आपण आयुष्यात कितीही यशस्वी झालो तरी
सुरुवातीच्या दिवसांतील संघर्ष कधीही विसरू नये.
कारण यशाची उंची ही संघर्षाच्या पायावरच उभी असते. संघर्षानेच आपल्याला घडवलं, संयम शिकवला आणि यशाची खरी किंमत समजावून दिली.
म्हणून
यश मिळाल्यावर बदलू नये,
तर संघर्षाच्या आठवणींनी अधिक नम्र व्हावे.
इतिहासाशी प्रतारणा करू नका:
किशोरवयीन ज्ञानेश्वरांची पूजा करायची—पण आजच्या तरुण विचारवंताला गप्प बसवायचे?
तरुण शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा—पण तरुणांच्या राजकीय कल्पनाशक्तीवर अविश्वास दाखवायचा?
सावित्रीबाईंचा गौरव करायचा—पण विद्यार्थ्यांना शिक्षणसुधारणेत स्थान नाकारायचे?
ही इतिहासभक्ती नाही.
ही इतिहासाची विटंबना आहे.
मानवी प्रतिभा सेवाज्येष्ठतेची वाट पाहत नाही.
सर्जनशीलतेला निवृत्तीचे प्रमाणपत्र लागत नाही.
पांढरे केस म्हणजे शहाणपणाची हमी नाही.
भविष्य खोलीतील सर्वांत ज्येष्ठ व्यक्तीचे नसते.
ते सत्तेतील सर्वांत शक्तिशाली व्यक्तीचेही नसते.
ते त्यांचे असते—
ज्या���ना त्या भविष्यात जगायचे असते.
-महेश झगडे
काही बातम्यांचे मथळेच लक्षवेधक असतात...
उदाहरणार्थ.....😊
खूप वर्षांपूर्वी, एक महिला विमानप्रवासात प्रसूत झाली. त्या बातमीचे हेडिंग होते..
'तिच्या भाळी , जन्म आभाळी.'
***
_वजनात मारणे हा रद्दीवाल्यांचा आणि भाजीवाल्यांचा जणू हक्कच असतो. त्यावर वैधमापन विभागाने कारवाई सुरू केली. त्या बातमीचं हेडिंग होतं...
'मापात पाप' करणार्यांना चाप!
***
एके वर्षी मुंबई पावसात तुंबली.
बातमीचं हेडिंग होतं...
'तुंबई'!
***
_एका बातमीचं हेडिंग भारी वास्तव वाटलं...
"अटक न करण्यासाठी लाच घेताना अटक!"
***
_आता त्याला बरीच वर्षें झाली. छगन भुजबळ तेव्हा मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने महापौर असताना त्यांना सनसनाटी गोष्टी करायला फार आवडत असे. गणपती विसर्जनाच्या दिवशी त्यांनी हेलिकाॅप्टरमधून मिरवणूकीतून वाजतगाजत जाणाऱ्या गणपतीच्या मूर्तींवर पुष्पवृष्टी केली. दुसऱ्या दिवशी लोकसत्ताचे हेडिंग होते:
"मानवाची आकाशात���न देवांवर पुष्पवृष्टी"
***
_बाय द वे, एक आठवणीतलं हेडिंग आठवलं...
'जीव वाचवण्यासाठी पळताना
खड्ड्यात पडून मृत्यू!'
***
_सौरभ गांगुली (डावखुरा) आणि युवराज सिंग यांनी पाकिस्तानविरुद्ध त्रिशतकी भागीदारी केली आणि त्याच दिवशी कम्युनिस्टांनी मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली...
_लोकसत्ता फ्रंट पेज हेडिंग...
'डाव्यांचा तडाखा!'
***
_मागे कोल्हापुरात एक खून खटला गाजला होता. त्य���च्या बातम्या खूप वाचल्या जायच्या. सहाजिकच, साक्षी, पुरावे, उलट तपासणी यांत हेडिंगचा मसाला मिळायचा. त्याच काळात, एका स्थानिक पेपरची हेडलाईन होती...
'नाम्या, बगतूस काय? घाल गोळी!'
***
_राहुल द्रविड च्या निवृत्ती वेळी_
_एका इंग्रजी पेपरचा अप्रतिम मथळा होता...
'Indian team is now bread n butter
but without Jammy'
***
_भारताने वानखेडेत होणाऱ्या विश्वचषक अंतिम फेरी धडक मारली, तेव्हाचा एक अप्रतिम मथळा...
'चारले खडे, आता वानखेडे'
***
_मटा ऑनलाइन मथळा..._
'पतंजली कोलगेटचे दात पाडणार!'
***
_हे थोडं आक्षेपार्ह आणि तितकंच गमतीदार हेडिंग…_
_गोव्यात 'पाळी' नावाचं गाव आहे. विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेपूर्वी पाळी हा एक मतदारसंघ होता. निवडणुकीस एक नामांकित डॉक्टर उभे राहिले. मोठा मेळावा घेतला. धडाकेबाज भाषणे झाली. गोव्यातल्या एका नामांकित मराठी दैनिकाने दुसऱ्या दिवशी हेडिंग दिले...
"डॉ. ××××× पाळीच्या समस्या सोडविणार!"
_(बोंबला!)
***
_वादग्रस्ततेमुळे खैरनार यांची देवनार कत्तलखान्यात बदली झाली आणि त्यांनी तिथला कत्तलखानाच बंद करण्याच्या हालचाली आरंभल्या होत्या. त्याचे माझा मित्र पंढरीनाथ सावंत याने द���लेले हेडींग अजून लक्षात राहिले आहे..._
'खैरनार देवनारचे पवनार करणार!'
***
_या सर्वावर कडी करणारी हेडलाईन लोकसत्ताच्या अशोक पडबिद्री यांनी बर्याच वर्षांपूर्वी दिली होती. मुंबईत एका वर्षी प्रचंड म्हणजे प्रचंडच पाऊस झाला. अलीकडच्या 26 जुलैसारखाच. सारी मुंबई ठप्प झाली. लोकसत्ताची हेडलाईन होती...
'मुंबापुरीवर जलात्कार!!!'
***
_२००४ साली अटल सरकारचा पराभव करुन काँग्रेस बहुमताने जिंकली. त्यावे��चं टाईम्स ऑफ इंडियाचं हेडींग होतं...
'King Cong... Queen Sonia' !
_(अर्थात परदेशी जन्माच्या प्रश्नावरुन सोनिया गांधींनी नंतर पंतप्रधानपद नाकारलं हा भाग वेगळा.)
***
_बुटासिंग २००५ मध्ये बिहारचे राज्यपाल असताना तेथील त्रिशंकू विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने तशी शिफारस राष्ट्रपतींकडे करून तेव्हा जदयू-भाजपच्या संभाव्य यु��ीला सरकार बनविण्यापासून रोखले होते.
_सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवीत केंद्र सरकारवर कठोर प्रहार केले होते. तेव्हा एक शीर्षक होते (बहुधा "सामना"चे)...
सर्वोच्च न्यायालयाने
केंद्र सरकारला
'बुटा' ने हाणले!'
***
_मध्यंतरी बालाजी तांबे यांना त्यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकातील आक्षेपार्ह गोष्टींबद्दल खुलासा करण्याचे आदेश दिले होते तेव्हा लोकमत की कुठल्याशा वर्तमानपत्राने ब���तमी दिली होती; त्याचे हेडिंग होते..._
'तांबेचं पितळ उघडं !'
***
_मे, २०१४ मध्ये, निवडणूक निकालानंतर, लोकसत्ता च्या मुख्य बातमीचे हेडिंग होते...
'हाताची घडी, कमळावर बोट!'
***
_नवाकाळचे एक हेडिंग...
तेव्हा जयसूर्या जबरदस्त फाॕर्माॕत होता आणि आपण मॕच जिंकलो होतो.
'श्रीकांतने जयसूर्याला गिळले.
भारताच्या क्रिकेटसंघाने साजरी केली ..
"श्रीलंकेत हनुमान जयंती!"
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट!
इंग्लंड ��ध्ये एक क्रिकेट सामना झाला होता.
होता अगदीच स्थानिक पातळीवरील! म्हटला तर विशेष काहीच नव्हते.
सारे खेळाडू, पंच -भारतीय! आडनाव - पटेल!
महाराष्ट्र टाइम्सचे शीर्षक होते
पटेल, न पटेल! सारेच पटेल!!
🤣😂
आपल्यावर प्रेम,काळजी करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा आपण गृहीत धरु लागतो. तेव्हा तिथं त्याच्या असण्याची, प्रेमाची जाणीव लोप पावत असते.ती जाणीव होण्यासाठी त्या व्यक्तीची उणीव भासणं गरजेचं असतं. कारण उणिवेत जाणीव तीव्र होतं असते. ती झालीच नाही तर समजावं त्या व्यक्तीचं अस्तित्वच नाही..
Free Course Alert
Microsoft Word & Google Docs: Master Document Creation.
Course+Certificate
How to get It
- RT this post
- Like and Comment 'Word'
- You will get a link in DM
मैं नहीं जानती
मुझे तुमसे प्रेम है या नहीं
और यदि है तो कितना है...
मैं केवल इतना जानती हूँ..
मैं तुम्हारी ओर अपनी पीठ करके...
कभी नहीं सो पाऊँगी.....! !🖋️🌸
तू लाठी आण... आम्ही हिम्मत आणू
तू शिव्या आण.. आम्ही संयम आणू
तू तोंडावर फडकं बांध.. आम्ही ओठांवर सत्य बांधू
तू लाथेत जोर आण.. आम्ही मनात ताकद आणू..
मनगटातला सगळा उन्माद एका फटक्यात मोकळा कर..
इकडून तिकडून उसना आणून परत परत ठासून भर.
फोड डोकी.. तोड नाक
जाळून टाक.. कर राख.
आम्ही मात्र शांतपणे उघड्या डोळ्यांनी प्रश्न विचारत उभे राहू!
सगळं करून संपलं की तू स्वत:ला फक्त एक प्रश्न नक्की विचार..
मृत्यू जेव्हा तूला एकट्यात गाठेल..
भल्या बुऱ्याचा गच्च हिशोब मनामध्ये साठेल..
तेव्हा.. चूकून..
तूला प्रश्न विचारणारे लाखो डोळे आठवले तर?!
काय करशील?!
काय उत्तर देशील?!
तेव्हाही त��झ्याकडे उत्तर नसेल तर?!
कोणाकडे मागशील?!
आणि जेव्हा आयुष्यभर पूजलेल्या लाठीचीच तिरडी बनताना पाहशील...
तेव्हा..
स्वत:चंच स्वत:वर कधीच न फिटणारं कर्ज ठेऊन जाशील!
तू तेव्हाचा विचार कर!
-समीर विद्वांस-
जेंव्हा ते विकायला निघतात बाजारात
तेंव्हा तू दिलेले शस्त्र हाती घेऊन
मी उभा राहतो
सर्वहारांच्या खांद्याला खांदा लावून
त्यांच्या मुक्ती लढ्यात
मी केवळ
शब्दांचे इमले बांधणारा
कवी किंवा लेखकही नाही
मी आहे तुझ्या समता संघर्षातील
लढणारा एक साधा भीम सैनिक
व��नम्र अभिवादन.!(७)
हळुहळु स्वप्नं सारी
जागी होत जातात..
कधी हसतात
कधी रुसतात..
हलके हलके
मनात आपली जागा
भक्कम करु पाहतात..
स्वप्नं जे��्हा सत्यात
अलवार येऊ लागतात..
क्षणोक्षणी जगताना
रंग देऊन जातात..
स्वतःसोबत जगण्यालाही
सुंदरतेनं सजवतात..
प्रत्येकाच्या आयुष्यात
ही स्वप्नं मात्र नक्की असतात..
..
प्रशांत असनारे यांच्या 'मीच माझा मोर' या कविता संग्रहातील ही कविता व्याख्यान, सूत्रसंचालन, कीर्तन यामधून खूपदा ऐकली होती. #काव्याग्रह ने काढलेला हा संग्रह आज वाचायला घेतला आहे.
कविता खूपच दर्जेदार आहेत.
@LetsReadIndia@logicaldk@PustakKida