INDIAN TOURISM WRITER & FREELANCE JOURNALIST.
"प्रवासाची वेगळी दृष्टी मांडणारे, अनुभवातून शब्द घडवणारे नागपूरचे पर्यटन लेखक व ब्लॉगर श्रीकांत पवनीकर,९४२२०८४१४
गाथा अज्ञात महापुरुषांची—भाग १-स्टोरी टेलिंग ..!
अद्भुत ब्रम्हेंद्रस्वामी
गाथा अज्ञात महापुरुषांची...पहिला एपिसोड...दर रविवारी ! अद्भुत ब्रह्मेंद्रस्वामी..! मराठा राज्यातील एक वादळी आणि अत्यंत प्रभावी महापुरुष..! छत्रपती शाहू महाराज,बाळाजी विश्वनाथ,बाजीराव पेशवे,चिमाजी आप्पा, कान्होजी आंग्रे, जंजिऱ्याचा सि��्धी आणि शाहु महाराज यांचे कुटुंब व असंख्य परिवार हे सर्व ब्रम्हेंद्रस्वामी यांच्या शिष्य परिवारातले होते .या सर्वांचे आध्यात्मिक गुरू होते अद्भुत ब्रम्हेंद्रस्वामी..!
ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया द्या..व्हायरल करा..! एक अज्ञात महापुरुष..
श्रीकांत पवनीकर
स्टोरी टेलर -९४२२०८४१४५
https://t.co/fbSOXVC2RD प्रथम पुरस्कार ....! मंगल पांडे..!
डिस्ट्रिक्ट लॉयन्स इंटरनॅशनल फॅन्सी ड्रेस स्पर्धेत " मंगल पांडे यांची भूमिका साकारलेल्या श्रीकांत पवनीकर यांच्या वेशभूषेला आणि अभिनयाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला..! आज १५ ऑगस्टला हा भव्य दिव्य दिमाखदार नेत्रदिपक कार्यक्रम नक्षत्र सभागृह, एम्प्रेस मॉल येथे ४०० लोकांच्या उपस्थितीत साजरा झालाआणि मंगल पांडे यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला तसेच ही भूमिका लक्षवेध योगनृत्य परिवार उदय नगर येथे सुद्धा सादर करण्यात आला त्याला सुद्धा उदंड प्रतिसाद मिळाला.!🌹👍त्याची काही क्षणचित्रे..!Thnx to all for Motivation 🌹👍
#independance#MangalPandey#deshabhakti#swatantradivas#MaharashtraNews#MaharashtrachiHasyaJatra#MaharashtraGovernment#maharashtrapolice#IndianSolider#indianarmy#CentralGovernment#narendramodi_primeminister#NarendraModi See less
प्रथम पुरस्कार ....! मंगल पांडे..!
डिस्ट्रिक्ट लॉयन्स इंटरनॅशनल फॅन्सी ड्रेस स्पर्धेत " मंगल पांडे यांची भूमिका साकारलेल्या श्रीकांत पवनीकर यांच्या वेशभूषेला आणि अभिनयाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला..! आज १५ ऑगस्टल��� हा भव्य दिव्य दिमाखदार नेत्रदिपक कार्यक्रम नक्षत्र सभागृह, एम्प्रेस मॉल येथे ४०० लोकांच्या उपस्थितीत साजरा झालाआणि मंगल पांडे यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला तसेच ही भूमिका लक्षवेध योगनृत्य परिवार उदय नगर येथे सुद्धा सादर करण्यात आला त्याला सुद्धा उदंड प्रतिसाद मिळाला.!📷📷त्याची काही क्षणचित्रे..!Thnx to all for Motivation 📷📷
#independance#MangalPandey#deshabhakti#swatantradivas#MaharashtraNews#MaharashtrachiHasyaJatra#MaharashtraGovernment#maharashtrapolice#IndianSolider#indianarmy#CentralGovernment#narendramodi_primeminister#NarendraModi ...Viral in India
चला बघु या भारतातले नवीन अनोळखी ठिकाण ...
गूढ “खाबा” ..! भयाण गावातला विराण किल्ला ..!
पश्चिम राजस्थानातील थारच्या वाळवंटातील जैसलमर शहराच्या सभोवताली पसरलेल��� वाळूचा प्रदेश..! शहराच्या सभोवताली बघितले तर दूरवर आणि जवळपास सुद्धा असंख्य वाळूच्या लहान मोठ्या टेकड्या,डोंगर, काटेरी वने बघण्यात आपण गुंतून जातो. या वाळूंच्या टेकड्यांचे स्थान येथील विषम भौगोलिक वातावरणा मुळे सतत बदलत असते.या टेकड्यांना “सॅन्ड ड्युन्स” म्हणतात. बरेचदा प्रचंड रेतीच्या वादळात आणि धुलिकणात तात्पुरत्या बांधकामाची वाट लागते आणि अशा ठिकाणी आपण पक्क्या बांधकामाची कल��पना सुद्धा करू शकत नाही..! तरी सुद्धा राजा रावल जैसलने बाराव्या शतकात पिवळ्या दगडांचा जैसलमेरला प्रमुख किल्ला बांधला तो सुद्धा उंच टेकडीवरच..! पिवळ्या दगडांचे हे संपूर्ण शहर असल्याने याला “गोल्डन सिटी” सुद्धा म्हटल्या जाते..!
याच गोल्डन सिटी मधून आमची गाडी बत्तीस किलोमीटरवर असलेल्या एका अनोख्या ठिकाणी वाळूच्या या प्रदेशातल्या एकमे�� डांबरी सडके वरून धुंद प्रवास करत होती. ऐन दुपारच्या उन्हात वाळवंटाचा तो प्रदेश ओसाड दिसायला लागला..मधे मधे वाळूत असलेली ठेंगणी हिरवी झुडपी खुरटलेली झाडे “ओअॅसिस” ची जाणिव करून देत होती..येथे पाण्याची प्रचंड कमतरता आहे. वाळवंटात कुठेही मोठे वृक्ष नाही की सावली नाही ! काही वेळाने दूरून एका गावात असलेल्या टेकडीवर एक किल्ला दिसायला लागला..! एकाट आणि विराण जागेवर स्थितप्रज्ञा सारखा अनेक पा��साळे बघीतलेला हा गूढ खाबा किल्ला..! फारसे कुणी येथे येत जात असे एकुणच वातावरणावरून जाणवत होते..! फक्त दोन तीन गुराखी होते..! बाकी कुठेही माणसांचे अस्तित्व नाही. आजही खंडहर न झालेला भव्य प्रवेशद्वार असलेला मध्य युगीन चौफेर मजबूत बुरूज असलेला हा “खाबा” किल्ला.! किल्ल्याच्या निगराणी करिता आणि सुरक्षितते करिता अनेक बुरूजांची आणि भिंतीला झरोख्यांची ��िर्मिती केलेली दिसते. कलात्मक झरोखा असलेल्या भव्य दारातून प्रवेश केल्यावर मोठे पटांगण दिसते.या पटांगणाच्या सभोवताली तीन ते चार पडव्यांचे एकत्रित बांधकाम दिसते. भर उन्हाळ्यात सुद्धा येथे प्रचंड शीतलता जाणवते. आत लहानसे सरोवर आहे. प्रत्येक चबुतर्याला अर्धवर्तुळाकार कमानी आणि तीन ते चार खांब असून सारे काही गूढ कथेने व्यापले आहे. दोनशे वर्षापूर्वीच्या वेदना आणि इतिहास येथे समावलेला आहे. सुंदर जाळीचे नक्षीकाम केलेले झरोके येथे असून याचे एक वैशिष्ठ्य आहे. एका खोलीतून बोलले की त्याचा आवाज हा किल्ल्यातल्या शेवटच्या खोली पर्यन्त आश्चर्यकारक रित्या पोहोचतो अशी येथल्या झरोक्यांची रचना आहे. आतमधे एक सुरेख संग्रहालय असून पुरातन काळात राजस्थान कसा होता आणि कसा वालुकामय झाला याचे चित्ररूपी प्रदर्शन आहे.येथे अनेक पेंटिंग्स असून अनेक प्रकारचे प्राचीन दगड ,जुने स्वयंपाकाचे मोठे हंडे,चौरंग ,दगडी फ्रेम, वाटा , खलबत्ता ,घंगाळ , अनेक खणे असलेल्या पेट्या, अनेक प्राचीन कलात्मक मूर्ति, वाजंत्री अशा असंख्य वस्तु बघायला मिळतात. वरच्या झरोख्यातून आणि लाकडी छतावरून संपूर्ण उजाड प्रदेश दिसतो..! दोनशे वर्षापूर्वी खाबा गावाचा बाजार येथे भरायचा. त्याच अनुषंगाने किल्ल्यातले चबुतरे बांधलेले आहेत. दोनशे वर्षापूर्वी हे गाव पालीवाल ब्राम्हणांनी वसविलेले होते. पाच हजार घरांची या गावात योजनाबद्ध रीतीने निर्मिती झाली आणि हे एक व्यापारी केंद्र बनले.मुलतान,सिंध,लाहोर,पाकिस्तानला व्यापारी याच मार्गावरून जायचे.त्यामुळे खाबा गाव आबादीआबाद झाले आणि चौर्यांशी गावचे हे प्रमुख व्यापारी केंद्र बनले. या गावाचे प्राचीन नाव आहे “भावनगर”..! जैसलमेरच्या “रियासत”चे हे प्रमुख शहंर होते. याच किल्ल्यात “व्यापारी मंडी” भरायची आणि आताची किल्ल्यातली चबुतरी रचना त्याच धरतीची दिसते. या गावात पालीवाल ब्राम्हणांनी सहा तलाव, पस्तीस छत्र्या, अंशी चबुतरे ,एक मंदिर , पाच यज्ञचौक्या आणि एकशे पंचवीस देवल्या बांधल्या. पण आज हे वैभव पुर्णपणे नष्ट झालेले आहे. काही भग्न मंदिरे आणि छत्र्या बघायला मिळतात. अशी चौर्यांशी गावे या परिसरात होती आणि एक दिवस कहर झाला..! येथून पंधरा किलोमीटरवर असलेल्या रहस्यमय अशा “कुलधरा” गावातल्या सरपंचाच्या सोळा वर्षाच्या सुंदर मुली बाबत कहर केला. दिवाण सालेमसिंग नावाच्या इंग्रज सामंतान��� दोन दिवसानंतर दिवस उजडायच्या आत लग्न करून न दिल्यास मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली. त्या सरपंचाच्या भयभीत गावात रात्रीच तातडीच्या निर्णया करिता सर्व चौर्यांशी गावांची बैठक झाली. सामंता समोर न झुकता आपल्या पालीवाल ब्राम्हणांच्या अब्रु आणि धर्म यांच्या संरक्षणार्थ नेसत्या वस्त्रानिशी गाव सोडून जाण्याचा अद्भुत निर्णय झाला..! बघता बघता त्याच रात्री चौर्यांशी गावे एका रात्रीत रि��ामी झालीत. हे सर्व गावकरी कुठे आणि कोणत्या दिशेला गेले याचा आजही पत्ता ��ागला नाही आणि बघता बघता खाबा गाव भयाण झाले ते मागे एक रहस्य ठेऊन ..! हे सारेच गूढ होते..! काळाच्या ओघात सर्वच गावे नष्ट झालीत ..आता फक्त कुलधरा गाव आणि खाबा किल्ला ही दोनच स्थळे अस्तित्वात आहेत..!
मोरांच्या आणि पक्षांच्या सानिध्यात असलेल्या खाबाची “आभा” अनेक वर्षे पर्यन्त राजस्थानात चकाकत होती.
असे हे भयाण “खाबा” गाव आणि अद्भुत विराण किल्ला. .!
श्रीकांत पवनीकर
पर्यटन लेखक –मो 094220 84145 See less
https://t.co/HRz4ZiI8as Sadanand Pawnikar
AI content
·
t͏e͏S͏o͏o͏p͏d͏s͏r͏n͏5͏f͏c͏5͏g͏t͏u͏4͏m͏g͏8͏3͏5͏h͏g͏l͏
h͏
0͏h͏i͏1͏9͏5͏a͏0͏c͏l͏9͏8͏0͏7͏f͏0͏t͏m͏
3͏
h͏5͏2͏i͏f͏g͏l͏8͏6͏8͏
2͏
l͏2͏i͏
·
Shared with Public
महाराष्ट्राच्या प्रकाशकांचे लक्ष वेधीत आहे ...!
प्रतिष्ठित प्रकाशकांसाठी सुवर्णसंधी--" फिरता ..! फिरता ..!" नवे कोरे पुस्तक .
भारताच्या अनोळखी पर्यटनावर आ���ारित वैशिष्ट्यपूर्ण मराठी पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रकाशक हवा आहे
मराठीतील पर्यटन साहित्याला नवी दिशा देणारे पर्यटन लेखक व स्वतंत्र पत्रकार श्रीकांत सदानंद पवनीकर यांचे भारताच्या अनोळखी पर्यटनावर आधारित चौथे पुस्तक " फिरता ..! फिरता ..!" प्रकाशनासाठी पूर्णतः सिद्ध आहे.
हे पुस्तक भारतातील सर्वपरिचित पर्यटन��्थळांऐवजी अनोळखी, दुर्लक्षित, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळांचा प्रत्यक्ष भ्रमंतीवर आधारित अभ्यासपूर्ण परिचय करून देणारे वैशिष्ट्यपूर्ण लेखन आहे. मराठी पर्यटन साहित्यात या विषयावर फारच कमी पुस्तके उपलब्ध असल्याने या पुस्तकाला व्यापक वाचकवर्ग मिळण्याची मोठी क्षमता आहे.
लेखकाची यापूर्वी प्रकाशित पुस्तके
📖 एक भारावलेली भ्रमंती
📖 चौफेर नगरी
📱 नवराष्ट्रा���ील भटकंती
नवराष्ट्रातील भटकंती (लोकप्रिय ई-पुस्तक)-अमेझोन आणि गुगल बुक वर अत्यंत अल्प किमतीत उपलब्ध
ही पुस्तके पर्यटनप्रेमी वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळवित आहेत.
आता चौथे पुस्तक प्रकाशनाच्या उंबरठ्यावर आहे.
महाराष्ट्रातील तसेच पुणे, मुंबई आणि इतर शहरांतील प्रतिष्ठित प्रकाशन संस्था या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पुढाकार घेऊ इच्छित असतील, तर त्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
हे पुस्तक दर्जेदार संपादन, आकर्षक निर्मिती आणि प्रभावी विपणनाच्या माध्यमातून मराठी पर्यटन साहित्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते.
इच्छुक प्रकाशकांनी संपर्क साधावा
श्रीकांत सदानंद पवनीकर
पर्यटन लेखक • स्वतंत्र पत्रकार, नागपूर
📞 मो.: ९४२२०८४१४५
📧 ई-मेल : [email protected]
"चला... भारताच्या अनोळखी पर्यटनाचा अद्भुत वारसा मराठी वाचकांपर्यंत एकत्रितपणे पोहोचवू या. See less See less
*नागपूर ४ ऑगस्ट*
*👍🌹थेट तुमच्या घरातून...!..मुंबईच्या हास्य सम्राटांची नागपुरात धमाल..🌹👍*
*🌹"थेट तुमच्या घरातून...!" या प्रसाद खांडेकर ��िखित आणि दिग्दर्शित आणि नम्रता संभेराव यांच्या धमाल अभिनयाने नटलेल्या नाटकाच��� पहिलाच प्रयोग काल नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात जबरदस्त हाऊसफुल झाला आणि प्रेक्षकांनी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाट डोक्यावर घेतले.नेमके टायमिंग..अभिनयाला सहजपणा.. क्षणाक्षणाला होणारे बदल .."बिग बॉस" मध्ये प्रवेश मिळाल्यावर त्यातून झालेले कौटुंबिक एकतेचे दर्शन..हा या नाटकाचा मुळ गाभा..! कुटुंबातच एकमेकांना वेळ देऊ न शकणारे सदस्य या निमित्ताने एकाच घरात अनेक दिवस"कोंडलेल्या वातावरणात" राहतात आणि त्यातून प्रत्येक सदस्य आई वडिलांसमोर आपल्या भावनांना आणि समस्यांना मोकळी वाट करून देतात..! प्रत्येक सदस्यांनी एकमेकांना न सांगता एकमेकांची घेतलेली* *काळजी आणि त्यातून शेवटी होणारा खुलासा हा डोळ्यात पाणी आणणारा आहे आणि हेच नाटकाचे यश आहे..! यात नम्रता संभेराव हिचा प्रवेश आणि धमाल अफलातून नृत्य त्याला प्रेक्षकातुन येणारे 'वन्स मोर ' प्रसाद खांडेकर यांचे विन���दी आणि गंभीर कुटुंबप्रमुख असलेल्या भूमिकेचे वास्तव आणि चेहऱ्यावरच्या भोळसट पणाला तोड नाही..! यात खरा क्लायमॅक्स म्हणजे वडिलांनी मुलगा होणे, मुलाने वडील होणे ,आईने मुलगी होणे आणि मुलीने आई होणे हा असून यातून निर्माण होणारा विनोद आणि यात बदललेल्या भूमिका अफलातून साकारल्या आहेत..!एकूणच भाग्यश्री मिलिंद, ओंकार राऊत,भक्ती देसाई आणि प्रथमेश शिवलकर यांच्या व्यावसायिक* *कलावंतांचे दर्शन झा��े आणि हेच या नाटकाच्या चमुचे यश आणि गमक आहे..! प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांचे पुनश्च अभिनंदन..!*
*एक निरीक्षण.!*
*श्रीकांत पवनीकर पर्यटन लेखक आणि मुक्त पत्रकार नागपूर, संपर्क मित्र 🌹*9422084145
https://t.co/Qv1g32TdTk
https://t.co/h1Yia30k3X Shrikant Sadanand Pawnikar
Setondosrp895gc19g0a8t1hccim0il1h61701u6lt2fcu73iimhm3ha21ft ·
मी श्रीकांत पवनीकर ,पर्यटन लेखक , नागपूर -९४२२०८४१४५
पूर्व प्रथम श्रेणी प्रशासकिय अधिकारी, आयुर्विमा महामंडळ, नागपूर --तीन सर्वोत्कृष्ठ राज्यस्रतरीय पुरस्कार प्राप्त पुस्तके प्रकाशित .अनुक्रमे एक भारावलेली भ्रमंती , चौफेर नगरी आणि नवराष्ट्रातील भटकंती हि पुस्तके प्रकाशित.नवराष्ट्रातील भटकंती हे ईबुक प्रकाशित .आगामी या वर्षात येणाऱ्या नवीन पर्यटन पुस्तकाचे नाव आहे "फिरता..! फिरता..!"..!
हा ग्रुप मराठी प्रकाशक ,लेखक,पुस्तक विक्रेते, यांनी एकत्र यावे या करीता तयार केला आहे .पुस्तक विक्रेत्यांनी आणि वाचकांनी नवीन पुस्तकांची माहिती ,सवलती ,पुस्तक प्रका���न ,ई-पुस्तके,ओर्डर,आणि साहित्यिक विषयक चर्चा केली जाईल.सर्वांनी आपले अनुभव शेअर करावे आणि मराठी पुस्तके अजून जास्त विकता येतील यांच्या सुचना कराव्यात आणि विशेषतः महाराष्ट्राच्या नवीन जुन्या प्रकाशकांना जोडावे आणि हा ग्रुप प्रचंड व्हायरल करावा नम्र विनंती.
श्रीकांत पवनीकर,पर्यटन लेखक ,
नागपूर -९४२२०८४१४५
See less
आजच्या पाण्याची आणि सडकेच्या पा���्याची मज्जा.. #इट्स माय रेन https://t.co/kGEXihaMsh via @YouTube INDIAN TOURISM WRITER FROM NAGPUR -MAHARASHTRA ! I PUBLISHED UNEXPLORED DESINATIONS OF INDIA THROUGH MY MARATHI TOURISM BOOKS & PUBLISHED FOUR BOOKS ..९४२२०८४१४५
@CJP_for_India SHRIKANT PAWNIKAR
@pawnikar
·
1s
https://t.co/JnIex8DLaj📷पाच किलो फुकट धान्य देऊन आणि दीड हजार रुपये हातात कोंबुन तुम्ही जगभर आलिशान पद्धतीने जगभर फिराल तर विद्रोह होणार ..! हा व्यवस्थे विरुद्ध संताप आहे ..! जगभर विमानाने वर्षभर फिराल तर ते नजरेत येणारच ..! भोगा आता ..!
https://t.co/UgVzpBXkYL📷पाच किलो फुकट धान्य देऊन आणि दीड हजार रुपये हातात कोंबुन तुम्ही जगभर आलिशान पद्धतीने जगभर फिराल तर विद्रोह होणार ..! हा व्यवस्थे विरुद्ध संताप आहे ..! जगभर विमानाने वर्षभर फिराल तर ते नजरेत येणारच ..! भोगा आता ..!
माझे पर्यटन ......... नील बेटावर एक रात्र ...!
वाचा एका भारावलेली भ्रमंती आणि नवराष्ट्रातील भटकंती ..इबुक अमेझोन वर उपलब्ध ...संपर्क ९४२२०८४१४५
like & share श्रीकांत पवनीकर