@Garjana206 महामंडळाची वाट राजकारण्यांनी लावली. उत्तम खोब्रागडे यांनी एस्टी तोट्यातून फायद्यात आणायचा प्रयत्न केल्यावर त्यांची बदली केली गेली. माझ्या घरातली आज ३ री पिढी ST मध्ये आहे
#भीमाशंकर अभयारण्यातील टॉरंट वीज प्रकल्पासंदर्भात अनेक जण विकासाचा मुद्दा पुढे करत आहेत, जणू पृथ्वीवर प्राण्यांचा अधिकारच नाही.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ३३% वनक्षेत्र राखणे आवश्यक आहे, दुर्दैवाने आज महाराष्ट्रात केवळ २०% वनक्षेत्र शिल्लक आहे, ते देखील नाही राखायचं का ?
सह्याद्रीच्या छातीत खंजीर खुपसून विकासाचा झेंडा फडकवायचा असेल, तर त्या विकासाची किंमत निसर्गाने का मोजायची?
भीमाशंकरच्या कुशीतला हिरवागार परिसर हा सह्याद्रीचा श्वास आहे, जैवविविधतेचं माहेरघर आहे आणि पुढच्या पिढ्यांकडून आपण घेतलेलं कर्ज आहे.
आज शेकडो एकर वनजमिनीवर प्रकल्पांची सावली पडतेय. कागदावर जंगल फक्त हेक्टर आणि एकर असतं; पण प्रत्यक्षात प्रत्येक झाडामागे कित्येक पावसाळे, असंख्य जीव आणि एक अख्खी परिसंस्था उभी असते.
वीज हवी, उद्योग हवेत, विकासही हवा…
पण विकासाच्या दिव्यांसाठी सह्याद्रीची हिरवी चिता पेटवावी लागणार असेल, तर त्या उजेडाचा अभिमान कसला?
डोंगर पोखरून, जंगलं ओरबाडून आणि निसर्गाचा श्वास गहाण ठेवून उभा राहणारा विकास म्हणजे प्रगती नव्हे.... ती भविष्याच्या ताटात वाढलेली आजच्या स्वार्थाची किंमत आहे.
निसर्गाच्या न्यायालयात फाईल बंद होत नाही...
तिथे प्रत्येक घावाचा हिशेब एक दिवस पूर, दुष्काळ, दरड आणि तापलेल्या पृथ्वीच्या भाषेत परत केला जातो!
#भीमाशंकर #सह्याद्री
सिंहगडावर आलेल्या आठ वर्षाच्या मुलीने बर्मुडा पॅन्ट घातली आहे म्हणून समस्त हिंदू बांधव आर्मी यांनी तिच्या वडिलांना मारहाण केली!
आज यांना मारहाण केली,उद्या आपल्या घरापर्यंत येतील...धर्माला अशा लोकांपासून धोका आहे! पण राजकारण करायचे आहे त्यामुळे ही गुंडगिरी सुरूच राहणार... आलिया भोगासी
"त्याला त्याचा धर्म आडवा आला नाही की त्यांच्या धर्माने त्याला आडविण्याचा विचार केला नाही. एवढ सहज सोप आणि आनंददायी असतं सगळं. मग आपण कोणत्या भिकारचोटांच्या नादी लागून एक मेकांच्या जीवावर उठतो. माऊली सगळ्यांनी एवढं जरी पाळलं तरी देशाचा नंदनवन होईल."
#HumanityFirst#Peace#Unity