मा. बावनकुळे साहेब, मा. राहुल जी गांधी जे करतात त्याला #नौटंकी नाही तर हुकुमशाही वृत्तीच्या सरकारविरोधात निडरपणे सत्याचा आणि न्यायाचा आवाज बुलंद करणं आणि ‘जन की बात’ ऐकून घेणं, असं म्हणतात..
आता नौटंकीची आठवणच करून दिली तर नौटंकी कशाला म्हणतात हे सांगतो…
•निवडणुकीत प्रभू श्री रामाच्या नावे मतं मागून त्यांच्याच मंदिरात हात मारणं म्हणजे #नौटंकी..
•दावोसला जाऊन महाराष्ट्रातल्या कंपन्यांसोबत करार करणं, म्हणजे #नौटंकी…
•शेतकऱ्यांना कर्जमाफीचं फसवं पॅकेज देणं म्हणजे #नौटंकी..
•प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचं आश्वासन म्हणजे #नौटंकी..
•नोटबंदीनंतर काळा पैसा नष्ट करण्यासाठी ६० दिवसांची मागणी करणं म्हणजे #नौटंकी..
•लाडक्या बहिणींना फसवून निवडणूक जिंकणं आणि निवडणुकीनंतर त्यांना अपात्र ठरवलं म्हणजे #नौटंकी..
ही यादी खूप मोठी आहे.. कमेंटमध्ये लोकंच ती वाढवतील. ती नक्की वाचा.
@cbawankule
प्रामुख्याने सातारा, सांगली या महाराष्ट्राच्या भागात स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करत इंग्रज शासनाला आव्हान देत प्रतिसरकार (पत्री सरकार) स्थापन करणारे पहिले स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
गुरूपोर्णिमा
आयुष्य जगतेवेळी आपण प्रत्येकाकडून काही न काही शिकतच असतो.
आपणा कडून ही बरेच काही शिकता आले आणि अजून शिकता येईल ही अपेक्षा आहे.
कामाच्या निमित्ताने, अडचणीच्या वेळी आपल्याकडून खूप काही शिकता आले. आयुष्य जगताना या मोलाच्या ज्ञानाची मला मदत होईल.