स्वर्गीय उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित विशेष आरोग्य शिबिर..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट व क्रीडा साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.
पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त श्री गोट्या सावंत व श्री समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित दशावतार नाट्यप्रयोगाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे करण्यात आला.
पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली भाजपा सचिव श्री समीर प्रभुगांवकर यांनी बोर्डवे येथील विध्यार्थिनी कु. वैष्णवी येंडे व ओसरगाव येथील प्रसिद्ध उद्योजक श्री संतोष कदम यांनी ओसरगाव येथील कु.हर्षाली धोत्रे यांच्या पुढील शिक्षणाची घेतली जबाबदारी
जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकी दरम्यान कणकवली तालुक्यातील ओसरगाव खासकीलवाडी वाडीतील स्मशानभूमीसाठी आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध करून देत दिलेला शब्द पूर्ण केला.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने आज सावंतवाडी शहरात विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या कार्यक्रमातील काही क्षण!
विराट हिंदू संमेलन 🚩
📍कपिदास श्रीराम वस्ती, तुलसीनगर, प्रभादेवी - मुंबई
आज मंत्री श्री नितेश राणे प्रभादेवी हिंदू एकता आणि भवानी माता सोसायटी यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त आयोजित विराट हिंदू संमेलनाला उपस्थित राहिले.