स्वातंत्र्यलढ्यातील आक्रमक विचारसरणीचे प्रणेते आणि "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे..." या मंत्राने कोट्यवधी भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारे भारतरत्न लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
#LokmanyaTilak
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी नेतृत्व, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून जनतेत अस्मितेची ज्योत प्रज्वलित केली. त्यांचे साहित्य, विचार आणि कार्य सदैव समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाची प्रेरणा देत राहतील.
#अण्णाभाऊ_साठे
#AnnabhauSathe
गेवराई इथं श्री. जयसिंह शिवाजीराव पंडित, डॉ. अजय पंडित आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ‘Sharada Multispeciality Hospital and Research Centre’चं उद्घाटन संपन्न झालं. या आधुनिक रुग्णालयाच्या उद्घाटनाबद्दल पंडित कुटुंबीय, शारदा हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ, सर्व सहकारी डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल व प्रशासकीय कर्मचारी, अॅम्ब्युलन्स चालक, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
मल्टिस्पेशालिटी, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयसीयू, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, डायग्नॉस्टिक, पॅथॉलॉजी सुविधा, २४ तास इमर्जन्सी सेवा यांसह अनुभवी आणि सेवाभावी डॉक्टर २४ तास उपलब्ध असणं ही काळाची गरज असून, हे हॉस्पिटल त्या सर्व निकषांची पूर्तता करेल, असा विश्वास व्यक्त केला.
बीड जिल्ह्यातील गेवराई आणि आसपासच्या ग्रामीण भागात अत्याधुनिक खाजगी आरोग्य सेवा मर्यादित प्रमाणात उपलब्ध होत्या. त्यामुळं उपचारांसाठी रुग्णांना छत्रपती संभाजीनगर किंवा पुणे इथं जावं लागत होतं. आता गेवराई इथं सुसज्ज, दर्जेदार आणि अनेक स्पेशालिस्ट डॉक्टरांचा समावेश असलेलं हे हॉस्पिटल सुरू झाल्यामुळं परिसरातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ, अतिरिक्त खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
वैद्यकीय क्षेत्र हे रुग्णसेवेचं आणि ईश्वरसेवेचं कार्य असून, मानवसेवेचं व्रत जपण्याचं आवाहन करण्यात आलं. तसंच तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून उपचारांची सुविधा उपलब्ध झाल्यानं परिसरातील आरोग्य सेवांमध्ये गुणवत्तापूर्ण भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला. निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता, संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताणतणावमुक्त जीवनशैली आणि काम-विश्रांतीचं संतुलन राखण्याचं आवाहन केलं. आजार टाळण्यासाठी प्रत्येकानं स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि डॉक्टरांनी उपचारांसोबत जनजागृतीचं कार्य करून निरोगी समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असं यावेळी अधोरेखित केलं.
हॉस्पिटलमध्ये प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान होणार नाही याची दक्षता घेण्याचे तसंच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं. यासोबतच गरजू रुग्णांना माफक शुल्कात उपचार मिळावेत, पैशाअभावी कोणताही रुग्ण उपचाराविना परत जाऊ नये आणि रुग्णाचा जीव वाचवणं हेच सर्वोच्च प्राधान्य असावं, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आपला देश आता मेडिकल टुरिझम म्हणून विकसित होत आहे. जगातले रुग्ण उपचारांसाठी आपल्या देशात येतात. इथले डॉक्टर हुशार आहेत आणि युरोपियन, अमेरिकी देशांच्या तुलनेत इथला वैद्यकीय खर्चही कमी आहे. परंतु या सुविधा प्रामुख्यानं शहरी भागात आहेत. त्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर आल्या पाहिजेत, असं यावेळी नमूद केलं.
📍गेवराई, बीड
कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये ज्युडो महिला ४८ किलो गटात सुवर्णपदक पटकावून इतिहास रचणाऱ्या अस्मिता डे हिचे मनःपूर्वक अभिनंदन!
तिच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर साकारलेली ही ऐतिहासिक कामगिरी असंख्य युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल. भविष्यातही तिची अशीच सुवर्णमय कामगिरी कायम राहो आणि देशाचे नाव अधिकाधिक उज्ज्वल होवो, हीच सदिच्छा!
#CommonwealthGames2026
साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अग्रणी भूमिका बजावत या चळवळीला नवी ऊर्जा देणारे, शोषित-वंचितांच्या हक्काचा बुलंद आवाज ठरलेले आणि आपल्या ओजस्वी लेखणीतून समता, स्वाभिमान व सामाजिक न्यायाचा विचार जनमानसात रुजवणारे साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आणि विचार महाराष्ट्रासाठी सदैव प्रेरणादायी राहतील.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे राष्ट्रजागृतीचे खरे शिल्पकार होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वैचारिक अधिष्ठान देत, स्वराज्याची प्रेरणा प्रत्येकाच्या मनात जागवली. आपल्या या थोर युगपुरुषाला पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
लोकमान्यांचे विचार हे आजही आपल्याला स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि लोकशक्तीवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देतात.
#लोकमान्य_बाळ_गंगाधर_टिळक
#LokmanyaBalGangadharTilak
गेवराई तालुक्यातील टाकळगाव (हिंगणी) येथे सिंदफणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे आधुनिक बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले.
गेल्या ३५ वर्षांपासून या परिसरातील शेतकरी आणि नागरिक या बंधाऱ्याच्या अडचणी सहन करत होते. १५ ऑक्टोबरनंतर नदीचा प्रवाह कमी होणे आणि मनुष्यबळाने निडल्स हाताळताना होणाऱ्या गळतीमुळे पाणी साचणे कठीण झाले होते. हीच अडचण ओळखून स्थानिक आमदार श्री. विजयसिंह पंडित यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादांकडे या बंधाऱ्याच्या दुरुस्ती आणि बॅरेजमध्ये रूपांतरासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
स्व. अजितदादांच्या दूरदृष्टीतून या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला २६ ऑगस्ट २०२५ रोजी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. त्यानंतर जलसंपदा विभागाने ६ ऑक्टोबर २०२५ रोजी ₹१९.६६ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली. आज आपण दादांनी लावलेल्या या रोपट्याचा विस्तार करण्यासाठी इथे एकत्र आलो आहोत, अशी भावना व्यक्त केली.
या प्रकल्पामुळे ०.७२ द.ल.घन मीटर शाश्वत पाणीसाठा निर्माण होऊन ११६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. टाकळगाव, हिंगणी आणि हिरापूर या गावांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून, भूजल पातळी वाढण्यास, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना बळ मिळण्यास आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन होण्यास मदत होणार आहे.
संबंधित विभाग आणि कंत्राटदारांना जून २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक शेतापर्यंत पाणी आणि प्रत्येक घरापर्यंत समृद्धी पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
उर्वरित ७ बॅरेजची कामे पूर्ण करण्यासाठीही आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असून, यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठका आयोजित करण्यात येतील, असेही सांगण्यात आले. हे बॅरेज केवळ एक विकासकाम नसून, या परिसराच्या जलसमृद्धी आणि शाश्वत विकासाचे नवे पर्व ठरणार आहे.
📍 टाकळगाव , बीड
बीडच्या विकासाला नवी गती... ₹६२३ कोटींच्या जिल्हा नियोजन आराखड्यास मंजुरी!
आज पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२६-२७ या वर्षासाठी ₹६२३ कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
बैठकीत स्व. अजितदादांनी पाहिलेल्या विकसित बीडच्या स्वप्नपूर्तीसाठी निधी, नियोजन आणि प्रशासनाच्या पातळीवर कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच विकासाच्या या प्रवासात सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
विकासकामांमध्ये पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि दर्जेदार नियोजनावर भर देत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कोणतेही काम ₹१५ लाखांपेक्षा कमी नसावे, तसेच कामांचे तुकडे करून स्वतंत्र प्रस्ताव सादर करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
जिल्हा नियोजनांतर्गत जिल्हा परिषद व इतर यंत्रणांना उपलब्ध करून दिलेल्या निधीचा योग्य विनियोग करून लोकांच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करावे, असेही निर्देश देण्यात आले. विकासकामांमध्ये पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्या आणि प्रशासनाच्या गरजांचा समन्वय साधत विकासकामांना प्राधान्य देण्यावरही भर देण्यात आला.
बैठकीतील प्रमुख निर्णय :
▪️ पशुसंवर्धन अंतर्गत कृत्रिम रेतन केंद्र इमारत बांधकामासाठी ₹५.२७ कोटी मंजूर.
▪️ साकूड येथील पशुपैदास प्रक्षेत्र पाणीपुरवठा योजनेसाठी ₹२.९९ कोटी मंजूर.
▪️ १८ पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी ₹४.८९ कोटी मंजूर.
▪️ जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन, जिल्हा परिषदेस विशेष निधी.
▪️ २०२५-२६ मध्ये वन विभागामार्फत ४७५.४ हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड पूर्ण; येत्या काळात आणखी २६३.३० हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट.
▪️ हरित बीड वृक्षलागवड अभियानांतर्गत यंदा ६५ लाख ४९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट.
▪️ ग्रामपंचायत जनसुविधांसाठी ₹३७.५३ कोटी विशेष अनुदान; ९१ ठिकाणी स्मशानभूमी शेड व ग्रामपंचायत इमारतींची कामे.
▪️ ऊर्जा विकास अंतर्गत ६१ कार्यालयांमध्ये अपारंपरिक ऊर्जा साधन विकासासाठी ₹१२ कोटी मंजूर.
▪️ बीड जिल्हा ग्रंथालय इमारत बांधकामासाठी ₹२ कोटी मंजूर; एकूण प्रकल्प खर्च ₹४.९५ कोटी.
▪️ कंकालेश्वर मंदिर विकासासाठी ₹११.२१ कोटींची तरतूद.
यावेळी स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा लोगो व शुभंकराचे अनावरण करण्यात आले. तसेच स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसह विविध विकासविषयक मुद्द्यांवर लोकप्रतिनिधींनी सूचना व मागण्या मांडल्या. अतिवृष्टीग्रस्तांना मदत, ग्रामीण विकास, रस्ते, पाणीपुरवठा, शेतकरी, आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि मूलभूत सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. उपस्थित सर्व विषयांवर मुख्यमंत्री तसेच संबंधित विभागांच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही देण्यात आली.
स्व. अजितदादांनी पाहिलेल्या विकसित, सक्षम आणि समृद्ध बीडच्या स्वप्नपूर्तीसाठी विकासाचा संकल्प अधिक वेगाने पुढे नेण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
📍 बीड
लोकनेते, माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त समाजातील विविध घटकांची सेवा करून दादांना श्रद्धांजली दिली. विद्यार्थ्यांसाठी शाळेत संगणक वाटप, महिलांना मोफत इलेक्ट्रिक स्टोव्ह वाटप, रुग्णांना फळे, बालगृहांना भेट देऊन शैक्षणिक साहित्य आणि भेटवस्तू, मोफत चष्मे वाटप आणि दादांचे आवडते काम वृक्षारोपण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
#AjitDadaPawar #Baramati #Jayanti
#SanaMalikShaikh #MLA
कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये ज्युडो पुरुष ६० किलो गटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या हर्ष सिंह यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
भारतासाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकत त्यांनी देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे भारताला ज्युडोमध्ये दुहेरी सुवर्णयश मिळाले. त्यांची ही कामगिरी अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरो. आगामी स्पर्धांसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#CommonwealthGames2026
राष्ट्रप्रेम, स्वराज्य आणि लोकशक्तीवर अढळ विश्वास ठेवत जनतेत स्वाभिमानाची चेतना जागवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन!
त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रत्येक भारतीयाला राष्ट्रसेवेची प्रेरणा देत राहतील!
महाराष्ट्राच्या अस्मितेच्या लढ्याला बळ देतानाच समाजात स्वाभिमान आणि परिवर्तनाची चेतना जागवणारे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी शिलेदार, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून शोषित-वंचितांच्या वेदनांना शब्द दिले. म्हणुनच समता, सामाजिक न्याय आणि माणुसकीचा त्यांचा विचार आजही प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
#लोकशाहीरअण्णाभाऊसाठे
#AnnabhauSathe
स्वराज्याची जाज्वल्य भावना, राष्ट्रप्रेमाचा अखंड जागर आणि समाजप्रबोधनाची लेखणी यांचा अद्वितीय संगम म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आज पुण्यतिथीदिनी त्यांना विनम्र अभिवादन!
त्यांचे जीवनकार्य प्रत्येक पिढीला राष्ट्रहित, स्वाभिमान आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील.
#लोकमान्य_बाळ_गंगाधर_टिळक
#LokmanyaBalGangadharTilak
भारतीय स्वातंत्र्यलढ्याला लोकचळवळीचं स्वरूप देत स्वराज्याची ज्योत जनमानसात चेतवणारे, राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमानाचा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील. त्यांना पुण्यतिथीनिमित्त शतशः नमन!
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते कष्टकऱ्यांच्या हक्कांपर्यंत, आपल्या धारदार साहित्याने क्रांतीची मशाल पेटवणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कादंबऱ्या, लोकनाट्ये आणि पोवाडे आजही समाजमनाला जागृत करण्याचे काम करत आहेत. समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजाची निर्मिती करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#AnnaBhauSathe #AnnaBhauSatheJayanti