'श्री शिव महापुराण कथा' सोहळ्यास भेट देऊन शुभाशीर्वाद घेतले!
धाराशिव जिल्ह्यातील मौजे दुधनाळ येथील श्री महादेव मंदिराच्या वर्धापन दिन व अधिक मासानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध कथावाचक प.पू. श्री. प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या रसाळ वाणीतून आयोजित भव्य 'श्री शिव महापुराण कथा सोहळ्या'ला भेट दिली. अत्यंत भक्तीमय आणि चैतन्यदायी वात���वरणात सुरु असलेल्या या सोहळ्यात सहभाग घेऊन शंभू महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच भगवान शिवशंकरांच्या अद्भुत लीलेचे श्रवण केले. दरम्यान या भक्तिपूर्ण सोहळ्याच्या आयोजनासाठी आयोजक श्री. राजेंद्र आनंदराव पाटील यांचे विशेष अभिनंदन केले.
या प्रसंगी उमरग्याचे आमदार प्रवीणजी स्वामी, उमरग्याचे नगराध्यक्ष किरणजी गायकवाड, जि.प. सदस्य आप्परावजी पाटील, जि.प. सदस्य युवराजजी बिराजदार, युवा कार्यकर्ते मयुरजी गबुरे, जि.प. चे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती बजरंगदादा जाधव, लातूरचे नगरसेवक गिरीषजी पाटील, नगरसेवक गणेशजी गवारे, निलंग्याचे नगरसेवक ईश्र्वरजी पाटील, निलंग्याचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेबजी शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष शेषरावजी ममाळे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तम्माजी ��ाडीबोणे, माजी बांधकाम सभापती शरदजी पेठकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हर हर महादेव!
#shivpurankatha #dudhnal #mahapuran #maharashtra
जगातील पहिल्या संसदेचे म्हणजेच 'अनुभव मंटपा'चे जनक, समतावादी विचारांचे प्रणेते आणि 'कायकवे कैलास' हा मंत्र देणारे मानवतावादी संत महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#बसवेश्वर#jayanti#basveshwarmaharaj
Memorable fan moment...❤️
विमानात अनपेक्षितपणे जेव्हा आपला आवडता सुपरस्टार शेजारी बसलेला दिसतो, तेव्हा तो क्षण खरोखरच 'मेमोरेबल' असतो! आज हैदराबाद- मुंबई प्रवासात अशीच एक सुखद भेट झाली ती म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका अल्���ू अर्जुन याच्याशी.
लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सौ. उषाताई संभाजी पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी श्री. दयानंदजी दामोदर सुरवसे यांचे उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल करण्यात आले. यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
@sambhajipatil77 युवकांचे प्रेरणास्थाम, राजकीय रणनीतीकार श्री अरविंद भैय्या पाटील निलंगेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आई जगदंबेच्या कृपेने आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप–महायुतीचा झेंडा फडकवणाऱ्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी आपले योगदान निश्चितच मोलाचे ठरेल. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
#जिल्हा_परिषद#LaturZP#ZP#ZPElection#maharashtra
पाठीवर पडलेली कौतुकाची थाप...एक नवी ऊर्जा देऊन गेली!
आज लातूरमध्ये राज्याच��� लाडके नेते आणि मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत 'विजय संकल्प सभा' अतिशय दिमाखात आणि यशस्वीपणे पार पडली. लातूर शहराच्या इतिहासातील आजपर्यंतच्या सर्वात भव्य सभांपैकी एक ठरली. त्यामुळे सर्वांसाठीच हा क्षण अविस्मरणीय होता.
सभेचा उत्साह प्रचंड होताच, पण माझ्यासाठी आजचा दिवस एका वेगळ्या कारणासाठी अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमानंतर मा. देवेंद्रजींना ��िरोप देण्यासाठी त्यांच्या सोबत गेलो असता, माझ्या पाठीवर विश्वासाने आणि मायेने 'कौतुकाची थाप' देत, 'खूप छान आणि सभा खूप उत्तम पार पडली' अशा शब्दात कामाची दखल घेतली. मागील काही दिवसांपासून या सभेसाठी केलेली धावपळ आणि अतोनात कष्ट एका क्षणात सार्थकी लागल्यासारखे वाटले. देवेंद्रजींच्या शब्दांनी थकवा कुठल्या कुठे पळून गेला.
विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी देखी�� त्यांनी शुभेच्छा दिल्या. एका सामान्य कार्यकर्त्यासाठी नेत्याकडून मिळालेली ही शाबासकी आणि आशीर्वाद म्हणजे लाखमोलाची दौलत आहे.
प्रभाग क्र. १७ | जाहीर सभा
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्र. १७ मधील उमेदवार
श्री. अनंतजी नवनाथ गायकवाड,
सौ. संगीताताई सतीश मिरचे,
सौ. शोभाताई महादेव पाटील
यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी निवडणूक प्रचाराची दिशा, पक्षाची भूमिका व प्रभागातील विकासकामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
यावेळी आमदार अभिमन्यूजी पवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बस्वराजजी पाटील, गिरीशजी पाटील, स्वातीताई जाधव, अपर्णाताई कोरे आदींसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.