीडाविश्वासाठी अभिमानाची असून अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल. तिच्या आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#CommonwealthGames2026
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तेजस्विन शंकर यांनी पुरुषांच्या डेकॅथलॉन प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदकाची कमाई केली आहे.
या उल्लेखनीय आणि ऐतिहासिक यशाबद्दल तेजस्विन शंकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही ते अशाच सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीद्वारे भारताचा गौरव वाढवत राहतील, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.
#CommonwealthGames2026
कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये महिला बॉक्सिंगच्या ५४ किलो वजनी गटात प्रीती पवार आणि ५७ किलो वजनी गटात जास्मिन लांबोरिया यांनी सुवर्णपदक पटकावत भारताचा गौरव वाढवला आहे.
दोन्ही खेळाडूंची ही ऐतिहासिक कामगिरी देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल. दोन्ही सुवर्णकन्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#CommonwealthGames2026
📍 अलिबाग
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर
महसूल दिनाचे औचित्य साधून अलिबाग (जि.रायगड) येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या हस्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.श्री. सुनिल तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध झाल्या. या उपक्रमात सहभागी होत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना योजनांचे प्रमाणपत्र वितरित केले. तसेच, उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधला.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या राष्ट्रप्रेम, समाजप्रबोधन, समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा सदैव प्रेरणादायी राहील, असे उद्गार कोषाध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव गर्जे यांनी व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ नेते मा. श्री. नवाब मलिक, आमदार मा. श्रीमती सना मलिक, मुंबई कार्याध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव नलावडे, मा. श्री. सिद्धार्थ कांबळे, मा. श्री. संजय तटकरे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आज पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे प्रदान करण्यात आलेल्या ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ सोहळ्यास उपस्थित राहिले. याप्रसंगी देशाचे केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितभाई शाह, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रोहित टिळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यंदाचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले, तसेच साहित्यरत्न व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी-कोटी प्रणाम अर्पण केले.
हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून राष्ट्रभक्ती, साहस, दूरदृष्टी आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव करणारा ऐतिहासिक क्षण असल्याचे नमूद केले. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आणि सक्षम नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली असून आर्थिक विकास, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा अशा प्रत्येक क्षेत्रात देश नवी उंची गाठत असल्याचे सांगितले.
देशाच्या या गौरवशाली प्रवासाला अधिक बळकटी देण्याचे कार्य मा. श्री. अमितभाई शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. अजित डोवाल प्रभावीपणे करत असल्याचे नमूद केले. अंतर्गत सुरक्षा बळकट करणे, दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई, सीमांची सुरक्षा आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात त्यांच्या योगदानामुळे भारत अधिक सुरक्षित आणि सक्षम राष्ट्र म्हणून उभा राहिल्याचे अधोरेखित केले.
श्री. अजित डोवाल यांचे जीवन राष्ट्रसेवेचे प्रेरणादायी उदाहरण असून, लोकमान्य टिळकांनी दिलेल्या ‘स्वराज्य’ मंत्राच्या रक्षणाची जबाबदारी आज त्यांच्यासारखे समर्पित अधिकारी पार पाडत असल्याने हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेचाही सन्मान असल्याचे अधोरेखित केले. तसेच मा. श्री. अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक भक्कम झाली असून, भारताची नागरिक म्हणून याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. श्री. अजित डोवाल यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
---
आज पुणे स्थित तिलक स्मारक मंदिर में आयोजित ‘लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कार 2026’ समारोह में उपस्थित रही। इस अवसर पर देश के गृहमंत्री श्री अमितभाई शाह, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, लोकमान्य तिलक स्मारक ट्रस्ट के अध्यक्ष श्री रोहित तिलक सहित अनेक गणमान्य उपस्थित थे। इस वर्ष का प्रतिष्ठित ‘लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कार’ भारत के राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार श्री अजीत डोभाल को प्रदान किया गया।
अपने संबोधन में लोकमान्य बाल गंगाधर तिलक जी की पुण्यतिथि पर उन्हें विनम्र श्रद्धांजलि अर्पित की तथा साहित्यरत्न एवं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जी की जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन किया।
यह समारोह केवल एक पुरस्कार वितरण कार्यक्रम नहीं, बल्कि राष्ट्रभक्ति, साहस, दूरदर्शिता और कर्तव्यनिष्ठा का अभिनंदन करने वाला ऐतिहासिक अवसर है, ऐसा उल्लेख किया। प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी के दूरदर्शी और सक्षम नेतृत्व में भारत ने विश्व मंच पर अपनी विशिष्ट पहचान स्थापित की है तथा आर्थिक विकास, आधारभूत संरचना, प्रौद्योगिकी, रक्षा, विदेश नीति और राष्ट्रीय सुरक्षा जैसे प्रत्येक क्षेत्र में नई ऊँचाइयों को छू रहा है, ऐसा कहा।
देश की इस गौरवशाली यात्रा को और अधिक मजबूती प्रदान करने का कार्य गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह और राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार श्री अजीत डोभाल प्रभावी ढंग से कर रहे हैं। आंतरिक सुरक्षा को सुदृढ़ करना, आतंकवाद के विरुद्ध कठोर कार्रवाई, सीमाओं की सुरक्षा तथा राष्ट्रहित को सर्वोच्च प्राथमिकता देने में उनके योगदान ने भारत को अधिक सुरक्षित और सशक्त राष्ट्र के रूप में स्थापित करने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है, ऐसा अधोरेखित किया।
श्री अजीत डोभाल का जीवन राष्ट्रसेवा का प्रेरणादायी उदाहरण है। लोकमान्य तिलक जी के ‘स्वराज’ मंत्र की रक्षा आज श्री अजीत डोभाल जैसे समर्पित अधिकारी कर रहे हैं, इसलिए यह सम्मान केवल एक व्यक्ति का नहीं, बल्कि भारत की राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था का भी सम्मान है, ऐसा कहा। साथ ही, अमितभाई शाह के नेतृत्व में देश की आंतरिक सुरक्षा अधिक सुदृढ़ हुई है और भारत की नागरिक होने पर गर्व होने की भावना व्यक्त करते हुए श्री अजीत डोभाल को इस प्रतिष्ठित सम्मान के लिए हार्दिक शुभकामनाएँ दीं।
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात रौप्यपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रा आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या यशवीर सिंह यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
एकाच स्पर्धेत दोन भारतीय खेळाडूंनी पदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. भारतीय क्रीडाविश्वासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. दोन्ही खेळाडूंची ही उल्लेखनीय कामगिरी भावी पिढीतील खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरो. त्यांच्या आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#CommonwealthGames2026
आपल्या लेखणीतून समाजातील शोषित, वंचित आणि कष्टकरी घटकाला आवाज मिळवून देणारे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जयंतीउत्सव भिमशक्ती रिक्षा चालक संघातर्फे साजरा केला. चेंबूर येथील अण्णाभाऊ साठेंच्या पुष्पहार अर्पण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
📍लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान, सुमननगर, चेंबूर
#Chembur #Tribute #SanaMalikShaikh #MLA #AnushaktiNagar #AnnaBhauSathe
स्वातंत्र्यलढ्यातील आक्रमक विचारसरणीचे प्रणेते आणि "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे..." या मंत्राने कोट्यवधी भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारे भारतरत्न लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
#LokmanyaTilak
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी नेतृत्व, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून जनतेत अस्मितेची ज्योत प्रज्वलित केली. त्यांचे साहित्य, विचार आणि कार्य सदैव समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाची प्रेरणा देत राहतील.
#अण्णाभाऊ_साठे
#AnnabhauSathe
गेवराई इथं श्री. जयसिंह शिवाजीराव पंडित, डॉ. अजय पंडित आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ‘Sharada Multispeciality Hospital and Research Centre’चं उद्घाटन संपन्न झालं. या आधुनिक रुग्णालयाच्या उद्घाटनाबद्दल पंडित कुटुंबीय, शारदा हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ, सर्व सहकारी डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल व प्रशासकीय कर्मचारी, अॅम्ब्युलन्स चालक, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
मल्टिस्पेशालिटी, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयसीयू, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, डायग्नॉस्टिक, पॅथॉलॉजी सुविधा, २४ तास इमर्जन्सी सेवा यांसह अनुभवी आणि सेवाभावी डॉक्टर २४ तास उपलब्ध असणं ही काळाची गरज असून, हे हॉस्पिटल त्या सर्व निकषांची पूर्तता करेल, असा विश्वास व्यक्त केला.
बीड जिल्ह्यातील गेवराई आणि आसपासच्या ग्रामीण भागात अत्याधुनिक खाजगी आरोग्य सेवा मर्यादित प्रमाणात उपलब्ध होत्या. त्यामुळं उपचारांसाठी रुग्णांना छत्रपती संभाजीनगर किंवा पुणे इथं जावं लागत होतं. आता गेवराई इथं सुसज्ज, दर्जेदार आणि अनेक स्पेशालिस्ट डॉक्टरांचा समावेश असलेलं हे हॉस्पिटल सुरू झाल्यामुळं परिसरातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ, अतिरिक्त खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
वैद्यकीय क्षेत्र हे रुग्णसेवेचं आणि ईश्वरसेवेचं कार्य असून, मानवसेवेचं व्रत जपण्याचं आवाहन करण्यात आलं. तसंच तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून उपचारांची सुविधा उपलब्ध झाल्यानं परिसरातील आरोग्य सेवांमध्ये गुणवत्तापूर्ण भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला. निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता, संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताणतणावमुक्त जीवनशैली आणि काम-विश्रांतीचं संतुलन राखण्याचं आवाहन केलं. आजार टाळण्यासाठी प्रत्येकानं स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि डॉक्टरांनी उपचारांसोबत जनजागृतीचं कार्य करून निरोगी समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असं यावेळी अधोरेखित केलं.
हॉस्पिटलमध्ये प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान होणार नाही याची दक्षता घेण्याचे तसंच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं. यासोबतच गरजू रुग्णांना माफक शुल्कात उपचार मिळावेत, पैशाअभावी कोणताही रुग्ण उपचाराविना परत जाऊ नये आणि रुग्णाचा जीव वाचवणं हेच सर्वोच्च प्राधान्य असावं, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आपला देश आता मेडिकल टुरिझम म्हणून विकसित होत आहे. जगातले रुग्ण उपचारांसाठी आपल्या देशात येतात. इथले डॉक्टर हुशार आहेत आणि युरोपियन, अमेरिकी देशांच्या तुलनेत इथला वैद्यकीय खर्चही कमी आहे. परंतु या सुविधा प्रामुख्यानं शहरी भागात आहेत. त्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर आल्या पाहिजेत, असं यावेळी नमूद केलं.
📍गेवराई, बीड
कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये ज्युडो महिला ४८ किलो गटात सुवर्णपदक पटकावून इतिहास रचणाऱ्या अस्मिता डे हिचे मनःपूर्वक अभिनंदन!
तिच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर साकारलेली ही ऐतिहासिक कामगिरी असंख्य युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल. भविष्यातही तिची अशीच सुवर्णमय कामगिरी कायम राहो आणि देशाचे नाव अधिकाधिक उज्ज्वल होवो, हीच सदिच्छा!
#CommonwealthGames2026
साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अग्रणी भूमिका बजावत या चळवळीला नवी ऊर्जा देणारे, शोषित-वंचितांच्या हक्काचा बुलंद आवाज ठरलेले आणि आपल्या ओजस्वी लेखणीतून समता, स्वाभिमान व सामाजिक न्यायाचा विचार जनमानसात रुजवणारे साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आणि विचार महाराष्ट्रासाठी सदैव प्रेरणादायी राहतील.