The visuals which are circulating on various social media regarding the Manipur barbaric incident are heart wrenching and a shame on the government.
I had written a letter to the Prime Minister and the Home Minister with an appeal to interfere and find a solution on an urgent basis. Unfortunately things stand as they are and that is such a tragedy.
The perpetrators of this heinous act should be hanged till death.
If the central government doesn’t take a firm stand, then I appeal to our President to interfere.
The happenings in Manipur since 3 months has damaged not only the fabric of Manipur but the entire country.
If after a few years, something very damaging and detrimental takes place, then the government will be responsible.
Though the Prime Minister has condemned this incident, it’s not enough.
Words are not enough!!
Action is the need of the day!
Otherwise one cannot guarantee the Northeast to remain a part of our country.
#मणिपुर
#Manipur @PMOIndia@HMOIndia
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
राज ठाकरे
आमच्या सामाजिक भोंगा आंदोलनाचा विरोध करणाऱ्या पीएफआय संघटनेवर आलेल्या बंदीच आम्ही स्वागत करतो.. अशा सर्व नालायक प्रवृत्तिना मूळासगट संपवण हे एकसंघ राष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल..
हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं.
फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?
…. आणि भारत स्वतंत्र झाला !
ह्या वाक्यात ‘आणि’च्या आधीचा १५० - २०० वर्षांचा भारतीय स्वातंत्र्य लढा आणि भारताचा गौरवशाली इतिहास असा दोन तीन वाक्यांमध्ये मावणारा नाही. आज भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली. तमाम देशवासियांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शुभेच्छा !
राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे;
आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.
सत्ता येत- जात असते.
कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.
उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!
@CMOMaharashtra
...पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही. सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. (२/२) #VirarFire
आज विरार मधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, परवा नाशिक मधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडुप मधील घटना असोत. ह्या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य... (१/२)