ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. क���ा दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे. नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल ? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे.
असो,कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा.
नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली.
अमितचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे... टोलवर जी मुजोरी दाखवली गेली त्यातून हे घडलं पण भाजपने ९ वर्षांपूर्वी आश्वासन दिलं होतं कि 'टोलमुक्त महाराष्ट्र करू' त्याचं काय झालं ? अजूनही टोलधाड का सुरू आहे ? सम���द्धी महामार्गावर अजूनही पुरेशा सुविधा का नाहीत? समृद्धी महामार्गावर भरभक्कम टोलवसुली सुरु आहे मग त्या अपुऱ्या सुविधांमुळे अपघातात जे लोक मृत्युमुखी पडत आहेत त्याची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार आहे का?
अमितसाहेब ठाकरेंच्या गाडीला फास्ट टॅग असून सुद्धा त्यांची मुद्दाम गाडी अडवल्या जाते. बॅरिगेट मध्ये बिघाड झाल्याचं कारण दिल्या जातं, त्यावर त्यांच्या सोबत अरेरावी केल्या जाते हा सर्व प्रकार पाहता त्यांच्या सोबत घातपात करण्याचा प्रयत्न होता का ? याची चौकशी झाली पाहीजे @mnsadhikrut
@VishalS01997602@MeGajananKale@OfficeOfNG If ETC Infrastructure at Toll Plaza UNABLE to read FASTag having sufficient balance is permitted to go without payment (free) of user fee, as per MoRTH notification no. G.S.R. 427(E) dated 7th May 2018
पहीले पूर्ण माहिती घेत जा मग बोलत जा.
पुण्यात वाढत्या कोयता हल्ला प्रकरणी अवजार विक्री बंदी करावी. सर्रासपणे कोयता सारखे अवजार बाजारात मिळतात. यावर कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. @PuneCityPolice@CPPuneCity@MahaPolice
हिंदू समुदायाच्या सर्व घटकांमध्ये अधिक संघटन, एकजूट वाढवून शक्तिशाली आणि एकजिनसी समाज निर्माण करणे, हिंदू समाजात शिक्षणाचा प्रचार करणे, हिंदूंमधील कुठलाही घटक असू दे त्यात भेदभाव न होता त्याची स्थिती सुधारून त्याचं आयुष्य सुखावह करणे आणि जेंव्हा गरज निर्माण होईल तेंव्हा हिंदू हिताचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे १९३७ नंतर सावकारांच्या आयुष्याचं ब्रीद झालं. सक्रिय हिंदू संघटक; पण त्याचवेळेस क्रियाशील धर्मसुधारक व समाजसुधारक; प्रेरणादायी महाकवी आणि विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता यांबाबत प्रखर विचार मांडणारे विचारवंत म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. आज त्यांची जयंती. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.