तीन सदस्यीय शिष्टमंडळाने पिं. चिं. महानगरपालिकेला भेट दिली. यामध्ये सिंटेफ कंपनीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ ख्रिस्तीन एंजेल्सन, तोम्रा सिस्टीम कंपनीच्या प्रतिनिधी गार्गी पारीख तसेच नॉर्वे दूतावासाचे आर्थिक आणि परराष्ट्र नीती खात्याचे भारतातील सल्लागार राहुल माहेश्वरी यांचा समावेश होता.
पिं. चिं. मनपाच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये #जनसंवाद सभा पार पडली.
#PCMCSmartSarathi
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि पुणे शिक्षण मंडळाचे श्री म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी यांच्या वतीने आज दि. २२ रोजी #प्लास्टिकमुक्त_शालेय_परिसर_अभियान” या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते संपन्न.