यंदाच्या फुटबॉलच्या महाकुंभात अर्थात ‘फिफा वर्ल्ड कप- २०२६’मध्ये आमचा मित्र व ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण याच्या रूपात मराठी पत्रकारितेचा सन्मान झालाय... मेक्सिको, कॅनडा व अमेरिका या तीन देशांमध्ये पार पडणाऱ्या फिफा विश्वचषकाचे तिथूनच एकमेव अधिकृत मराठी भाषिक क्रीडा समीक्षक म्हणून संदीप चव्हाण कव्हरेज करतोय.. थेट मेक्सिकोहून संदीपने हा ब्लॅाग लिहिलाय… त्यात तो लिहितोय,
फुटबॉल विश्वचषकाच्या यजमान शहरातून, मेक्सिको सिटीच्या भूमीतून हे शब्द मी लिहित आहे. ही केवळ एक नगरी नाही; हा फुटबॉलच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. याच शहराने जगाला एक असा नायक दिला, ज्याला काळाच्या ओघात देवत्व प्राप्त झाले. १९८६ मध्ये याच ऐतिहासिक स्टेडियमवर दिएगो मॅराडोनाने अर्जेंटिनाला दुसरे विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि स्वतःला फुटबॉलच्या अमर गाथेत कोरून ठेवले. त्या सुवर्णक्षणांच्या आठवणी अजूनही या शहराच्या हवेत तरंगताना जाणवतात.
आज, त्याच मेक्सिको सिटीत, त्या इतिहासाच्या सावलीत उभा राहून, दै. मुंबई तरुण भारतचा क्रीडा प्रतिनिधी म्हणून अधिकृत मान्यता घेऊन विश्वचषकाच्या प्रेस बॉक्समधून वार्तांकन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. हा केवळ माझा वैयक्तिक प्रवास नाही; हा मराठी पत्रकारितेच्या स्वप्नांचा, जिद्दीचा आणि अस्मितेचा प्रवास आहे.
जगातील २११ देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. अब्जावधी चाहत्यांच्या भावना ज्याच्याशी जोडलेल्या आहेत, अशा या महाकुंभासाठी अधिकृत मान्यता मिळवणे हे कोणत्याही माध्यमासाठी अभिमानाचे असते. पण यावेळी अभिमानाची गोष्ट अशी की, महाराष्ट्रातील मराठी पत्रकारितेच्या इतिहासात प्रथमच दै. मुंबई तरुण भारतला विश्वचषकाचे अधिकृत अॅक्रिडिटेशन मिळाले आहे. आणि त्या इतिहासाचा पहिला साक्षीदार, पहिला प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे.
हा क्षण केवळ एका पत्रकाराचा नाही. हा प्रत्येक मराठी वाचकाचा आहे. हा त्या मातृभाषेचा आहे, जिच्या शब्दांमध्ये आपण जग पाहतो, स्वप्ने रंगवतो आणि भावना व्यक्त करतो. अनेक दशकांपासून इंग्रजी आणि इतर भाषांच्या माध्यमांनी गाजवलेल्या या जागतिक व्यासपीठावर आज मराठीचा आवाजही तितक्याच अभिमानाने घुमत आहे.
मेक्सिको सिटीच्या रंगीबेरंगी रस्त्यांवर, स्टेडियममधील गगनभेदी जल्लोषात, चाहत्यांच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये आणि विजयानंतरच्या आनंदोत्सवात मला जगभरातील भावनांचा महासागर दिसतो आहे. पुढील महिनाभर संपूर्ण जग हसू आणि आसू यांच्या हिंदोळ्यावर झुलणार आहे. कुणाचे स्वप्न साकार होईल, कुणाचे तुटेल; कुणी इतिहास घडवेल, तर कुणी इतिहासाचा भाग बनेल.
त्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक थराराचा, प्रत्येक भावनेचा साक्षीदार म्हणून मी येथे आहे. आणि हजारो किलोमीटर दूर असलेल्या माझ्या मराठी वाचकांपर्यंत त्या प्रत्येक क्षणाची धडधड पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.
चला, या फुटबॉलच्या महाकुंभात आपण सर्वजण सहभागी होऊया. मेक्सिकोच्या या ऐतिहासिक भूमीवरून, मराठी मनांपर्यंत पोहोचणाऱ्या या प्रवासाचे सहप्रवासी होऊया. कारण हा केवळ विश्वचषक नाही; हा मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा एक अविस्मरणीय क्षण आहे.
[email protected]
पुणे- काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण! पुण्यातील मित्रमंडळ चौकामध्ये असलेल्या एका वृत्तपत्राच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिस ठाण्यात मोठी गर्दी.
#pune#police#Congress#punecongress#bjp#punebjp#pmc#hanumantpawar
पुणे- आताच मर्डरकरून बाहेर आलोय, मला दर महिना हप्ता द्या म्हणत पुण्याच्या गुलटेकडीत हवेत गोळीबार. हातात कोयते घेऊन दहशतही माजवली. अल्पवयीन मुलांचा सहभाग.
#pune#police#crime#punepolice#pmc#murder#पिस्तुल
पुणे- भाजप-काँग्रेसमध्ये झालेल्या दगडफेक प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन्ही बाजूच्या नेते व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेत 3 काँग्रेस, 2 भाजप, 2 पत्रकार आणि 3 पोलीस जखमी झाले होते.
पुणे- महाशिवरात्रीनिमित्त कसबा पेठेतील श्री पुण्येश्वर मंदिर, येरवड्यातील श्री तारकेश्वर मंदिर परिसरात रविवारी वाहतूक बदल. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
#punetraffic#punenews#police#punepolice#news
पुणे- पुण्यातील येरवड्यात आणि पिंपरी चिंचवड येथील चाकणमध्ये किरकोळ वादातून दोन तरुणांचे खून झाले. वेगवेगळ्या घटनांमध्ये आज शहरात या घटना घडल्या आहेत. अगदीच शुल्लक कारणावरून या घटना घडल्या
#pmc#punepolice#pimprichinchwadpolice#murder#crime#punecrime
पुणे- गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तब्बल २४ तासापेक्षा अधिक काळ वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे दूरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अवकाशातून घेतलेल्या छायाचित्रात रांगा दिसून येत आहेत.
#pune#mumbai#पुणे_मुंबई#police#महामार्ग#महामार्ग_पोलीस
पुणे- बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान लँडिंग होत असताना मोठा अपघात. विमानातील तीन ते चार प्रवाशी जखमी.
#अजित_पवार#विमान#अपघात#बारामती#पुणे
पुणे- कौटुंबिक वाद आणि पतीच्या व्यसनांना कंटाळून आईनेच 11 वर्षीय मुलाचा खून केला. नंतर 14 वर्षीय मुलीवर वार करून तिच्याही खुनाचा प्रयत्न केला. पुण्यातील वाघोलीत ही ह्रदय पिळवून टाकणारी घटना घडली.
#pune#pmc#police#crime#pune_crime#पुणे#पोलीस
पुणे- शहर व ग्रामीण भागातून #देशात ड्रग्ज रॅकेट चालविले जात असल्याचे सातत्याने समोर येत असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूरमध्ये कारवाईकरून तब्बल साडे दहा किलो मेफेड्रोन पकडले. या रॅकेटमध्ये आहिल्यानगर पोलिस दलातील पोलिस हवालदाराचाही समावेश आहे.
#पुणे#ड्रग्ज#पोलीस#pune#pmc
पुणे- पुणे ग्रँड चॅलेंज टूरदरम्यान अपघात; छोट्या रस्त्यावरून जात असताना धावपटू एकमेकांना धडकले. काहीजण रस्त्याच्या खाली गेले.
#ग्रँड_चॅलेंज_टूर#सायकल#स्पर्धा#पुणे