@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@DGPMaharashtra@ThaneCityPolice@112Maharashtra
पोलीस महानगर :- भिवंडीतील कोनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिंगर बारमध्ये रात्रभर ‘छमछम’?
तोकड्या कपड्यांतील अश्लील नृत्य अन् पैशांची उधळण; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
भिवंडी : भिवंडी येथील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका सिंगर बारमधील कथित प्रका��ामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या बारमध्ये निर्धारित वेळेच्या पुढेही मनोरंजन सुरू राहत असल्याचा आरोप असून, महिलांकडून तोकडे कपडे परिधान करून नृत्य केले जात असल्याचे दर्शविणाऱ्या व्हिडीओ क्लिप उपलब्ध झाल्या आहेत. या नृत्यादरम्यान पैशांची उधळण होत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
उपलब्ध व्हिडीओ क्लिपमध्ये बारमधील वातावरण, महिलांकडून सुरू असलेले नृत्य आ��ि ग्राहकांकडून पैशांची उधळण होत असल्याचे दृश्य दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ नियमित मनोरंजनाच्या चौकटीत येतो की नियमांचे उल्लंघन होत आहे, याची अधिकृत तपासणी होणे आवश्यक आहे.
निर्धारित वेळेचा नियम पायदळी तुडवला जातोय का?
बार आणि मनोरंजनाच्या आस्थापनांसाठी लागू असलेल्या वेळेच्या तसेच इतर परवानगीच्या अटींचे पालन होत आहे की नाही, हा या प्रकरणातील महत्त्वा���ा मुद्दा आहे. जर संबंधित आस्थापना निर्धारित वेळेनंतरही सुरू राहत असेल, तर त्याबाबत संबंधित विभागाकडून तपासणी आणि आवश्यक कारवाई होणे अपेक्षित आहे, परंतु तसे होताना निदर्शनास येत नाही.
पोलिसांच्या हद्दीतच नियमांना हरताळ?
भिवंडी येथील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत असताना स्थानिक पोलीस आणि संबंधित प्रशासनाच्या नियमित तपासणीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. बारमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी किंवा पुरावे समोर आल्यास त्याची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची गरज आहे.
विशेष म्हणजे, बारमधील कथित अश्लील नृत्य आणि पैशांची उधळण होत असताना कोनगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे
‘बार’च्या नावाखाली नेमके काय सुरू आहे?
नियमांचे पालन करण्याची जबाबदारी बारचालकांची असतानाच त्याची अंम���बजावणी सुनिश्चित करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. त्यामुळे भिवंडी येथील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संबंधित सिंगर बारची परवानगी, वेळेच्या अटी, मनोरंजनाचे स्वरूप आणि व्हिडीओ क्लिपमध्ये दिसणाऱ्या प्रकारांची प्रशासनाने तातडीने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
#Bhiwandi
#KonGaon
#SingerBar #PoliceAction #BreakingNews