त्यामुळे यावर्षी बारावीची मुले गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.ही सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्याच्या शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad जी, आपणास विनंती आहे की कृपया संबंधित घटकांशी चर्चा करुन याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा. @CMOMaharashtra
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी बारावीच्या परीक्षांबाबत मुले, पालक व शिक्षकांमध्ये अद्यापही संभ्रमावस्था आहे. मुलांना वर्षभर शाळेत जाता आले नाही.याशिवाय सर्वच मुलांना ऑनलाईन शिक्षण घेता आले याबाबतही काही ठोस सांगता येत नाही.