"भगतसिंगांसाठी गांधीजींनी काहीच केलं नाही. मनात आणलं असतं तर ते भगतसिंगांची फाशी वाचवु शकले असते, परंतु जाणुनबुजुन त्यांनी तसं केलं नाही. " अशी एक चर्चा सध्या मुद्दामहून होत आहे . पण त्याबाबत ची वस्तुस्थिती वेगळीच आहे .
गांधी वर टीका करण्यासाठी भगत सिंग च्या खांद्यावर बंदूक ठेवणारे लोक कोणत्या विचाराचे आहेत ,हे सांगायची गरज नाही . भगत सिंग,सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी ची शिक्षा ,७ ऑक्टोबर १९३० ला सुनावण्यात आली या शिक्षेच्या विरुद्ध केलेले special petition हे त्यावेळी privy council समोर करावे लागत होते . ते petition ११ फेब्रुवारी रोजी फेटाळले. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू १९२९ च्या कॉंग्रेस चे अध्यक्ष होते . संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा गांधी -आयर्विन कराराचा मसुदा त्यांचाच होता, या कराराच्या वेळी ही भगत सिंह ला माफी मिळावी म्हणून एक प्रमुख मुद्दा होता , नेहरूंच्या पुढाकाराने मदन मोहन मालवीय यांनी १४ फेब्रुवारी १९३१ ला दया याचिका दाखल केली ती २० मार्चला फेटाळली गेली . गांधी आणि लॉर्ड आयर्विन यांची चर्चा १७ फेब्रुवारी पासून सुरू होऊन ५ मार्च १९३१ ला पुर्ण झाली आणि तो ऐतिहासिक करार झाला आणि त्यावेळी देखील भगत सिंह च्या माफीवर चर्चा झाली. या वेळी करारादरम्यान गांधीजींनी ९० हजार भारतीय कैद्यांना मुक्त करण्यास सहमती मिळवली. हा प्रसंग अजय देवगण याच्या ' दि लेजंड ऑफ भगत सिंग ' या चित्रपटात खूप चपखलपणे दर्शविला आहे ,जो वास्तवाशी जवळीक असणारा टिपला आहे . त्यावेळी करार महत्वाचा होता म्हणून करार झाल्यानंतर पुन्हा २१ मार्च ला गांधीजीनी लॉर्ड आयर्विन ची भेट घेवून भगत सिंह ला माफी देण्याची विनंती केली , याच अनुषंगाने २२ मार्च ला देखील गांधी यांनी लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली आणि या भेटीत प्रथमच लॉर्ड आयर्विन यांनी भगत सिंग च्या माफी बाबत नक्की प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.
गांधीजींनी २३ मार्च रोजी गांधी यांनी लॉर्ड आयर्विन यांना पुन्हा पत्र लिहिले आणि त्या पत्रात येशूची दयाबुद्दी आणि त्याचबरोबर त्यांच्या ख्रिस्ती धर्मातील दया भावनांना साद घातली ,हे पत्र ज्या दिवशी पाठवले त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता तिघांना फाशी दिले. गांधीजींनी अथक प्रयत्न करून देखील कांही उपयोग झाला नाही . भगत आणि त्याच्या सहकार्यांना फाशी दिली गेल्याची बातमी समजताच प्रचंड जनक्षोभ उसळला, १९३१ मध्ये कराची मध्ये होणाऱ्या कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार पटेल होते ,त्यांना आणि गांधीजींना लोकांनी काळे झेंडे दाखवले .
इंग्रजांनी एवढी कठोर भूमिका घेण्याची हि काही कारणे होती . भगत विरोधात प्रचंड नाराजी civil services officers मध्ये होती . पंजाब प्रांताच्या गवर्नर ने भगत सिंग ला माफी दिल्यास राजीनामा देण्याची धमकी दिली होती ,कारण भगत ला फाशी Saunders च्या हत्येच्या खटल्यात झाली होती ,त्यामुळे युरोपियन ICS केडर फाशीचे समर्थक होते. ICS केडर च्या नाराजीचा परिणाम असा होता की ,संपूर्ण वसाहती देशातील ICS केडर च्या अधिकाऱ्यांची एकी निर्माण झाली होती , ब्रिटीश त्यांच्या राज कारभाराच्या दृष्टीने भारतातील भगत सिंह साठी आफ्रिका ,म्यानमार ,अफगाणिस्तान ,अरब देश आदी वसाहतीतील अधिकाऱ्यांना नाराज करू इच्छित नव्हते. याचा दुसरा परिणाम देखील असा होता की ,ब्रिटीश युवक वसाहतीतील नौकरीसाठी पुन्हा तयार होणार नाहीत , ICS केडर च्या एकजुटीचा उइद्देश हा देखील होता !
या सर्व कारणास्तव भगत सिंह ला माफी मिळणे कठीण गोष्ट होती आणि एकदा दया याचिका फेटाळली कि निर्णय पूर्णतः पंजाब गवर्नर च्या हातात होता. या बाबत विस्तृत माहिती असफ अली, अरुणा असफ अली, आणि जे. एन . सन्याल यांनी लिहिली आहे . वी.एन . दत्त यांनी गांधीनी भगत सिंग आणि त्याच्या साथीदारांना वाचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. भगत सिंह यांना वाचविण्याचा गांधीजींनी प्रयत्न केल्याचा उल्लेख नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात सुद्धा केला आहे, खुद्द पटेल आणि नेहरूंनी सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न केले .
पण महत्वाची गोष्ट अशी कि , भगत सिंग ,सुखदेव आणि राजगुरू यांना वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला तो गांधी -नेहरू -पटेल यांनीच केला , आज भगत सिंह यांची बाजू घेवून गांधी वर आरोप करणाऱ्या कोणत्याही संघटनेने तसा प्रयत्न केला नाही. स्वातंत्र्य वीर सावरकर त्यावेळी रत्नागिरी इथे वास्तव्यास होते ,त्यांनी एखादे पत्रक काढून किंवा लेख लिहून भगत सिंह, सुखदेव ,राजगुरू यांना माफी द्यावी असे आव्हान केले नाही. त्यावेळी केशव बळीराम हेडगेवार हे सरसंघचालक होते, मात्र त्यांनी पत्रक काढून महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या आंदोलनापासून अलिप्त राहावे असे आव्हान केले, ही बाब संघ विचारांचे लेखक चं. प. भिशीकर यांनी नमूद केली आहे .
तमाम महाराष्ट्रायिन लोकांना अचंबित करणारे जनमत महायुतीला मिळाले आहे, हा निकाल सर्वांना अचंबित करणारा आहे. कारण विजयाचा जल्लोष भाजपच्या कार्यकर्त्यांत फारसा दिसला नाही. त्यांनाही हे सगळं अनपेक्षित असावं. या निवडणुकीत जे ५-१० हजारांच्या फरकाने येणार होते ते ३०-४० हजारांच्या फरकाने आले आहेत. लोकांनी इतकं भरभरून प्रेम दिलं आहे तर तो जल्लोष का दिसत नाही हा साधा प्रश्न आहे. लोकांचा कौल आहे म्हणावं तर लोकांत कौल दिल्याची भावना नाही, की त्याचा विजयी जल्लोष नाही. पण हा जनमताचा कौल आपण स्वीकारला पाहिजे.
महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकीय इतिहासात असा एकतर्फी निकाल कधी लागला नाही. महायुतीचे नेते, कार्यकर्ते, त्यांच्यासाठी झटणाऱ्या इतर संघटना आणि त्यांचे मतदार यांचे अभिनंदन. जनमताचा हा कौल मोठ्या मनाने मान्य, महाराष्ट्र राज्य हे विरोधीपक्ष मुक्त झाले. पुढील पाच वर्ष विरोधाला कोणी शिल्लक ही राहिले नाही, हीच काय ती चिंतेची बाब. पण जनतेने आपल्यावर राक्षशीप्रेम दाखवले आता त्यांच्या अपेक्षांवर आपण पूर्ण उतराल अशी अपेक्षा, जाहीरनाम्यातील इतर गोष्टी नाही पण २ कोटी महिलांना २१०० रुपये पुढील पाच वर्ष मिळतील हे तरी आम्ही पक्के समजतो.
विरोधी पक्ष हरला नसून महाराष्ट्राचे मूळपण हरले, इथले महापुरुष, विचार, संस्कृती हरली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर संघाच्या विचारांनी मात केली. राजकीय व्यभिचाराला राजमान्यता महाराष्ट्र देईल अस कधी वाटल नव्हत. पण आता सत्तेत असल्यावर काहीही करा अन् निवडणूक तोंडावर पैशांच्या योजना काढून पुन्हा निवडून या ही रीत पडली. महाराष्ट्रा सारख्या राज्यात ही स्थिती व्हायला नको होती. पण असा पायंडा पडल्याने आता हे काही लवकर बदलणार नाही.
मला तसे दोन लोक फार आवडतात, एक एमएस धोनी अन दुसरे शरद पवार, दोघांच्या ही कारकिर्दीचा शेवट गोड झाला नाही याचे शल्य कायम मनाला बोचत राहील. मला व्यक्तिश शरद पवार या व्यक्तीबद्दल वाईट वाटले. इतकं काही करूनही शेवटच्या राजकीय लढाईत महाराष्ट्राने त्यांना साथ दिली नाही. यशवंतरावांचा शेवटचा काळ जसा गेला तोच काळ शरद पवारांच्या वाटेला येऊ नये अशी प्रार्थना.
तसा मी जातीय चष्म्यातून कधी लिहीत नाही पण मराठा समाजाचे महाराष्ट्रातील राजकारणावरचे प्रभुत्व संपले. आता जे काही मराठा नेते आहेत ते हुजरे मराठे. महाराष्ट्र मराठेत्तर राजकारण्यांच्या हातात गेला. साहित्य, कला, संस्कृती, माध्यमे इथे मराठ्यांना फारसी आत्मियता नव्हती इथे अल्पसंख्याक हे होते. मराठ्यांचा प्रभाव असणारे राजकारण हेही त्यांच्या हातून निसटले असून राजकारणातील त्यांची सत्ता ढासळली. आता कोणी देशपातळीवरच्या राजकारणात प्रभाव टाकेल असा नेता या समाजाचा नाही. २०१४ पासून असंख्य पराभव पाहिले पण कालचा शरद पवारांचा पराभव प्रचंड जिव्हारी लागला, त्यामुळे कुठतरी थांबावे म्हणतो.
काही चुकल असेल तर क्षमस्व!🙏
मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन,पण तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही..
- शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत
का करायचं यांना मतदान..?
#मतदान_करताना_हे_विसरू_नका
तुम्हाला मी जर म्हटलं की एक आमदार असा आहे कि जो आपला फॉर्म भरताना मुहूर्त वैगेरे पाहत नाही. ज्योतिषी म्हटले की ही वेळ सगळ्यात अशुभ काळ आहे त्या वेळी काही करू नका. तर त्याने आपला उमेदवारी अर्ज त्या काळातच भरला अन् असे करत तो गेली सहा टर्म झालं तो निवडून येतोय. त्या आमदाराचे नाव आहे सतीश जारकीहोळी. कर्नाटकात मंत्री राहिले अन आता ही आहेत, सतीश जारकीहोळी हे अंधश्रद्धा न मानणारे एक विज्ञाननिष्ठ व्यक्ती आहेत. समाजातून अंधश्रद्धा घालवण्यासाठी त्यांनी स्वतःची एक चळवळ चालवलेली आहे. अधून मधून ते स्वतः स्मशानात बसून जेवण करतात, मुक्काम करतात. अंधश्रद्धा कमी करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या कृतीतून करतात. विज्ञानवादी विचारांची वाढ होण्यासाठी सातत्याने कृतीकार्यक्रम देतात. त्या उलट आपल्याकडे आपण काय पाहतोय ? मुहूर्तावर फॉर्म भरायची घाई.
मुहूर्त बघून फॉर्म भरणे हा अतिशय भंपकपणा आहे. आजवर अनेक जागी दोन्ही उमेदवारांनी मुहूर्तावर फॉर्म भरले, मुहूर्त फॅक्टर विजय मिळवून देत असेल तर दोन्ही उमेदवार जिंकायला हवेत. आपले अनेक उमेदवार-आमदार हे अतिशय भित्र्या स्वभावाचे आहेत. तुम्ही एखाद्या बाबाला घेऊन कोण्या उमेदवार कडे गेलात अन 5-10 लाखात हि हि पूजा आहे, ती केल्यावर चांगलं यश मिळेल असं म्हट्लात तरी ते पैसे द्यायला तयार होतात. असे अनेक भोंदू असंख्य उमेदवारांना या काळात सपशेल गंडवतात.
आपल्या आताच्या पिढीत कोणी विज्ञानवादी नेतृत्व मला दिसत नाही, त्याचे कारण वाचन नाही. या निवडणुकीत उभा राहणाऱ्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही विचारलं कि शेवटचं पुस्तक कधी वाचलं ? पूर्ण वाचलं ? तर एकाचेही नीट उत्तर येणार नाही. आपल्याकडे नेत्यांना विचारांच्या फक्त जाहीर भाषणात गप्पा झोडता येतात. प्रत्यक्ष आयुष्यात जगायची वेळ आली की पळून जातात. विचारांचा दुष्काळ हा या राज्याला फार हानिकारक आहे. ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला त्या विधिमंडळात निवडून येण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवार कर्मकांड आणि भोंदूगिरीच्या मागे लागलेले दिसतात. त्यांच्या पूजेच्या अन् कर्मकांडाच्या सातत्याने बातम्या होतात.
How You Can Help:
1️⃣ Donate: Contribute school kits, including notebooks and other stationery.
2️⃣ Raise Awareness: Share this thread to spread the word about the initiative.
3️⃣ Volunteer: Join us in distributing the kits and experience the impact firsthand.
We're back with our annual 'Gift-a-Notebook' initiative!
This Joy of Giving Week, we're supporting 450 students from Palghar dist. with essential school kits. You can make a difference by donating or sharing this cause! 🎒
Let’s create brighter futures together! #DaanUtsav
ही एकी तोडण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला पण कोणा ला ही शक्य झाले नाही.
काही मनुवादी विशालगडावर तोडमोड करण्यात मग्न होते तेव्हा हे दोघे समता आणि बंधुत्व वारी मध्ये दाखवत होते ….
ही परंपरा १००० वर्ष जुनी आहे..
निवडणुकी आधी दंगा घडीवणे हे २००९ साली सुद्धा झाले होते
So MH govt has announced a reward of 1 Cr to each player of world cup winning squad.
Who gave them this right to waste tax payers money ?
Do these players really need that money ? (All of them are already earning a lot by promoting betting apps 🙂)
Shame on Maharashtra Govt.