@BJP4Maharashtra@RaviDadaChavan तुम्ही यांच्या भाषेचं समर्थन करता का?
ह्या व्यक्तीच्या फेसबूक प्रोफाईलवर कव्हर पिक्चरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आहे. पक्षचिन्हं कमळदे��ील आहे.
मुलाखत घेतली म्हणून ट्रोलिंग करताना त्यात महिलेला निवडायचं, तिच्यासाठी अभद्र, अश्लिल भाषा वापरायची ही तुमची संस्कृती आहे का? तुमचा हा कार्यकर्ता, पदाधिकरी असेल तर त्याची पाठराखण तुम्ही करणार आहात का?
@MahaCyber1 तुम्हीही याची दखल घेऊन कारवाई करावी अपेक्षा
राष्ट्रीय सरचिटणीस, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्ष मा. मंत्री, कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय आ.डॅा.जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
आपणास उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो या सदिच्छा.!🙏
@Awhadspeaks
दुबे वाट्टेल ते बोलले…पण
तुमची राज्य तुमच्या माणसांना को पोसू नाही शकली?
खाणी, रिफायनरीज जर तुमच्याकडेच आहेत तर का इतकी वर्षे तुमच्या लोकांना स्वतःच राहतं घर/कुटुंब सोडून मुंबईत यावं लागतं?
हे दुबे का नाही सांगू शकले?
बरं ऐर���ी परप्रांतियांची बाजू घेणारे मराठी आज एक परप्रांतिय महाराष्ट्राचा अपमान करत होता तेव्हा कुठे गेले?
मराठीचा, मराठी माणसाचा सन्मान राखलाच गेला पाहिजे असं म्हणणारं सरकार आज कुठे???
तुम्ही व्होट बँक सांभाळणार, तिच बाकीच्यांनी सांभाळली की ते बेगडी
#NishikantDubey #Maharashtra #Marathi
सीमेवर युद्ध चालू असताना देशांतर्गत परिस्थिती कशी हाताळावी याबाबत सर्वप्रथम मिडीयाला प्रशिक्षण द्यायला हवे.
युद्ध हा चेकाळण��याचा नसून अधिक जबाबदारीने वागण्याचा विषय आहे.
#रणसंग्राम
#OperationSindoor
सरकार पाडले
पक्ष फोडला
आमदार फोडले
खासदार फोडले
चिन्ह चोरले पक्षाचे नाव चोरलं
तरीपण अजून आदित्य ठाकरे या नावाची भीती त्यांना वाटते
@AUThackeray
म्हणून अजून एक घाणेरडा प्रयत्न
ओला,उबेर नव्हते तेव्हा लोकल रिक्षा वाल्यांनी व्यवस्थित सेवा दिली असती तर आज फोटोत म्हटल्याप्रमाणे वेळ आली नसती. पुण्यातील रिक्षावाले कमालीचे मुजोर आहेत, काही अपवाद असतील. नवीन व्यक्ती दिसला त��� यांनी त्याला लुटलाच म्हणून समजा. आता ह्या कंपन्या यांना त्यांच्या तालावर नाचवतात.#पुणे
डॉ. मनमोहन सिंग यांचं शांत नेतृत्व आणि देशासाठी केलेली अतुलनीय सेवा सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने देशाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण ��्रद्धांजली
✒️प्रल्हाद र.वाघ
जिल्हाउपाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सोशल मिडीया
कधी काळी ज्या मुलाला शाळेच्या वर्गातही बसू दिलं जातं नव्हतं, तोच विद्यार्थी आज थाटात आणि रुबाबात सर्व ठिकाणी बसतोय..!
कर्नाटक विधानसभा..!
बाबासाहेब जिंदाबाद..!
कालच्या माझ्या भाषणानंतर जे काही मला फोन आले; त्यातील ९९% फोन हे माझे समर्थन करणारे होते. पण, महाराष्ट्रात जाती-पातीच्या भिंती किती प्रबळपणे उभारल्या गेल्यात हे प्रत्येक फोनमधून ध्वनित होत होते. यातील एक वाक्य मला खूपच खटकले, "साहेब, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोललात." मी माझ्या भाषणातच सांगितले होते की, ' मी वंजारी आहे. मी वाल्मिक कराडच्या विरोधात बोलतोय. तो पण वंजारीच आहे.' यामध्ये शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार आहे. जिथे अन्याय- अत्याचार होतो; त्याविरोधात उभे ठाकलेच पाहिजे.अन्याय करणाऱ्याला जात नसते आणि ज्याच्यावर अन्याय होतो, त्यालाही जात नसते आणि अन्यायाविरूद्ध बोलणाऱ्यानेही जात तपासू नये.
मी भुसावळच्या प्रकरणात मणियार चाचाची बाजू घेतली. तेव्हा अनेकांनी माझे कौतूक केले आणि अनेकांनी माझ्यावर टीकाही केली. पण त्यावेळेस मी माझी भूमिका स्पष्ट केली की, जर मणियार चाचाच्या जागी माझा बाप असता तर मी काय केले असते किंवा तुम्ही काय केले असते? तिथे धर्म आड आला. अनेकवेळा मी दीन-दलित, शोषित- पीडितांची बाजू घेत असतो. तेव्हाही जातीपातीचे राजकारण आड येत असते. ��र्षानुवर्ष ज्या समाजावर अन्याय होत असतो; त्या समाजासाठी आपण बोललेच पाहिजे, ही माझी भूमिका आहे. ही भूमिका शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांतूनच येते.
शोषक हा वेगळा आणि शोषित हा वेगळा समाज आहे. आपण कुठल्याही समाजाचे असू पण शोषितांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, हेच महाराष्ट्राची माती कायम शिकवत आली आहे अन् ही शिकवण मी तरी कधी विसरणार नाही. मी जे काल बोलायला विसरलो ते खाली लिहितोय...
* वाल्मिक कराड चप्पल का घालत नाही? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राने जरूर विचारावे.
* २०० च्या वर एफआयआर नोंदवणारा वाल्मिक कराड हा एफआयआर नोंदवायला पोलीस स्टेशनला किती वाजता जातो की पोलीस त्याच्या घरी येऊन सह्या घेतात? याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे.
* प्राजक्ता धस या भगिनीवर अन्याय होतो. न्याय मिळविण्यासाठी त्या वेगवेगळे दरवाजे ठोठावतात.आजही त्या प्राजक्ता धस यांना न्याय मिळ�� नाही. त्यांना न्याय कोण देणार?
आणखी खूप प्रश्न आहेत. बीडमधील खुनांची मालिका ही एखाद्या सिरियल किलरने केलेल्या खुनांप्रमाणे आहे. एखाद्या पुस्तकात जे आपण वाचले असते की, एकाने ४० खून केले; ५० खून केले, नंतर ते उघडकीस आले. असाच एक सिरियल किलर आपणाला ठेचायचा आहे अन् त्या सिरियल किलरचे नाव आहे, वाल्मिक कराड!