You were fascinated by her accent. I loved her marketing skills. I heard the polite unsaid and unheard - "You are making your content bro using my input, what about me? So buy something". Smart cookie this lady 😅
https://t.co/8X0fYCdfzt
कोकणात विशेषतः रायगड जिल्ह्यात आदिवासी किंवा ज्यांना आर्थिक/ सरकारी गोष्टींचे फार काही कळत नाही त्या लोकांच्या बाबतीत
" साठेकरार" नावाने एक खूप फालतू प्रकार सुरू झालाय..!
ह्यात होतं काय की..
एक एजंट गावातल्या कोणाच्या तरी ओळखीने गावात येतो..
आणि मी तुमच्या ह्या डोंगरातल्या जमिनीला भारी भाव मिळवून देतो असे सांगतो..!
ह्या लोकांना बाजारभावही माहीत नसतो..त्यांच्यासाठी लाख रूपये पण खूप असतात..मग..
त्यांना हा बोलतो..तुमची जमीन मी २० लाख भावाने घेतो..पण सगळी कागदी प्रक्रिया झाल्यावर पैसे मिळणार..
तोपर्यंत हे १ लाख घ्या आणि आपण साठेकरार करू..
आता हा माणूस हा साठेकरार तहसील मध्ये जाऊन नोंदवतो..त्यासाठी स्टॅम्प ड्यूटी पूर्ण रकमेची भरतो..म्हणजे १० लाखाला ६० हजार म्हणजे सरकारी कागदावर त्याने जमीन घेतल्याचे येते आणि एकदा हे झालं
की मग
खरा विकत घेणारा शोधायला लागतो..
२० लाखाची जमीन खरा बाजारभाव ५० लाख एकराने विकतो..!
त्यातले २० लाख (ठरल्याप्रमाणें..😡) खऱ्या मालकाला मिळतात आणि वरचे ३० लाख ह्या एजंटला..🤬
जमीन घेणारा थेट मूळ मालकाकडून जमीन घेतो म्हंटले तर ह्या एजंटचे नाव असते सरकार दरबारी..ह्याला बाजूला करून जमीन घेणे शक्यच नसते..😑
पुढे जाऊन असेच काळी माया जमवत लोक युवा नेता सरपंच नेते होतात..आणि मग अशाच गोष्टी मोठ्या प्रमाणावर होतात..!
तुम्हाला जर वाटत असेल ना की आपण विचारही करणार नाही अशा जागी परप्रांतीय जमिनी कशा घेतात तर अशा घेतात..
कारण अशा जमिनी हे लोक परप्रांतीय लोकांनाच विकतात कारण त्या लोकांचा गावात किंवा आजूबाजूला कॉन्टॅक्ट निघणे अवघड असते..जेणेकरून मूळ मालकाला जमीन नक्की कितीला गेली हे कळूच नये..😑
आजकाल *देवांची* व *देवस्थानांची* अवस्था सुद्धा *डॉक्टरांसारखीच* झालीय...
👉 *गावातला देव* किंवा *मंदीर* म्हणजे *BHMS* किंवा *BAMS* डॉक्टर.
किरकोळ सर्दी, पडसं, थंडीताप, छोटे मोठ्या तक्रारी अडचणी असतील तर या डॉक्टर कडे जायचे.
🙄🙄🙄🙄🙄
👉 जरा *मध्यम आजार* असेल तर *अष्टविनायक,* *गणपती पुळे,* *पावस,* *चाफळ* वगैरे ठिकाणी गेलं म्हणजे कसं *MBBS* वाल्याकडं गेल्यासारख वाटतं.
😳😳😳😳😳
👉 जरा *कडक आजार* असेल तर *मांढरदेवी,* *जेजूरी,* *पाली,* *शनी शिंगणापुर* असे जरा *प्रयोगशील डॉक्टरर्स,* डिग्री मोठी नसताना पण धाडसानं प्रँक्टीस करणाऱ्या डॉक्टरां सारखेच.
😂😂😂😂😂
👉 *शिर्डी,* *सिद्धीविनायक,*
*दगडूशेठ,* *लालबाग,* म्हणजे *MS,* *MD.* थोडा खर्च जादा पण *स्पेशालिस्टकडे* गेल्यासारखा अनुभव येतो.
🤣🤣🤣🤣🤣
👉 *तिरूपती,* *अमरनाथ,* *वैष्णवीदेवी,* म्हणजे *फॉरेन रिटर्न डॉक्टरच!* हे शक्यतो पैसेेवाल्यांचे डॉक्टर. पैसा कितीही गेला तरी चालेल पण गुण एकदम झकास आला पाहिजे. सगळे आजार बिजार एकदम गायबच झाले पाहिजेत. इथे सामान्य पेशंटना सहजासहजी प्रवेश नाही.
😅😀😃😄😅
आणि एकीकडे
👉 *पंढरीचा पांडुरंग* म्हणजे आपला *सरकारी डॉक्टर,* कमी पैशात सगळ्या गोरगरीबांची दुखणी बरी करणार. कधीही जावा, कधीही उठवा, रागावणार नाही का आधी पैसे भरा मगच उपचार सुरू करू असली भानगड नाही. पैसे द्या अथवा देवू नका, दारात येईल त्याच्यावर औषधोपचार करणार...
*🙏🏻🌹पांडुरंग हरि श्री विठ्ठल🌹🙏🏻*